नविन कथासंग्रह
मंडळीनमस्कार,
हल्लीमिसळपावचा साहित्य क्षेत्रात उमटलेला ठसा जसा प्राजुच्या कविता संग्रहान रेखीव झाला तसाच आणखी एक ठसा उमटला आहे आपल्या सहप्रवासी अरुण मनोहरांच्या कथा संग्रहाचा!! या बद्दल माहिती मिळाली.
अरुण मनोहर हे थोडस लांबुन पाहिलेल व्यक्तिमत्व. एकतर वयान ते जेष्ठ!! आणि सर्व कार्यक्रमात त्यांचा असलेला पुढाकार!
सिंगापुरच्या मराठी साहित्यिक क्षेत्रात, अरुण मनोहर हे नाव माहित नसलेली व्यक्ती विरळच! अतिशय परिश्रम पूर्वक उभारलेल्या 'शब्दगंध ' या कवितेला वाहिलेल्या उपक्रमाच्या पाच स्तंभांपैकी अरुण मनोहर हे एक! सिंगापुरातील हा उपक्रम पाच वर्षांहून अधीक काळ दर महिन्याला सुरू आहे.
नावाप्रमाणे अतिशय 'मनोहर' हसत मुख असं हे व्यक्तिमत्व! मुळचे नागपूरकर! तिथेच अभियांत्रिकी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी कामानिमित्य रहाण्याची संधी यांना मिळाली. अमेरिका, फ़्रान्स, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, हॉन्गकॉन्ग, जपान, ईंडोनेशिया, फ़िलीपाईन्स, कोरिया, आणि सिंगापूर इतक्या ठिकाणी वैविध्यपूर्ण संस्कृतींच्या सहवासातल वास्तव्य या कवी मनाच्या व्यक्तिमत्वावर उमटलं नसेल तरच नवल!! ते गेली दहा वर्षे मेट्रो रेलच्या संगणकी नियंत्रणाच्या विविध प्रकल्पांवर कार्यरत आहेत. १९८२ पासून पत्नी- चित्रा आणि दोन मुलांसह सिंगापूर मधेच स्थायीक! पण मुळची मराठी साहित्याची आवड अन मराठी मातीची नाळ कायम राखत ते अविरत महाराष्ट्र मंडळ अथवा शब्दगंध अशा विविध कार्यक्रमात कुटुंबासहित कार्यरत असतात. मिसळपाव व्यतिरिक्त त्यांच लिखाण दिवाळी अंक, नियतकालिके आणि इतर मराठी संस्थळांवर सुद्धा प्रकाशित झाल आहे.
त्यांचापहिला कथा संग्रह, "रोजाक – एक गोपाळकाला", पुण्याच्या नंदिनी पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रकाशित झाला आहे. १८ जुलाईच्या शब्दगंध कार्यक्रमात सिद्धहस्त लेखिका विद्युल्लेखा अकलुजकर ह्यांचे हस्ते उद्घाटन झालं.
भारताच्या बाहेर राहून आलेले वैविध्यपूर्ण अनुभव त्यांनी या संग्रहात कथा रूपाने एकत्रित मांडलेले आहेत.
त्यांच्याच शब्दात सांगायचं तर," ह्या कथासंग्रहात मी बनवलेली सिंगापूरी मिसळ चोखंदळ वाचकांना चाखायला दिली आहे. वेगवेगळ्या चवींच्या १६ कथांचा हा "रोजाक" संग्रह आहे. सिंगापुरात "रोजाक" ही स्नॅकी डीश मिळते. गुणधर्माने ती आपल्या भेळ-मिसळला खूप जवळची आहे. माझ्या ह्या रोजाकमधे थोडा चायनीज व्हीनीगरचा शिपका, भारतातील तिखटागोडाची मिसळ, आणि कोरीयातील किमची देखील घातली आहे. जोडीला भविष्यकाळातले काही अफ़लातून फ़ुटाणे मिसळले आहेत. हे "रोजाक" किंवा गोपाळकाला रसिकांना आवडेल अशी आशा करतो."
एका
'मिसळपाव'करानी उमटवलेल्या या साहित्य क्षेत्रातला ठश्यानं आपला आनंद द्विगुणीत केल्या बद्दल ' अरुण मनोहर' यांचे हार्दिक अभिनंदन.

प्रतिक्रिया
अरे वा!
हेच म्हणतो
अभिनंदन
फोटोज सरळ
फोटोज सरळ
अरुणकाकां
हार्दिक
अरुणकाकांचे हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अरूणकाकां
अरुण
हार्दिक अभिनंदन
अरे वा,
अभिनंदन!
हार्दिक
असेच म्हणते.
अरुणकाकां
हार्दिक
धन्यवाद
अभिनंदन हं
अभिनंदन !!!!!!
मस्त
अभिनंदन!
अभिनंदन! छा
हार्दिक
हार्दिक