अॅरेन्ज्ड मॅरेज
IT WIFE आणि स्वयंपाक वरच्या प्रतिक्रीया वाचल्या आणि आठवले.
परवा एकाने बोलता बोलता विनोद म्हणून एक वाक्य सांगितले.
सगळेजण भरपूर हसले थोड्यावेळानन्तर मात्र त्या वाक्याबद्दल जोरजोरात चर्चा सुरु झाली.
सत्राव्या शतकातले विचार बाविसाव्या शतकातले विचार पुरोगामी प्रतिगामी वगैरे दूषणे देवून झाली.
प्रत्येकाने तावातावाने आपले विचार मांडले.
व्यक्तीस्वातन्त्र्य , भारतीय संस्कृती , पुरुषप्रधानता , आय टी कल्चर , चुल आणि मूल ,अॅरेन्ज मॅरेज , कान्देपोहे समारंभ
शहरी विरुद्ध ग्रामीण संस्कृती , टीव्हीवरचे कार्यक्रम आणि वाडलेल्या बलात्कारांच्या बातम्या
शुचिता , आजचे शिक्षण घडवते की बिघडवते असा बर्याच मार्गावरून फेरफटका मारत बराच काथ्याकूट झाला.
प्राचीन ,भारतीय संस्कृती , हिंदू धर्मातील स्त्रीचे स्थान , गार्गी ,मैत्रीयी , अहिल्या , रूपकुंवर , सोनिया गांधी साध्वी ऋतंभरा , मुलायम सिंग वगैरे विषय देखील यातून सुटले नाहीत.
चर्चा बराच वेळ चालली आणि दुसर्या दिवशी मात्र आम्ही सारे पुन्हा एवढ्या प्रदीर्घ चर्चासंघर्षानन्तर स्वतःची मते जरा अधीकच ठाम करून एकत्र आलो.
इतकी चर्चा ज्या वाक्यावर झाली ते वाक्य होते....
द डिफरन्स बिट्वीन लव्ह मॅरेज अॅन्ड अॅरेन्ज मॅरेज इज.....
लव्ह मॅरेज मीन्स मॅरिन्ग टू यूवर ओन गर्ल फ्रेन्ड अॅन्ड अॅरेन्ज मॅरेज मीन्स मॅरिन्ग टू समवन एल्सेस गर्ल फ्रेन्ड.
प्रतिक्रिया
:)
चालु द्या... अजुन एक.. !!
लेखाचे शीर्षक अॅरेन्ज्ड
स्वयंसंपादनाचा फायदा उदाहरण ५
मस्तच चर्चा झाली असणार. ती
छान वाक्य आहे. अविवाहित
लव्ह मॅरेज मीन्स मॅरिन्ग टू
फरक
हॅ हॅ हॅ
मास्तर आणि विर्जणमास्तर
Not necessarily.
शेवटच्या वाक्याशी असहमत!
प्रत्येक स्त्री
चर्चेला राजकिय वळण लावण्याचा
<<<एकाने तर व्हर्जिनीटीचा ही आग्रह धरला.>>>
यात गार्गी ,मैत्रीयी कशा काय