रस्त्यावरील अपघात
भोचक यांना कधी प्रत्यक्षात जरी भेटलो नसलो तरी, आज हूरहूर लागली आहे. जो काही थोडाफार संवाद झाला तो आधी पण पुरेसा नव्हता, पण आता अधूराच राहणार याचे वाईट वाटत राहील. हे माझ्याबाबतीतच नाही तर अनेकांच्या बाबतीत खरे आहे असे राहून राहून वाटते.
पण अशा चांगल्या आणि होतकरू व्यक्तीच्या अकाली मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना केवळ श्रद्धांजली म्हणून थांबणे जीवावर येत आहे. अशी शोक व्यक्त करण्याची वेळ का यावी हा प्रश्न टोचत आहे. अशी वेळ कुणावरही येऊ नये हीच प्रार्थना... ई-सकाळमधील त्याच्या अपघाताच्या बातमीच्या बाजूस संबंधीत बातम्यांकडे नजर गेली तर काय दिसले?
* अकोल्याकडे जाणारी बस उलटून २८ प्रवासी जखमी
* कुसुंबा, नेरजवळ अपघातात दोन ठार, ३ जखमी
* क्रेनसह विहिरीत पडून उंभर्टीत मजुराचा अंत
* मोटारसायकलसह दोन तरुण उड्डाणपुलावरून ३० फूट खाली
* सायने शिवारात घर कोसळून महिला ठार
जेंव्हा कोणीतरी ओळखीतले अशा अपघातात असते तेंव्हा जे जाणवते ते अशा इतर बातम्यांकडे जाणे शक्य नसते, त्यात अपराधीपणाची भावना असण्याची गरज नाही. पण खरेच याला दुर्दैव म्हणून सोडून द्यावे का? हा प्रश्न पडला आणि थोडी जालावर शोधाशोध चालू केली. त्यात भारत सरकारच्या "रोड ट्रान्स्पोर्ट अँड हायवेज" मंत्रालयाच्या संकेतस्थळावरून अस्वस्थ करणारी माहीती मिळाली: (दुवा)
यातील विदा वापरुन खालील आलेख काढला:
एक २००० सालच्या सुमाराचा अपवाद सोडल्यास रस्त्यावरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढतच चाललेले दिसते. अभिनयच्या अपघाताची बातमी कुठेतरी वाचतानाच असाच अजून एक तरूण पत्रकार गेल्यावर्षी अपघातात गेल्याचे वाचले. जागतिक आरोग्य संघटनेच्या गेल्या वर्षीच्या अहवालाप्रमाणे, भारतात आणि इतरत्र, रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण हे देखील एखाद्या रोगराईसारखे पसरत आहे. भारतात, दर तासाला १३ जणांना अपघातात मृत्यू येतो. शिवाय जाणार्या व्यक्तींबरोबर त्यांचे मागे राहीलेले कुटूंबिय आणि उध्वस्त झालेले संसार लक्षात घेतले तर त्याचे प्रमाण हे अधिकच भयावह आणि अस्वस्थ करणारे आहे...आणि हो, यात रेल्वेचे अपघात धरलेले नाहीतच...
अनेक अपघातात राजकारण्यांचे (काँग्रेस) अथवा त्यांच्या नातेवाईकांचे (शिवसेना) गेल्याचे आपण वेळोवेळी वाचले आहेत. कालानुरूप त्या बातम्या मागे पडतात, त्यात काही गैर नाही, पण परत असे घडू नये अथवा त्याचे प्रमाण हळूहळू कमी व्हावे यावरून सतत लागणारे लोकशिक्षण आणि स्वाध्याय आपण करत असतो का हे पहायची वेळ आधीपण होतीच आणि अजूनही आहेच आणि प्रमाण कमी झाले तरी कायमच रहाणार आहे. यात केवळ सरकारने काय करावे आणि काय करत नाही इतकाच मुद्दा नसून प्रसारमाध्यमे (ज्यांचे पण त्यांच्यातील व्यावसायिकांच्या जाण्याने नुकसान होते) तसेच समाजसेवी संस्था आणि अर्थातच तुम्ही-आम्ही सगळ्यांचाच विविध स्तरांवर सहभाग लागणार आहे.

- गाडीचालकाचा परवाना देताना नक्की काय शिकवले जाते आणि शिकले जाते?
- रस्त्यावर शिस्त पाळली जाते का? - सर्व वाहनचालक, पादचारी, सायकलवाले आदी...
- आता भारतात गाड्या वाढत आहेत - त्याबरोबर गाड्या चालवत फिरणे देखील. कधी कधी डोळ्यावर ताण येतो तर कधी खूप थकव्याने ग्लानी येते अथवा झोप येते. अशावेळेस कुठलाही पुरूषार्थ न समजता आपण बाजूला थांबून किमान ५-१० मिनिटे डोळ्यांना विश्रांती देतो का? अथवा बरोबर दुसरा/री चालक असेल तर गाडी चालवायला त्यांना देतो का? हे खूप महत्त्वाचे आहे.
- मद्य पिऊन गाडी चालवणे हे असेच एक अजून आमंत्रण आहे. त्याच्या मर्यादा सांभाळता येणे महत्त्वाचे आहे. - स्वत:साठी आणि रस्त्यावरील इतरांसाठी देखील.
- ट्रान्स्पोर्ट कंपन्यांनाना त्यांच्या ड्रायव्हर्सना (विशेष करून ट्रक ड्रायव्हर) सक्तीचे शिक्षण आणि "झिरो टॉलरन्स" आमलात आणायला लावणे महत्त्वाचे आहे. तसेच ज्या ट्रान्स्पोर्ट कंपन्यांच्या वाहनांकडून अपघात होतात, त्यांना दंड करणे आणि नावे जाहीर करणे, वगैरे शिक्षांची पण गरज आहे. हे केवळ खाजगीच नाही तर पिएमटी आणि इतर शहरातील तत्सम बस सेवा, एसटी आदींना पण बंधनकारक होणे महत्त्वाचे आहे.
- जर कोणी अपघातात अडकलेले दिसले तर जिथे शक्य आहे तेथे मदत पण किमान पोलीसांना फोन करून मदत करायचे काम आपण केले पाहीजे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अस्वस्थ
चिरीमिरी
खरे आहे.
तुम्ही
अमोल
अशाप्रसंग
आकडेवारी
उपलब्ध डेट्याच्या मर्यादेत
चिंताजनक
वाहनसंख्येची बेसुमार वाढ
बंगलोर
अगदी!
सहमत
वाहनांची गती +
लेखकाची
..
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात
अपघात
चालक
अपघात
>>कारण
मारहाण चुकीचीच
+१
आता
रात्रीचा
अतिशय काळजी वाटावी अशी आकडेवारी!
पादचारी मार्ग
सहमत, पण
अगदी अगदी
पादचारी मार्गांवर अतिक्रमण किंवा अस्वच्छता नसतानाही
तुमच्या खरडवहीत कसे खरडावे?
...
या संघटनेला कार्यकर्त्यांची गरज आहे...
आकडेवारी
काही (असमाधानकारक) उत्तरे
काहि सुधारणा
मला
एकच उत्तर-
मृत्यूदंड? अरे बापरे...
आकडेवारी
भारतात काहीही होणे शक्य नाही,
पु. ल. आणि आम्ही पुणेकर ...
सिट बेल्ट
पुण्यात
उपाय नाही
ही
मोबाईल
एक उपाय
भारतातील वाहतुक कायदा (सु???) अवस्था
वाचत आहे.