मासे १२) जवळा
लागणारे साहित्य:
जवळा एक किंवा दोन वाटे,
बेसन १ ते दिड वाटी
१ कांदा बारीक चिरुन
आल लसुण, पेस्ट
२-३ मिरच्या बारीक कापुन किंवा २ चमचे मसाला
थोडी कोथिंबीर चिरुन
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल
पाककृती:
जवळा निवडून धुवुन घ्यावा. निवडायचा म्हणजे कधी कधी ह्यात दुसरे बारीक मासे, छोट्या चिंबोर्या असु शकतात ते काढायचे.
तेल वगळून वरील सगळे जिन्नस एकत्र करावे. पाणि घालु नये. मग चपट्या वड्या करुन तव्यावर शॅलो फ्राय करायच्या.
ह्या तयार वड्या :
अधिक टिपा:
ह्यात तुम्ही आवडीनुसार गरम मसाला घालू शकता.
लसूण कापुन घातल तर अजुन चांगल्या लागतात.
वाचने
8180
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
मस्त करुन बघीन वीकांताला! एक
खादाड, हे मोठे झिंगे नाही
वाह!!!!!! गरमागरम चहा बरोबर
कोलंबी
In reply to कोलंबी by जागु
व्वा! काय छान महिती दिलीत
धन्यवाद!
अरेरे!
पाप का प्रियाली ?
In reply to पाप का प्रियाली ? by जागु
:-(
आहो माहीत आहे मस्करी ते पण
व्वा!!!!!!!!!!!!!!
असेच म्हणतो
मस्त आहे पाकृ... इकडे जवळा
यम्म!
धनंजय, दिपाली कोलंबीजी भजी