प्रोजेक्ट गोलाइव्ह होऊन ४ आठवडे झाले.. प्रॉडक्शन सिस्टिम बर्यापैकी स्थिर झाली आहे. विशेष असे काही काम नाही त्यामुळे हा विकांत ही धमाल करता येणार, हे काल प्रॉडक्शन कॉल नंतर नक्की झाले.. दिवस अखेरच्या टीम मीटिंगमध्ये उद्या सकाळी ११ वाजता पॅराग्लायडींगला जायचे असा बेत पक्का केला.. मागच्या आठवड्यातल्या "पेद्रो दि गावा"च्या चढाईचे फोटो बघून ह्या वेळेस अजून ५-६ जण बेतात सामील झाले.. सगळा कार्यक्रम पार करून दुपारी जेवायला कधी मिळणार माहिती नाही.. त्यामुळे ब्रंच करण्यावाचून गत्यंतर नसणार हे कालच समजले होते.. ब्रंचला काय करावे विचार चालू होता तेव्हा ब्राझीलमधले शेवटचे दोन आठवडे शिल्लक आहेत त्यामुळे भारतातून आणलेला शिधा संपवता येईल असा एखादा पदार्थ करावा हे नक्की झाले
चला तर मग साहित्य लिहून घ्या.. B)
साहित्य:
सर्व साहित्य ८-१० धिरड्यां पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे..
१ भांडे तांदूळ, १/२ भांडे उडीद डाळ, १/४ भांडे हरभरा डाळ, १/४ भांडे मूग डाळ
१ लहान कांदा
१ टोमॅटो
१-२ लसुणाच्या पाकळ्या
१/२ टेबल चमचा कांदालसूण मसाला
लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
मीठ, कोथिंबीर आवडीनुसार
जिरे पूड, धणे पूड, हळद, तेल(ह्या. प्र. कि. ते मा. न. त. आ. स्व. पा. ठे. ला. ना. अ. स. )
चटणीचे साहित्य
१वाटी डाळ
१/२ ओले खोबरे
थोडा बारीक चिरलेला कांदा
लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
मीठ, साखर, कोथिंबीर आवडीनुसार
कृती :
आदल्या दिवशी संध्याकाळी तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुऊन ३-४ भांडी पाण्यात ४-५ तास भि़जवत ठेवा.
भिजवलेले तांदूळ आणि डाळी मिक्सर मधून रवाळ वाटून घ्या.
कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण बारीक चिरून घ्या.
बारीक चिरलेले कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण रवाळ पिठात मिसळा. त्यात कांदालसूण मसाला, जिरे पूड, धणे पूड, हळद, चवी नुसार मीठ घालून ढवळा. झाली धिरड्याची तयारी
चटणीचे साहित्य मिक्सर मध्ये थोडे पाणी घालून वाटून घ्या.. आवडी नुसार चटणीला कढीलिंबाची फोडणी द्या..
गॅसवर तवा ठेवा.. आणि धिरडी घालायला सुरवात करा..
धिरड्याच्या कडेने थोडे तेल सोडा.. झाकण घालून ठेवा.. ३-४ मिनिटांनी धिरडे उलटून दुसऱ्या बाजूने भाजा(? ).
झाले गरमागरम धिरडे आणि चटणी तयार..
पुढे काय हे तुम्ही सगळ्यांनी ओळखले असेलच..
४-५ धिरडी हाणली आहेत..मुखशुद्धीला शेंगदाण्याची चिक्की.. (ब्राझीलमध्ये अगदी आपल्या भारतात मिळते तशी चिक्की मिळते पण फोटो काढण्या इतकी ही शिल्लक राहत नाही..; ) )
बरं चला आता पळतो पॅराग्लायडींगला जायचे आहे..
गॅसवर तवा ठेवा.. आणि धिरडी घालायला सुरवात करा..
वाचने
11582
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरा हो केसुशेट... च्यायला
पेद्रो द गावानंतर
वाहव्वा!! छान बेत! (झाझिकी
मस्त
मस्तच हो केसु. खाली तळटीप
च्यामारी..
In reply to मस्तच हो केसु. खाली तळटीप by गणपा
वा वा!
मस्त हो केसु..
व्वा:... अजून एक मस्त
तू इकडे ये गं, दोघी मिळून
In reply to व्वा:... अजून एक मस्त by मस्त कलंदर
काही
In reply to तू इकडे ये गं, दोघी मिळून by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वयंसंपादनाची गरज उदाहरण क्र ३ (ह. घे.)
राजेशशेठ..
In reply to स्वयंसंपादनाची गरज उदाहरण क्र ३ (ह. घे.) by राजेश घासकडवी
मस्तच पाकक्रुती
मस्त उद्या करावि का?
१५
हा हा..
In reply to १५ by श्रावण मोडक
म्हणजे...
In reply to हा हा.. by केशवसुमार
ओ मिभोशेठ,
In reply to म्हणजे... by मिसळभोक्ता
मस्त पाकृ... पण (ह्या. प्र.
केसु शेठ आजपासुन मिपा
धन्यवाद