✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुगम रूप सुहावे...

व
विसोबा खेचर यांनी
Sun, 10/07/2007 - 17:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17969 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

"आपण तर

राजे (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 10/07/2007 - 21:19 नवीन
"आपण तर साला खल्लास.... :)" सहमत. राजे (*हेच राज जैन आहेत ह्यांना संगीतातले ओ की ठो कळत नाही पण प्रतिसाद मात्र वा... क्या बात है, सुंदर.. मजा आ गया.. ह्या पध्दतीचा देतात) माझे शब्द....
  • Log in or register to post comments

वा! तात्या!

प्रमोद देव
Sun, 10/07/2007 - 21:37 नवीन
झकास! आवडले.
  • Log in or register to post comments

जियो!!!

मनिष
Sun, 10/07/2007 - 22:37 नवीन
हस्ताक्षर गेले चुलीत!! हा लेख फारच सुरेख आहे. हजार गुन्हे माफ! मेहदी हसन ची "आये कुछ अब्र कुछ शराब आये" गजल पण यमनमधेच आहे ना?
  • Log in or register to post comments

मस्त ट्यूटोरियल

धनंजय
Mon, 10/08/2007 - 00:11 नवीन
याचा नीट अभ्यास करायचा म्हणजे वेळच लागेल. तात्यांना, वरदांना धन्यवाद! (अगदी इथेच नको, पण बंदिशींचे नोटेशन कुठेतरी डकवाल का? म्हणजे तुम्ही विशिष्ट सौंदर्यस्थाणांची वर्णने करता त्याचा आणखी सहज अभ्यास होऊ शकेल...)
  • Log in or register to post comments

तात्या

आर्य चाणक्य
Mon, 10/08/2007 - 07:55 नवीन
आपला लेख आम्हाला आवडला! छानच झाला आहे. -चाणक्य
  • Log in or register to post comments

रसिकांना धन्यवाद..

विसोबा खेचर
Mon, 10/08/2007 - 08:31 नवीन
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांना मनापासून धन्यवाद... धन्याशेठ, मला थोडीफार स्वरांची ओळख आहे. नोटेशनही (स्वरावली) ओळखता येते. परंतु ते मला लिहिता मात्र येत नाही. एक तर त्याच्या लिपीबाबत मला फारशी महोती नाही आणि जी काय आहे त्यात 'भातखंडे पद्धती' आणि 'पलुसकर पद्धती' यात नेहमी गोंधळ उडतो.. असो. तात्या.
  • Log in or register to post comments

कायकिणींची मतवारीही ऐका

धनंजय
Mon, 10/08/2007 - 10:39 नवीन
यमन/कल्याणची उदाहरणेच उदाहरणे : http://www.sawf.org/newedit/edit01142002/musicartst.asp कायकिणींची मतवारी इथे (सुरुवातीला "हे मना कैसे गाऊं" खयाल मग त्याच रेकॉर्डिंगमध्ये मतवारी) : http://www.sawf.org/audio/kalyan/kaikini.ram तात्या, काय सुंदर गृहपाठ करायला पाठवले तुम्ही, वा! वरदांचे गाणे ऐकताना पकड शोधायला गेलो, आणि हे संकेतस्थळ सापडले.
  • Log in or register to post comments

शाब्बास धन्याशेठ,

विसोबा खेचर
Mon, 10/08/2007 - 11:33 नवीन
धन्याशेठ, गृहपाठ केल्याबद्दल मी तुला मनापासून शाबासकी देतो..:) संगीताचा अभ्यास जेवढा करू तेवढा कमीच आहे. आणि जसजसा आपला अभ्यास वाढतो तसतसा अधिक आनंद मिळतो. हा एक न संपणारा प्रवास आहे. सीडी, आंतरजाल, इत्यादी हे मार्ग चांगलेच आहेत परंतु प्रत्यक्ष मैफलीही अधिकाधिक ऐकल्या पाहिजेत. अभिजात संगीताची प्रत्यक्ष मैफल ऐकताना एखादा कलाकार कसा गातो, कुठल्या पद्धतीने गातो, राग, बंदिशी कश्या मांडतो, ताला-लयीचं काम कसं करतो इत्यादी अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मी गेली २० वर्ष तरी मैफलीतलं गाणं ऐकतो आहे तेव्हा आत्ता आत्ता कुठे थोडाफार स्वरलयीचा अंदाज येऊ लागला आहे. परंतु अजून खूप दूर जायचं आहे याचीही जाणीव आहे... हा कधीही न संपणारा गृहपाठ आहे! :) आपला, (मैफलीत रमणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

सजधज रंगत

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/09/2007 - 01:15 नवीन
तात्या, "सजधज रंगत" अतिशय आवडली. फार सुंदर कॉम्पोजिशन केलं आहेस. मान गये, उस्ताद ! मंडळी, मुखड्यात तान असलेल्या बंदिशींचं सौंदर्यच वेगळं! अगदी खरं आहे. "जियरा" मुखड्यातच पकड घेते. - (कानसेन) सर्किट
  • Log in or register to post comments

सर्किटराव,

विसोबा खेचर
Tue, 10/09/2007 - 07:25 नवीन
तात्या, "सजधज रंगत" अतिशय आवडली. फार सुंदर कॉम्पोजिशन केलं आहेस. मान गये, उस्ताद ! आमच्या बंदिशीला आवर्जून दाद दिल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कलाकाराचा हुरूप वाढतो... आपला, (आनंदीत) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

छोटा कलाकार ????

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/09/2007 - 09:00 नवीन
नाही नाही, हे त्रिवार शक्य नाही... आपण फार "मोठे" कलाकार आहात तात्या.. आम्ही प्रत्यक्ष भेटलोय आपल्याला.. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

खरं आहे! :)

विसोबा खेचर
Tue, 10/09/2007 - 09:09 नवीन
आपण फार "मोठे" कलाकार आहात तात्या.. आम्ही प्रत्यक्ष भेटलोय आपल्याला.. हम्म! खरं आहे..:) आम्ही आकाराने 'मोठेच' कलाकार आहोत. पण आम्ही कलेच्या संदर्भात म्हणत होतो, देहयष्टीच्या संदर्भात नव्हे...:)) आपला, (देहयष्टीने मोठा, परंतु संगितिक दृष्ट्या छोटा कलाकार!) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

असे नव्हते म्हणायचे

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 10/09/2007 - 11:33 नवीन
तात्या, तुम्ही उगाच गैरसमज करून घेतलात. अहो, आपल्याशी प्रत्यक्ष झालेल्या चर्च्जेतूनच आम्ही आपल्याला "मोठे" कलाकार म्हणतोय... फक्त आकारावरून म्हणायचे असते, तर अदनान सामी आमचा दोनेक वर्षांपूर्वी फेवरीट असता... - (डीडशे पौंडाचा) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

नजर नगा

सहज
Tue, 10/09/2007 - 10:39 नवीन
नजर नगा लावू तात्याच्या गायकीला काढील तो बाक तुमच्याच बॉडीला म्हणाल का बरे भेटलो मी आपल्याला पुढे लावेल तुम्हा यमन हो गायला रडाल मग "यम" ये ना रे घ्यायला का बरे भेटलो मी आपल्याला ------------------------------------------------------- तात्या माफी असावी. रहावले नाही. सुरवात त्या जंगली* ने केली * "याहू" करतो ना जंगलीमधला शम्मी ह. घ्या. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

सहजराव,

विसोबा खेचर
Tue, 10/09/2007 - 12:12 नवीन
तात्या माफी असावी. रहावले नाही. सुरवात त्या जंगली* ने केली * "याहू" करतो ना जंगलीमधला शम्मी ह. घ्या. :-) अहो ते ठीक आहे, परंतु आपण जर बंदिशी कश्या वाटल्या हेही सांगितले असतेत तर अधिक बरे वाटले असते! कदाचित आपल्याला बंदिशी आवडल्या नसतील किंवा आपल्याला संगीताचीच आवड नसेल! असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सुंदर बंदिशी.

अशोक गोडबोले
Tue, 10/09/2007 - 12:41 नवीन
तात्यासाहेब, चारही बंदिशी उत्कृष्ट आहेत. आपण तानपुराही अगदी उत्तम लावला आहे. तानपुरा लावणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आपल्या संगीत व्यासंगाला प्रणाम! अशोक गोडबोले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

विसोबा खेचर
Wed, 10/10/2007 - 07:58 नवीन
गोडबोलेसाहेब.. आपल्यासारख्या रसिकाने दाद दिली याचा आनंद वाटला... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक गोडबोले

देत हृदय आनंद

नंदन
Wed, 10/10/2007 - 14:04 नवीन
तात्या, गाण्यातलं काही विशेष कळत नसलं तरी सार्‍या बंदिशी आवडल्या. 'देत हृदय आनंद' झालं :). बाकी 'आषाढस्य प्रथम दिवसे' बद्दलही अजून वाचायला/ऐकायला आवडेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments

पुरणपोळीचं उदाहरण! :)

विसोबा खेचर
Wed, 10/10/2007 - 14:40 नवीन
तात्या, गाण्यातलं काही विशेष कळत नसलं तरी सार्‍या बंदिशी आवडल्या. 'देत हृदय आनंद' झालं :). याकरता मी नेहमी पुरणपोळीचं उदाहरण देतो. माझी आई पुरणपोळी कशी करते, त्यात काय काय घालते, प्रमाण काय घेते, यातलं मला काहीही कळत नाही. तरीही तिने केलेली पुरणपोळी मला अतिशय आवडते आणि मी फक्त ती चवीचवीने खाण्याशीच मतलब ठेवतो.. गाण्याचंही तसंच आहे. गाणं कळलं नाही तरी आवडल्याशी कारण! आणि तेच महत्वाचं!... बाकी 'आषाढस्य प्रथम दिवसे' बद्दलही अजून वाचायला/ऐकायला आवडेल. हो, पुढचे भाग लिहायचा विचार आहे. सवडीने लिहितो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

लय ह्याप्पी जालो

धम्मकलाडू
Wed, 10/10/2007 - 15:53 नवीन
झकास तात्याभाई. यमणकल्याण, बांदिश काही समाजल न्हाइ. पान वाचताना लय ह्याप्पी झालो. तात्या खराच लय म्होटा मानूस हायस की. यखाद्या मिठुणच्या गान्यावर लिहि णा छाण असे रसग्रहण. (काणसेण ) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments

गाणी आवडली

अमित.कुलकर्णी
Wed, 10/10/2007 - 20:35 नवीन
तात्या, youtube वरची तुमची सगळी गाणी पाहिली / ऐकली - आवडली.
  • Log in or register to post comments

छान

कोलबेर
Wed, 10/10/2007 - 21:22 नवीन
तात्या लेख छान लिहीला आहे.. पण आम्हाला संगीतातले इतकेच कळते :- Image removed.
  • Log in or register to post comments

संगीत अज्ञान

प्रकाश घाटपांडे
Wed, 10/10/2007 - 21:34 नवीन
संगीता विषयी आम्हाला भीतीयुक्त आदर, असूयायुक्त आदर असल्याने संकल्पनात्मक संगीतविषयक माहिती देणारे (इतर संगीतप्रेमींना बाळबोध वाटले तरी) लेखन झाले तर आम्हालाही काही आकलने होईल. संगीत ऐकून कानाला बरं वाटत एवढेच आम्हाला संगीत समजते. त्यावरुन आम्ही उपक्रमावर खालील प्रतिसाद दिला होता (संगीतप्रेमींनी ह घ्या) नजाकत अली खॉ आणि कयामत अलि खॉ हे दोघे जुळे बंधू. अगदी एकाला झाकावे व दुसर्‍याला काढावे.दोघांची संगितातील जुगल बंदी म्हणजे आमच्या सारख्या(अज्ञ) लोकांना सुद्धा मेजवानीच. सुप्रसिद्ध डागर बंधू हे तज्ञ संगीतप्रेमी लोकांना माहित असतील. पण आम्हाला काय त्याचे? (कारण डागर बंधू हे संगीताशी संबंधीत आहेत एवढेच आमचे ज्ञान.) पण हे नजाकत अली खॉ आणि कयामत अलि खॉ मात्र एकदम फेमस अप्रसिद्ध ,एकाचे विलंबित बोल तर दुसर्‍याचे प्रलंबित बोल. एकाचा ख्याल तर दुसर्‍याचा खयाल. एकाचा ताल तर दुसर्‍याचा टाळ. एकाचा लोटा तर दुसर्‍याचा घोटा. हे सगळे काही मला पचनी पडेना. मग मी आमच्या तज्ञ (अल्पज्ञ) मित्राला विचारले कि हा काय प्रकार आहे? मग त्याने सांगितले कि यातील एक "किराणा" घराण्यातील आहे तर दुसरे "भुसार" घराण्यातील आहे. पण महेफिलित कोण कुठल्या घराण्याचा हे कुणालाच सांगता येत नाही. हा वाद जुना आहे . तू त्यात पडू नकोस. तेव्हापासून मला संगीतप्रेमी तज्ञांबद्द्ल असूया युक्त भीती , आणि भीतीयुक्त आदर वाटत आहे. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

व्वा

मितभाषी
Mon, 07/19/2010 - 15:42 नवीन
व्वा तात्या! मान गये उस्ताद. भावश्या
  • Log in or register to post comments

तात्या,

ब्रिटिश
Mon, 07/19/2010 - 21:20 नवीन
तात्या, स्साला आपल्या बॉडीमदी देवान संगीताचा जीनच टाकला नाय रं. कायव कलत नाय बोल ! तरीपन आपल आवडत गानं : 'हे सुरांनो चंद्र व्हा ' मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा