Skip to main content

CE मार्कची वांगी!!!!?????

लेखक मिलिंद यांनी शुक्रवार, 30/07/2010 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षक वाचूनच दचकलात ना!! अहो मी तर ही वांगी पाहूनच गार झालो. वांगी तीही CE मार्कची आणी माझ्या पिशवीत? मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला पण नाही हो मी जागाही होतो (आणी भारतातच होतो) सीई मार्कचे वांगे १ सीई मार्कचे वांगे २ त्याचं झालं असं मी माझ्या कोकणातल्या गावाहून पुण्यात परतत असताना बहीणीकडे थांबलो. बहिणीने तिच्या छोट्याशा बागेतली वांगी दिली भरीत करायला. पण मग या वांग्यावर CE मार्क कसा आला? हे तपासण्याकरीता मी माझी पिशवीही तपासली. मग या मागचे कोडे उलगडले. बहिणीच्या डेस्कटॉपच्या किबोर्डचा प्रॉब्लेम होता. तो किबोर्ड बदलण्यासाठी मी पुण्यात आणला येताना निघण्याची घाई झाल्याने तो वांगी असलेल्या पिशवीतच भरला. त्यावरचा CE मार्क मग वांग्यांनी प्रवासादरम्यानच उचलला असावा. असो भाव खाऊन गेली हो ही वांगी. पण नंतर त्याचं भरीत करुन उट्ट काढलं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3171
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

क्वर्टी कळफलकावर सी खालच्या ओळीत आणि ई वरच्या ओळीत. मधल्या ओळीत डी आहे, तो कसा काय नाही आला बॉ ?

In reply to by मिसळभोक्ता

हा मार्क असा आहे हा इलेक्ट्रिकल कॉनफॉर्मन्सचा CE आहे. इथे पहा. (कीबोर्डाच्या खालच्या भागावर वांगे दाबले जाऊन हा उमटला असणार.)