खरबी आणि कोलंबी असे पावसाळ्यात वाटे मिळतात. हॅयाच्या कॉम्बिनेशनचे कालवण म्हणजे ह्या दिवसातिल चविष्ट मास्यांमधील एक. ही बहुतेक खाडीतुन मच्छी येते. त्यामुळे अजुन चविष्ट असते.
खरबी इतर छोट्या माश्यांसारखी म्हणजे खवल काढून पोट साफ करुन शेपुट काढायचे. कोलंबीच्या डोक्यावरील तुरा काढावा पुर्ण डोक काढू नये. कारण डोक्याच्याच भागाला जास्त चव असते. व शेपुट आणि मधली शेपटे काढावीत.
साहित्य :
१ वाटा खरबी कोलंबी,
८-१० लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
२ चमचे मसाला
थोडा चिंचेचा कोळ
चविपुरते मिठ
थोडी कोथिंबीर,
१ मिरची मोडून
तेल
पाककृती:
प्रथम तेलावर लसणीची फोडणी द्यायची. मग त्यावर हिंग, हळद, मसाला घालुण ढवळून चिंचेचा कोळ, खरबी कोलंबी, मिठ कोथिंबीर व मोडलेली मिरची घालून कालवण उकळू द्यावे. ३-४ मिनीटांनी गॅस बंद करावा.
हिच खरबी कोलंबी मिठ, मसाला, हिंग, हळद लावुन तळता येते. कोलंबी तळायला वेळ लागतो. कोलंबी वेगळी तळायला टाकायची.
अधिक टिपा:
कोलंबी तळायची म्हणजे शॅलो फ्राय करायची. ती करत असताना थोडा वेळ झाकण ठेवल वरुन तर लवकर शिजते.
कालवण करत असताना गॅस मिडीयम ठेवायचा नाहीतर खरबी तुटते.
कालवण
वाचन संख्या
5971
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
टू गुड
वॉव कसली
+१
In reply to वॉव कसली by गणपा
भारी!
पाकक्रिया द्या...
In reply to भारी! by सहज