झाझिकी..
सध्या आमच्याकडे पारा ३५ अंशावर झेपावला आहे. युरोपातल्या मंडळींना कुठली इतक्या उच्च तपमानाची सवय? त्यात ह्या लोकांना घरात सिलिंगफॅन लावायला नकोत आणि ए सी ची आम्हाला गरज नाही म्हणतात.वर्षातून आठ दहा दिवस ३०/३२ अंश से.पर्यंत चढतं तपमान, उन्हाळ्यात २२/२५ अंश आणि एरवी तर सिंगल डिजिट किवा उणेच.. मग लागतात कशाला अशा गोष्टी? हा यांचा युक्तिवाद ३५/३७ अंश से. नी या उन्हाळ्यात अगदी हाणून पाडला आहे . मॉलमधली आइसक्रीम्स, दही पटापट संपायला लागले आहेत.
काल दुपारी त्सेंटा आजीकडे ह्याच गप्पा चालू होत्या. आजी म्हणाली ह्या हवेसाठी एकदम उत्तम रेसिपी म्हणजे ग्रीक झाझिकी ! आता हे काय प्रकर्ण आहे? हे विचारले तर म्हणाली चल, आपण आत्ताच करु यात सगळं साहित्य आहे घरात..
तर, ह्या साठी लागणारे पदार्थ -
१ काकडी, ७ते ८ लसूण पाकळ्या, एका पेराएवढं आलं, मीठ आणि घट्ट दही
झाझिकी बरोबर खायला व्हाइट ब्रेड!
हे पाहून अर्थातच प्रियालीच्या काकड्यांची आठवण झाली. (प्रियाली तुला अजून १ काकडी-रेसिपी )
करायला एकदम सोप्पे आणि खायला काय लागते म्हणून सांगू?
दही घट्ट नसेल तर थोडा वेळ फडक्यावर टाका. जर ग्रीक दही मिळाले तर फारच उत्तम ,ते एकदम घट्ट असते.
काकडीचे साल काढून घ्या आणि किसा. त्यात थोडे मीठ घालून ठेवा म्हणजे काकडीला पाणी सुटेल. हे पाणी काढून (पिऊन)टाका. काकडी पिळून पाणी जितके काढता येईल तितके चांगले.
लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरा. आले किसून घ्या. एवढे होईपर्यंत काकडीला परत पाणी सुटलेले दिसले तर ते परत पिळून काढून टाका.
काकडीच्या किसात किसलेले आले,बारीक चिरलेला लसूण घाला. दही घाला आणि मिक्स करा. चव घेऊन हवे असल्यास अजून थोडे मीठ घाला. (सैंधवही उत्तम लागते,हा आम्ही तिथल्यातिथे लावलेला शोध!)
झाले की तय्यार! व्हाइट ब्रेड बरोबर झक्कास लागते ही झाझिकी...
जोडीला ऑलिव्ह्ज,चीज आणि गोल्डस बेक असेल तर आणखीच छान...
संध्याकाळी लग्गेच आमचाही झाझिकी प्रयोग झालाच..

वाचने
8511
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
छान डिप
In reply to छान डिप by प्रदीप
उच्चार
In reply to छान डिप by प्रदीप
त्साझिकी
In reply to त्साझिकी by चित्रा
डिल
In reply to डिल by स्वाती दिनेश
घरगुती
In reply to घरगुती by चित्रा
मस्तच
छान आहे एकदा करुन पाहू ..
In reply to छान आहे एकदा करुन पाहू .. by लिखाळ
हेच म्हणतो
In reply to हेच म्हणतो by केशवसुमार
दे दे तू आणखीन बारीक सारीक डीटेल्स दे!
वाह चकण्याला उत्तम
एकदम सोप्पा प्रकार
In reply to एकदम सोप्पा प्रकार by गणपा
चक्का..
:-)
वा!
अरे वा हे करुन पहायला हवे!
अरे वा!
अरे वा! वेगळीच पाकृ! आपल्या
सोपा प्रकार वाटतो तरी आहे.
स्वाती आता मीही करुन पाहते.
मस्त!!
मला फार आवडते त्सात्झिकी,
त्सात्सिकी व पिटा, मजा येईल..
In reply to त्सात्सिकी व पिटा, मजा येईल.. by संजय अभ्यंकर
ग्लास..
मस्त!
छान
मस्त दिसतंय झाझिकी... कुणी
मस्त :)
धन्यवाद,