नमस्कार मंडळी >:)
प्रोजेक्ट गो लाइव्ह नंतरचा पहिला निवांत शनिवार आज ऑफिसला जायचे नव्हते :P .. त्यामुळे काल सर्व टीम मेंबरांनी अडवे होईपर्यंत 8| सुरा प्राशन करून मुकादमाला (म्हणजे अस्मादिक) मध्यावर बसवून भरपूर तोंडसूख घेतले होते :B .. त्यानंतर सर्वांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी पोचवून झोपायला पहाटेचे ३.३० वाजले #:S (|: अर्थातच जाग यायला सकाळचे (?) ११:३० वाजले..सर्व आन्हिके उरके पर्यंत दुपारचे १ वाजले L) ब्रेकफास्ट करण्यात आता काहीच अर्थ नव्हता :D आणि लंच करत बसायचा कंटाळा आला होता I) मग कसाबसा उत्साह गोळा करत नेहमीचा यशस्वी ब्रंच , मसाला ऑम्लेट आणि ब्रेड बेत पक्का केला
चला तर मग साहित्य लिहून घ्या.. B)
साहित्य:
सर्व साहित्य एका माणसाला पुरेल ह्या हिशोबाने दिले आहे..
२ अंडी
१ लहान कांदा
१/२ टोमॅटो
१/२ बटाटा
१/२ टेबल चमचा काळा मसाला
१/२ टेबल चमचा कांदालसूण मसाला
लाल/हिरव्या मिरच्या तुमच्या ऐपती नुसार
मीठ, कोथिंबीर आवडीनुसार
जिरे पूड, धणे पूड, हळद, बटर (ह्या.प्र.कि.ते मा.न. त. आ.स्व.पा.ठे.ला.ना.अ.स. )
कृती :
कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्या, बटाट्याचे पातळा काचरे करा
गॅसवर पॅनमध्ये आपल्या डायेट प्लॅन नुसार बटर गरम करा
त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि बटाट्याच्या काचरर्या टाका आणि खरपूस परता
एका भांड्यात दोन्ही अंडी फोडून घ्या त्यात मीठ,धणे-जीरे पूड, हळद,काळा मसाला, कांदालसूण मसाला घालून चांगले फेटून घ्या. कांदा आणि बटाट्याच्या काचरर्या तांबूस झाल्यावर त्या पॅन मध्ये फेटून एकजीव केलेली अंडी घाला. वरून कोथिंबीर टाका.
पॅनवर झाकण ठेऊन ५ मिनिटे ऑम्लेट शिजू द्या.
नंतर ऑम्लेट उलटवून पुन्हा २-३ मिनिटे शिजू द्या.
ढॅन्ट ढॅन.. झाले मसाला ऑम्लेट तयार..जोडीला ब्रेडचे स्लाइस आणि गारेगार पीच आईस टी..
१० मिनिटात फडशा.. चा. पु. सा. के.
नंतर मुखशुद्धीला ब्रझीलीयन कोकोनट कुकीज.. :P
एक जोरदार ढेकर :\
आणि हो तयारी मध्ये वामकुक्षीची आधीच तयारी करून ठेवा हे सांगायचे विसरलो.. (|: O:)

वाचने
8634
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
कधी येताय परत?
पालखीचं म्हणताय का ऑम्लेटचं?
In reply to कधी येताय परत? by श्रावण मोडक
हाहाहाहा
In reply to पालखीचं म्हणताय का ऑम्लेटचं? by चतुरंग
मस्तच
चाटून
अगदी हेच
In reply to चाटून by भडकमकर मास्तर
शानबाशेठ,
In reply to अगदी हेच by शानबा५१२
मला वाटल
In reply to शानबाशेठ, by केशवसुमार
फोटू छान
बटाटा
In reply to फोटू छान by रेवती
>> स्पॅनिश
In reply to बटाटा by केशवसुमार
यम्मी! माझा
In reply to >> स्पॅनिश by ३_१४ विक्षिप्त अदिती
बघायला तरी
In reply to >> स्पॅनिश by ३_१४ विक्षिप्त अदिती
सही
In reply to बघायला तरी by विजुभाऊ
आम्लेटात
मस्त! पण
सह्ही
चालू द्या.
गुर्जी या
मस्त चखना.......!
ब्बोलाऽऽऽ
खतर्नाक!!!
वा!
बटाटे मला
हाफफ्रायच
कुणीच कसे म्हणत नाही...
मस्त. करून