मँगो तिरामिसु
साहित्य-
२ आंबे किवा २ वाट्या आमरस+ सजावटीसाठी आंब्याच्या फोडी.
५ ते ६ मोठे चमचे साखर, २ अंडी
१८ ते २० लॉफेल बिस्किटे( तिरामिसु करताची स्पेशल बिस्किटे) ही मिळाली नाहीत तर मेरी बिस्किटे घ्या आणि साखर वाटीभर घ्या .लॉफेल बिस्किटात साखर असते त्यामुळे ५ ,६ चमचे साखर पुरते.
२५० ग्राम मस्कार्पोन चीज , ते नसेल तर लो फॅट क्वार्कचीज
फ्रूटी किवा ऑरेंज ज्यूस बिस्किटे भिजवण्यासाठी.
एक चौकोनी किवा लंबगोल ट्रे.
कृती-
आंब्याचा रस काढून ब्लेंडरमधून घुसळून गुठळ्या मोडा. मस्कार्पोन चीज त्या मध्ये घालून एकत्र मिसळा.
अंडी भरपूर फेटून घ्या. ती चीज आणि आंब्याच्या मिश्रणात मिसळा.
लॉफेल बिस्किटे ट्रे मध्ये एकापुढे एक ठेवा, आणि त्यावर चमच्याने हळूहळू फ्रूटी/ऑरेंज ज्यूस घाला.बिस्किटे तो ज्यूस शोषून घेतील. आता ह्या लेअर वर आंबायुक्तचीजचा एक थर देऊन बिस्किटे झाकून टाका.
पुन्हा बिस्किटांचा एक थर लावा, ज्यूस घाला व आंबायुक्त चीजने झाका.
बिस्किटे- आंबाचीज- बिस्किटे- आंबाचीज असे एकूण चार थर होतील.
आता आंब्याच्या फोडींनी सजवा.
फ्रिजमध्ये ६ ते ८ तास सेट करायला ठेवा. तिरामिसु थंड झाल्यावर घट्ट झालेले दिसेल.
हवा तेवढा पोर्शन डिशमध्ये थंडगार सर्व्ह करा.



वाचने
11596
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
अगं आई गं!!!!
यम्मी!!!! राकलेट विजा काढावाच
तो.पा.सु. कधी खाल्ले नाहीये
थ्यांकू!!!!
In reply to थ्यांकू!!!! by ऋषिकेश
तिरामिसु हे माझं आतापर्यंतचं
अहाहा..
स्वातीतै...
मस्त!
In reply to मस्त! by प्रियाली
मस्कार्पोन चीज मिळतं गं
In reply to मस्कार्पोन चीज मिळतं गं by भाग्यश्री
कुठे मिळतं?
In reply to कुठे मिळतं? by प्रियाली
मस्कारपोनी
In reply to मस्कारपोनी by चित्रा
प्रतिसादाशी भयंकर सहमत!
साष्टांग दंडवत. भन्नाट पाकृ
साष्टांग दंडवत
बाकिच्यांना काढूदेत राकलेट
मस्त दिस्ते,पण फक्त पाहुन
वा वा वा s s s s s S S S s s
क्या बात है!
In reply to क्या बात है! by नंदन
अजून व्हीसा शिल्लक आहे, आणि
In reply to अजून व्हीसा शिल्लक आहे, आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
ही ही ही .. नंदनच्या आनंदात (
सही
लुसलुशीत
ख प ले!
In reply to ख प ले! by ३_१४ विक्षिप्त अदिती
होय, मलाही नुकतेच समजले
:)
अप्रतिम...
एकदम मस्त आणि सोपी पाकृ!!!
In reply to एकदम मस्त आणि सोपी पाकृ!!! by मस्त कलंदर
धन्यु
मस्तच! आंबा आणि तिरामिसु
धन्यवाद,
वॉव!!