साहित्य:-
मैदा - २ वाट्या
तिखट:- चवीनुसार
हळद:- १ छोटा चमचा.
तीळ :- १ छोटा चमचा
ओवा:- आवडीप्रमाणे
धनेजिरे पूड :- २ छोटे चमचे
वाटलेलं लसून:- १ छोटा चमचा
मीठ:- चवीनुसार
तळणासाठी तेल, आणि एक मऊ कापड
कृती:-
पहिले कोरडा मैदा एका मऊ कापडामध्ये बांधून घ्यावा. कुकर मध्ये पाणी टाकून बांधलेले मैदा एका भांड्यात ठेवावा आणि वरून झाकण ठेवाव. तीन शिट्या झाल्या कि मैदा काढुन घ्यावा... कुकर मध्ये वाफ दिल्याने मैदा छान मऊसर होतो. मग त्यात सगळे जिन्नस आवडी प्रमाणे एकत्र करावे... आणि मग त्यात गरम तेलाचा मोहन पण घालावा. नंतर पाणी टाकून आपल्या नेहमीच्या चकाल्यांचे पीठ जसे मळतो तसे मळून घ्यावे. मिश्रण सोऱ्यात भरून चकल्या कराव्या आणि गरम तेलात तळून घ्याव्या....
ह्या चकल्या थोड्या झणझणीतच छान लागतात आणि खूप दिवस टिकतात pan.....
सोबत फट्टू पण आहे....
वाचने
7554
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
छान अहेत हो
In reply to (विषय दिलेला नाही) by शरयुप्रितम२०१०
फोटो अपलोडच होत नैये... :-(
फोटो कुठ आहेत
.... आय्याई.. गं
हो...
...दात एक मौल्यवान दागिना...
(विषय दिलेला नाही)