काही प्रश्न
काही प्रश्न
वेळ :- सकाळचे १०वा.काही मिनिटे
स्थळ :- टिळक रोड वार्ड ऑफिस पुणे. खिडकी क्रं. ७ जन्म मृत्यू नोंदणी.
मी :- नमस्कार,मला जन्म नोंदणी करायची आहे,फॉर्म द्या.
कर्मचारी :- हा घ्या फॉर्म पण आज नोंदणी नाही होणार,आज आमचा कॉम्प्युटर बंद आहे.
मी :- कधी होईल चालू ???
कर्मचारी :- काही सांगता येत नाही.
मी :- अहो, एक तर तुमच ऑफिस २रा आणि ४था,शनिवार बंद,मी परवाच्या मंगळवारी आलो तर सकाळी १०:५० ला सुद्धा तुमच्या खिडकीत कोणीच नाही. आणि आज कॉम्प्युटर बंद आहे. मी धायरीतन इथ येतो १२ किमी यायला लागतंय मला फक्त एका कामासाठी आणि जर इथ आल्यावर तुमचा कॉम्प्युटर बंद असेल तर माझी फेरी वाया नाही काय गेली? मी आज तिसरेंदा इथ आलो त्यापैकी २ वेळा तुमचा कॉम्प्युटर बंदच होता.
(कर्मचारी अतिशय थंडपणे मन डोलावतो.)
मी :- ठीक आहे ,मी वार्ड ऑफिसरच्या नावे अर्ज करतो आणि हे सगळ त्यात लिहितो.
मी त्यानंतर एक अर्ज लिहिला त्यात या सगळ्या गोष्टी लिहिल्या,त्याची एक xerox काढली आणि जिथ अर्ज जमा करतात त्या खिडकीवर जाऊन जमा केला आणि म्हणालो या xerox वर मला पोच द्या.
कर्मचारी :- नाही साहेब अशी पोच नाही देता येत.
मी :- अहो नियमाप्रमाण मला अर्जाची पोच द्यायलाच पायजे तुम्ही.
कर्मचारी(तुसडेपणान) :- नाही देता येणार.
शेजारचा कर्मचारी :- अरे देऊन टाक की, काय फरक पडणार आहे आपल्याला?
मग पहिल्या कर्मचाऱ्यांन अतिशय मोठा उपकार केल्यासारखा चेहरा करून त्या xerox शिक्का मारून सही केली. आणि मग दुसर काहीच काम नसल्यान मी घरी परत निघालो.जाता जाता रस्त्यात माझ्या लक्षात आल की पुण्याचे उपमहापौर आणि टिळक रोड वॉर्ड कमिटीचे अध्यक्ष प्रसन्न उर्फ दादा जगताप यांच ऑफिस सिंहगड रोडवरच आहे.
मग बघू काय मदत होती काय त्यांची म्हणून मी त्यांच्या ऑफिसात गेलो. ऑफिसात जायच्या आधीच ज्या xerox वर मी पोच घेतलेली होती,त्याचीच अजून १ xerox केली आणि त्याच्यावर लिहील कि " कृपया यात लक्ष घालावे हि नम्र विनंती". साहेब ऑफिसातच होते. मी गेलो नमस्कार वगेरे झाल आणि त्यांच्या समोर कागद ठेऊन मी म्हणालो कि साहेब मी आज तिसरेंदा गेलो वार्ड ऑफिसात पण तरीही नाव नोंदणी होत नाही, तर या बाबतीत आपली मदत पाहिजे. साहेबांनी पहिल्यांदा तो अर्ज परत माझ्या हातात दिला आणि म्हणले याचा काहीच उपयोग नाही व्हायचा,असं म्हणून त्यांनी स्वतःचच १ व्हिजिटिंग कार्ड घेतलं आणि त्याच्या मागच्या बाजूला एका माणसाचं नाव लिहील आणि मजकूर लिहिला कि "...... हे माझे जवळचे मित्र असून त्यांना जन्म दाखला मिळवून देण्यास मदत करावी" त्याच बरोबर त्या माणसाचा मोबाईल नंबरहि लिहिला. ते कार्ड माझ्या हातात देत म्हणाले हा जो मनुष्य आहे तो जरी शिपाई असला तरी सगळी काम करून देतो त्याला हे दाखवा आणि मग तो तुमच काम करून देईल. आणि त्याला १०० एक रुपये देउन टाका काम झाल्यावर! मी त्यांना म्हणालो दादा एक विचारू? जर १०० रुपये देऊनच जर काम करायचं होत तर मी तुमच्याकड कशाला आलो असतो? माझ मी सुद्धा केलंच असत कि ते? यावर अतिशय उग्र चेहरा करून साहेब म्हणाले " मी तुम्हाला रस्ता सुचवला आहे आता काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा "! मग मी तिथून सरळ निघालो.
या नंतर मला पडलेले काही प्रश्न पडले :-
१) उपमहापौर या सारख्या महत्वाच्या पदावर काम करणारा माणूस असे सल्ले कसे काय देऊ शकतो?
२) जन्म नोंदणी सारख्या बेसिक कामासाठी जर १०० रु. द्यायला लागत असतील तर मोठ्या कामांसाठी किती पैसे खर्च करावे लागतात?
३) मला मुळातच असे पैसे वैगेरे देऊन काम करून घ्यायला आवडत नाही मी आजपर्यंत पैसे देऊन कोणतेही काम करून घेतलेले नाही,पासपोर्ट,रेशन कार्ड काहीच नाही तर हे चुकीच आहे काय?
४) सगळ्यानी (यात सासू सासरे सुद्धा आले) मला असा सल्ला दिला की द्यायचे होते १०० रु आणि करायच होत काम पण अजूनही मी हट्ट सोडलेला नाही, मग बरोबर कोण मी काय बाकीचे सगळे?
अवांतर :- अजूनही मला मुलाच्या जन्माची नोंदणी करून घ्यायला जमलेल नाही या शनिवारी परत जाणार आहे.(ही ७ वी खेप असेल)
प्रतिक्रिया
कटकटी
+१
-१००
भारतात लोकशाही नसुन नोकरशाही
नितिन थत्तेंशी असहमत. हा
१ हेच म्हणतो!
वा! अशी ऑनलाईन तक्रार सुविधा
थत्त्यांशी पुर्णपणे असहमत. हव
लाच....
जिप्सींशी सहमत
काही प्रश्न
माझा वैयक्तिक अनुभव असा आहे
हेच का ते?
प्रश्न सत्याचा नाही, संभाव्य आरोपांचा आहे
मला घासकडवी यांचं म्हणणं
लेख काढू नये
डिस्क्लेमर
हा डिस्क्लेमर संपादक मंडळास
आबा पाटलांच्या ब्लॉगवर जाहीर तक्रार करा.....
प्रश्न सुटला !!!
खेप
आप महान हो विनायकजी!!!
पुढची खेप