बोईटाची खवले काढून त्याचे पोटाला चिर पाडून पोटातील घाण काढावी, शेपुट व पर काढावेत. मग जर बोईट मोठे असतील तर त्याचा शेपटाकडील भाग , डोके आणि मधला भाग असे तिन भाग करावेत. डोके व शेपटाचा भाग कालवणासाठी वापरावे व मधला भाग तळण्यासाठी वापरावा. जर छोटे असतील तर दोन तुकडे किंवा अख्खेच ठेवावेत.
मोठ्या बोईटाला पिळसा म्हणतात.
लागणारे साहित्य:
बोईटाच्या कालवणाचे साहित्य :
बोईट ४-५
लसूण ५-६ पाकळ्या ठेचुन
हिंग
हळ्द,
२ चमचे मसाला
चवी पुरते मिठ
तेल
चिंचेचा कोळ
वाटण : आल अर्धा इंच, लसूण ५-६ पाकळ्या, कोथिंबीर, मिरची १, ओल खोबर ४ चमचे.
पाककृती :
बोईटाच्या कालवणाची कृती :
टोपात तेलावर लसणाची फोडणी देउन हिंग, हळद, मसाला घालून त्यात वाटण घालावे वर बोईटांचे तुकडे घालावेत. वर वाटण, चिंचेचा कोळ मिठ, गरजे पुरते पाणी घालून उकळवावे. ४-५ मिनीटांत गॅस बंद करावा.
हेच बोईट हिंग, हळद, मसाला, मिठ लाउन तव्यावर शॅलोफ्राय करता येतात.
वाचन संख्या
6556
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
) परवाच
खल्लास!निल
गणपा तु पण.
In reply to खल्लास!निल by आंबोळी
आईशप्पत!
वा वा! --Life is a
अतिअवांतर
In reply to वा वा! --Life is a by विसोबा खेचर
आजचा बेत.
स्वाती २०
मासे