✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कषाय-दान

प — पुष्कर, Tue, 06/08/2010 - 14:48
(संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून, मागितलेले दान) आता खाद्यात्मके देवे, येणे खाद-यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे, कषाय-दान हे| जें पळीभर शर्करा सांडो, तया इंसुलीनची गती वाढो पात्रात परस्परे पडो, दूध म्हशीचे| मधुमेह्यांचा मेद जावो, विश्व सदुग्ध-कषाये पिवो जो जें वांछील तो ते लाहो, मानव-जात| वर्षत सकळ मंगळी, चहाबाजांची मांदियाळी भरभरून पात्रान्तरी, देत तू चहा| चला चहापत्तींचे आरव, आसामातले जणू ते गाव बोलते जें अर्णव, कषायांचे| वेलची आल्याचे चूरण, मिसळून करी जें प्राशन ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु| किं बहुना सर्वसुखी, लाईम टी करुनी पिती अथवा कोरा चहा पिती, अखंडित| आणि कषायोपजीविये, विशेषी लोकी इये घोटा घोट विजये, होआवे जी| येथ म्हणे श्री खाद्येश्वरावो, हा होईल दान कषायो येणे वरे हा शंतनो, तवाना जाला| - पुष्कर ऊर्फ शंतनु भट

प्रतिक्रिया द्या
2572 वाचन

💬 प्रतिसाद (9)

मस्त

नितिन थत्ते
Tue, 06/08/2010 - 15:00 नवीन
मस्त. (सर्व प्रकारचा चहा आवदणारा) नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

कषाय

तिमा
Sun, 06/13/2010 - 11:20 नवीन
कषाय म्हणजे काय हे फक्त अस्सल सारस्वतांनाच कळेल. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments

कषाय

पैसा
Sat, 09/04/2010 - 23:18 नवीन
आमच्या गोव्यात सर्दी झाल्यावर जो काढा करतात, त्याला कषाय (कसाय) म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

हल्ली कसली

टारझन
Sun, 06/13/2010 - 23:37 नवीन
=)) =)) =)) हल्ली कसली तरी पेंगुळवाणी रसग्रहणं येत आहेत त्या पेक्षा हे लै भारी आहे ;) जियो !! - संत खाणेश्वर
  • Log in or register to post comments

हाहाहा.

पुष्कर
Mon, 06/14/2010 - 11:49 नवीन
"हल्ली कसली तरी पेंगुळवाणी रसग्रहणं येत आहेत त्या पेक्षा हे लै भारी आहे".. बर बर. धन्यवाद
  • Log in or register to post comments

मन जिंकलस मित्रा

सागर
Mon, 07/26/2010 - 12:46 नवीन
पुष्करा, सर्वच "कषायदान" हे सुंदर आहे ... केवळ अप्रतिम ... खास करुन या ओळी फार आवडल्यात जें पळीभर शर्करा सांडो, तया इंसुलीनची गती वाढो पात्रात परस्परे पडो, दूध म्हशीचे| किं बहुना सर्वसुखी, लाईम टी करुनी पिती अथवा कोरा चहा पिती, अखंडित| आणि कषायोपजीविये, विशेषी लोकी इये घोटा घोट विजये, होआवे जी| आणि सुरुवातीचा विनय तर तुझ्या नम्रपणाची पावतीच (संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून, मागितलेले दान) मन जिंकलस मित्रा :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पुष्कर
Mon, 07/26/2010 - 20:38 नवीन
सागर, आभारी आहे. विनय वगैरे काही नाही (ह्यातही काही विनय नाही.. नाहीतर 'ये तो आपका बडप्पन है' वगैरे कैच्यकै म्हणायचे), पसायदान हे खूप भारी आहे. कषायदानावर हसू येत असेल तर ते मला स्वतःला माझ्या अगाढ अज्ञानाविषयी आणि मूर्खपणाविषयी आलेले हसू आहे.
  • Log in or register to post comments

प्रतिभा आहे :)

सागर
Sun, 08/08/2010 - 20:00 नवीन
पुष्कर मित्रा, अशा प्रकारच्या निर्मितीसाठी प्रतिभा लागते ती आहेच तुझ्यापाशी तेच महत्त्वाचे आहे. बाकी विष्णुगुप्त लेख मालेमुळे तुझी प्रतिभा जास्त माहिती झाली ... आता कैच्याकै म्हणून पुन्हा प्रतिसाद देण्यापेक्षा स्वतःला समजाव कसं ;) पाय जमीनीवर आहेत तेच महत्त्वाचे आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर

धन्यवाद सागर. (असं किती वेळा

पुष्कर
Sat, 09/04/2010 - 11:54 नवीन
धन्यवाद सागर. (असं किती वेळा म्हणू!) विष्णुगुप्त काही केल्या पुढे सरकत नाहीये. अजून १ महिना तरी काही खरं नाही.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा