साहित्य :
१ वाटी साधारण मध्यम आकारात चिरलेला कांदा / पात
१ वाटी तेल
१ वाटी तिखट (कोल्हापुरी मसाला वाले तिखट (कांदा लसुण मसाला तिखट) असेल तर उत्तम
१ वाटी डाळिचे पीठ
२ वाट्या गरम पाणी (कांदा चिरताना पाणी तापवायला ठेवावे..म्हणजे ऐन वेळी उकळते मिळेल)
कोथिंबीर १ वाटी
फोडणीचे साहित्य
मीठ : चवीपुरते (नाहीतर बाकी सगळं १ वाटी आहे म्हणुन.. हे पण वाटीभर नाही....एका काकुंनी मला फोन वर रेसिपी विचारली होती.त्यांना मी मोघमात सांगायला गेले..कि सगळ १ वाटी घ्या...त्यांनी हा प्रश्न विचारला होता म्हणुन सांगते आहे)
क्रूती :
तेल मस्त तापवा...त्यात मोहरी + जिरे तडतडवा.
थोडासा हिंग घाला...त्यानंतर कांदा घालुन थोडा वेळ परतत रहा..
कांदा थोडा गुलाबी झाला कि त्यामध्ये तिखट घाला.....खमंग वास सुटला कि गरम पाणी घाला.
पाण्याला मस्त उकळी आल्यावर चविपुरते मीठ घाला.
आणि उकळ्त्या पाण्याच्या उकळीवर ५ बोटानी पीठ भुरभुरायला सुरुवात करा..
मध्ये मधे पळीने किंवा उलथन्याने हलवा.
सगळे वाटी भर पीठ अशा रितीने संपले कि मग व्यवस्थित हलवुन झाकण ठेवा....१-२ दणदणित वाफा येउ द्या.
आचेवरून खाली उतरवा आणि मस्त १ वाटी कोथिंबीर घालुन हलवा..
हे रावण पिठले टम्म फुगलेली भाकरी / तव्यावरुन काढ्लेली चपाती + मस्त दाट सायीचे दही + आणि कांदा सोबत खा....... झणझणित्...खमंग्.....लागते
महत्वाची सुचना..: १) तिखटाचे प्रमाण जास्त आहे..स्वतःच्या रिस्क वर खाणे. सवयीचा भाग आहे..
२) आप्ल्या सोयी /तब्येती /चवीनुसार तिखटाचे प्रमाण हवे तितके कमी करु शकता.
३) पाणी सुद्धा आपल्याला पातळ आवडत असेल तर वाढ्वू शकता...पण असे घट्टसरच मस्त लागते.
३) शक्यतो वीकेंड ला करा. म्हणजे दुसरा दिवस हातात अस्तो.
वाचने
15966
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यायला त्या रावणाने काय घोडं
रावणि भात राहिला की ? बाकी
In reply to च्यायला त्या रावणाने काय घोडं by अवलिया
एक वाटी
In reply to रावणि भात राहिला की ? बाकी by मदनबाण
+१
पिठ्ल्याचा हँगओव्हर आहे......
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
हे तरी एकदाच टॅटू
In reply to पिठ्ल्याचा हँगओव्हर आहे...... by जाई अस्सल कोल्हापुरी
मिर्ची ???
...वाटीभर तिखट....
In reply to मिर्ची ??? by छोटा डॉन
ओक्के ...
In reply to ...वाटीभर तिखट.... by जाई अस्सल कोल्हापुरी
...वाटीभर तिखट....
In reply to मिर्ची ??? by छोटा डॉन
फोटू नसल्याने पाकृ गच्चीवर
सांभाळुन.. गच्चीला हँगओव्हर
In reply to फोटू नसल्याने पाकृ गच्चीवर by प्रभो
....फोटू...?
In reply to फोटू नसल्याने पाकृ गच्चीवर by प्रभो
मस्त झणझणीत पाकृ दिसते
पण एक वाटी पिठाला एक वाटी
हाहाहा!
In reply to पण एक वाटी पिठाला एक वाटी by चतुरंग
अगदी RIGHT
In reply to हाहाहा! by प्रियाली
हाहा!
In reply to पण एक वाटी पिठाला एक वाटी by चतुरंग
पिचकारी
एकदम झणझणीत हो x x x x
जाई अगं इतक्या तिखटानी क्षतं
खाणारे हि रावण.......
.. हिहाहाहा..
In reply to खाणारे हि रावण....... by गमत्या
रावण पिठले मस्तच.मी मध्यंतरी
आपल्याला फक्त कुंभकर्ण झोप
In reply to रावण पिठले मस्तच.मी मध्यंतरी by अश्विनीका
घटोत्कच थालीपिठे अश्या
In reply to रावण पिठले मस्तच.मी मध्यंतरी by अश्विनीका
अरे हे तर ढ्कलथालिपीठ
In reply to घटोत्कच थालीपिठे अश्या by रेवती
धन्यवाद रेवती.
In reply to घटोत्कच थालीपिठे अश्या by रेवती
ब्बाबौ
एक
तिखट
होय...
In reply to तिखट by सहज
मस्त लागतं पण थंडीच्या
परवाच्या रावण पिठल्याची आग........
आहाहाहा....
महत्वाची सुचना
एक वाटी डाळीच्या पीठाला एक