चकलीची एक जग्गात भारी आठवण... वाचाच!
...चकलीच्या आठवणीनं डोळ्यात पाणी आलं.
इथे आल्यावर चकली खायची इच्छा झाली ,म्हणतात ना विनाशकाले विपरित बुद्धि.
इथल्या एका दुकानामध्ये मूरक्कू नावाचा चकलीचा दक्षिण भारतिय चुलतभाऊ दिसला. हौस आणि हव्यासापोटी घरी घेऊन आले.
घरी येऊन मस्त चहा बनवला आणि बसले ते मुरक्कू घेऊन.
बोटांनी तुकडा मोडायचा प्रयत्न केला तर काही तुटेना..
मग आणखी पुढचा गाxव पणा केला आणि सरळ तोंडात टाकली.
तरिही तो मुरक्कू दाद देइना तर सोडुन द्यावा ना विषय,पण नाही. हावरटपणा!
त्यापुढचा गाxवपणा+ कुडुम कुडुम खायला सुरुवात केली. एक दोन सेकंद चर्वण केले.आणि पहिल्याच तुकड्यात खडा आला. तोंडातल्या तोंडात जिभेनी शोधायचा प्रयत्न केला.आता तरी काढुन टाकावा की नाही तोंडातुन?
नाही.... तो मुरक्कु आता तोंडात भिजला होता त्यामुळे त्यातले जे काही तिखट मीठ होते ते बरे लागत होते.
जिभेनी परत प्रयत्न केला इकडे तिकडे घोळवला . काहीही जिभेशी आलं नाही.
म्हटंलं असेल काहीतरी मसाला किंवा तांदुळ/डाळ काहीतरी...
शिकस्त करुन परत कुडुम कुडुम करुन कचकचणारा मुरक्कुचा घास गिळुन टाकला.
नंतर मात्र नाही हातात घेतला बरं का.मस्त चहा घेतला.
थोड्या वेळानी सवयीप्रमाणे खळखळून चुळ भरली...तेंव्हा लक्षात आलं कि तोंडात कुठेतरी पोकळी आहे.एक विचित्र फीलींग येतं ना दातात काहीतरी अडकल्यावर्..तसंच काहिसं.पण इथे पोकळी होती.
दिवा लावला आणि नीट पाहिलं तर दाढेचा चक्क एक तुकड गायब झाला होता. अरे अरे त्या आठवणीने आत्ता सुद्धा दात सळसळतात माझे.
आणि कहर म्हणजे...माझ्याच दाढेचा तो तुकडा मी 'तांदुळ किंवा मसाल्याचा तुकडा' समजुन कडा कड खाल्ला होता.
मग पुढ्चे सगळे सोपस्कार. भारतातली फेरी planned असल्याने रूट कॅनॉल करणे,कॅप बसवणे वगैरे प्रकार तिथे झाले.
पण ती कवळीतोड चकली चांगलीच तोंडात मारुन गेली.
हाहाहा आताशा जर्रा बरं वाटतंय. स्वतःचा गाxवपणा confess केल्यावर!
मि.पा.वर एखादं सदर सुरु करायला हरकत नाही ना? confession box नावानी!
बर्याच गोष्टीबद्दल आपल्याला पश्चातबुद्धी होत असते.ते जोपर्यन्त बाहेर पडत नाही तोपर्यन्त मळमळ् होत राहते.
... वमन कक्ष हे नाव अगदी योग्य होइल ना?
वाचने
6859
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
आपण परदेशात असता हे वाचुन
In reply to आपण परदेशात असता हे वाचुन by परिकथेतील राजकुमार
घ्या...कुणाचं काय तर कुणाचं काय!
In reply to घ्या...कुणाचं काय तर कुणाचं काय! by जाई अस्सल कोल्हापुरी
अर्थाचा अनर्थ करण्यात पहिला
In reply to घ्या...कुणाचं काय तर कुणाचं काय! by जाई अस्सल कोल्हापुरी
नोबेल ची काशि केली....
वमन कक्ष! =)) =)) चालू
लै वाट लागत्ये.....
पुढची गोष्ट माहीत नाही तुला स्व्.पा.
In reply to पुढची गोष्ट माहीत नाही तुला स्व्.पा. by जाई अस्सल कोल्हापुरी
ते भारतात एका दंतचिकित्सकाकडे गेले आहे....
छान.. मजेदार अनुभव.. इकडे
आपण ढ च्या जागी x वापरले आहे
काही शंका वमन (कक्षेत राहून..)
>>वाचाच! कोदांची आठवण
नखं खाणारे लोक ऐकले होते ....
मजेशीर अनुभव.
अग आदिल किवा रघुवंशीमधे
चुचु कडुन शिका....
मस्त प्रश्न !!