जिंकले एकदाचे स्पेन..
समस्त स्पेन चाहत्यांचे अभिनंदन.. खास करुन आमच्या डॉनरावांचे.
साखळीसामन्यातला पहिला सामना हरुन फायनल जिंकणार्या स्पेन ने आज इतिहास रचला.
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
आपण रेफरीच्या बाजूने बाबा.. त्याने फायनल मध्ये रेड न देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण खेळाडुच अतिआक्रमक खेळले त्याला तो तरी काय करणार बिचारा.. पण अलोन्सोवाला नक्कीच रेड होता. असो. आता स्पेन आणि हॉलंड मध्ये रम्मीचा सामना आहे! ;)
हो आणि स्पेनचं मनापासून अभिनंदन! दाव्हिद व्हियाला गोल्डन बूट न मिळाल्याचा आनंद सुद्धा आहे! :D
सगळी म्याच संपल्यावर शेवटची शिटी झाल्यावरही डच खेळाडू रेफरीशी का भांडत होते बुवा?
मला वाटलं हा रेफरी बुवा म्याच सम्पल्यावरही काही कार्डं पाकिटांचं वाटप करणार
एकदाचे स्पेन जिंकले. रॉबीनने खूप प्रयत्न केला पण डचांना गोल करता आला नाही. दोन्ही गोलकीपर चांगले खेळले.
स्पेनला पहील्यापासुन पाठिंबा देणार्या सदस्यांचे अभिनंदन डॉन्या, ऋषिकेश
रेफ्री दणादणा यलो कार्ड दाखवताना पाहून मात्र नाना, चौपाटी व एक सदगृहस्थ आठवले.
:-)
सर्व स्पॅनिश खेळाडुंचे, स्पेनच्या जनतेचे व आमच्यासरख्या स्पेनसमर्थकांचे हार्दिक अभिनंदन!!
हॉलंडच्या खेळाडूंचेही द्वीतीय क्रमांकाबद्दल अभिनंदन!!
हे अस्मादिकांचे लागोपाठ दुसरे पाठिंबा-जेतेपद असे सांगून जाताजाता भाव खाऊन जातो ;) (गेल्यावेळी इटलीला सपोर्ट केल्यावरही मित्रमंडळींनी वेड्यात काढले होते)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
पहिल्या हाफमधे णेदरलँड्सवाले नुसती मारामारी करत होते. केवढी ती पिवळी कार्ड. पण स्पेन जिंकलं. सही वाटलं. मजा आली. लक्षात राहील असा सोहळा. संपल्याची चुटपुट सुद्धा वाटते आहे.
तिसर्या स्थानासाठी झालेली जर्मनी - उरुग्वे लढत ही 'फुटबॉल' या खेळाच्या नावाला साजेशी होती.
कालची अंतिम लढत मात्र आपण फुटबॉल ऐवजी किकबॉक्सिंगचा नवा प्रकार पहात आहोत काय? (११ विरुद्ध ११) असे वाटण्याजोगी होती. हॉलंडने धुसमुसळा खेळ करून स्पेनच्या नजाकतदार खेळाचा पुरता बोर्या वाजवला.
त्यामुळे मॅच पहायला मजा आली नाही.
असो.
स्पेन जिंकणारच होते. ते कसेबसे जिंकले. इतकेच!
अगदी अगदी!!!
ह्यांना नक्की फुटबॉल खेळायचा होता की स्पेनचे खेळाडू अनफिट करायची सुपारी दिली होती तेच कळेना.
असो! म्याच फुटबॉलची म्हणुन पहायला गेलो आणि गल्लीतला मारामारी खेळ बघायला लागल्यागत वाटलं तेव्हा टिव्ही बंद करुन गप झोपलो. :)
कसेही करुन स्पेनच्या खेळाडूंना जायबंदी करायचे असाच डाव होता की काय कोण जाणे? कोणतीही नजाकत, ड्रिबलिंग, सफाईदार चढाया वगैरेवर भर न देता फक्त धक्काबुक्की आणि कसेही करुन चेंडू काढून घेणे असे सुरु होते. स्पेनला त्यांचा खेळ करुच दिला नाही. कसाबसा एक गोल करुन मॅच संपवली!
(आशियातल्या नजाकतदार हॉकीची जशी धसमुसळ्या युरोपियन खेळाने वाट लावली त्याची आठवण झाली! :()
चतुरंग
आम्ही गाजावाजा करणार नाही !
दणादण ढोल वाजवणार नाही !
आमच्या 'उगाच' विरोधकांना खवचट खरडीही टाकणार नाही !
प्रतिसादात स्पेनचे झेंडेही नाचवणार नाही !
फक्त,
फक्त "थँक्स टु स्पेन" एवढेच म्हणतो.
आम्ही जो विश्वास स्पेनवर टाकला होता तो त्यांच्या जिगरबाज टीमने पानीपतात घालवला नाही.
शान राखली फुटबॉलची ...
इतिहास आणि आकडेवरी ही पुन्हा रचण्यासाठीच असते.
स्पेन नक्कीच ह्याला काबिल आहे.
अभिनंदन आणि धन्यवाद स्पेन !!!
अवांतर :
ही केवळ पोच, ह्यानंतर 'स्पेनच विजय' आणि 'थँक यु फुटबॉल' हा फिफा विभागाचा माझ्याकडुन समारोपाचा असलेला लेख थोड्या विश्रांतीने येईल.
कालच्या भयानक जागरणाने व आजच्या अंमळ बिझी स्केज्युलमुळे आज लिहणे जमणार नाही.
------
(आनंदी)छोटा डॉन
कालच्या मॅचमधली पीतकार्ड पहाता 'आकडेवारी आणि सांख्यिकी' असं कालच्या मॅचच्या धाग्याचं नाव ठेवावं लागेल.
डच लोकं फार धसमुसळे खेळले, विशेषतः पहिल्या अर्ध्या भागात ... अगदी मिपावरचा शंभराहून अधिक प्रतिसाद खेचणारा धागा आठवावा असे! ;-)
अदिती
तुला धडाधड उडणारे प्रतिसाद आठवले, मला तर 'धडाधड पडणार्या विकेट्स' आठवल्या. असो, गेले ते दिन गेले! ;-)
असो, आमचा दीड युरो फुकट गेला, भडक भगवी टोपी काल 'कामी आली'.
अदिती
... अगदी मिपावरचा शंभराहून अधिक प्रतिसाद खेचणारा धागा आठवावा असे!
अगदी.
बॉलवर सावरकर आणि गांधी, बेळगाव सीमाप्रश्न, जेम्स लेन असं काहीसं लिहिलेलं असावं असं वाटलं. एखाद्या 'गोल' कडे चर्चा जाण्याऐवजी अवांतर प्रतिसादासारखाच साईडलाईनच्या बाहेर खूप वेळा बॉल जात होता. एकमेकांना पाय घालून पाडणं, बॉलच्या मिषाने एकमेकांना लाथाळ्या करणं हेही. रेफरी मात्र बरंच काम करत होता. खेळाडूंना समुपदेशन करणं, व त्यांनी ऐकलं नाही तर वेळोवेळी पीतपत्रिका दाखवणं - क्वचितप्रसंगी रक्तपत्रिकाही...
त्यामानाने जर्मनी वि उरुग्वे मॅच उपक्रमावरील चर्चेसारखी झाली. लांबलचक पल्लेदार चढाया, लाथा कमी कोपरखळ्या जास्त वगैरे वगैरे...
स्पेन चे अभिनंदन =D>
पण मज्जा नव्हती कालच्या सामन्यात. स्कोअरलाइन पुन्ह एकदा १-० #:S
त्यापे़क्षा जर्मनी-ऊरूग्वे लढत रंगतदार होती.
आपण तर फोर्लान चे चाहते झालो ह्या वर्ल्ड कप पासून :D
बाकी गोल्डन बूट चे मानकरी फोर्लान, व्हिला आणि स्नायडर चे अभिनंदन!!!
प्रतिक्रिया
सांगता
हॉलंडनी
आक्रमक
In reply to हॉलंडनी by शुचि
लोल धत्ताड
असहमत
In reply to लोल धत्ताड by प्रभो
लक्षात
In reply to असहमत by गणपा
१७ राव..
In reply to लक्षात by स्वप्निल..
डान्याकडु
जिंकले
ऑक्टोपस पॉलचे अभिनंदन!!
ऑक्टोपस
In reply to ऑक्टोपस पॉलचे अभिनंदन!! by चतुरंग
रेफरी अंमळ
हा हा हा!!
In reply to रेफरी अंमळ by भडकमकर मास्तर
हो ना.. अगदी
In reply to हा हा हा!! by चतुरंग
तरी कमी
In reply to हा हा हा!! by चतुरंग
आपण
In reply to तरी कमी by प्रभो
तीनपत्ती
In reply to आपण by मेघवेडा
कल्लूमामा!
In reply to तीनपत्ती by प्रभो
लई जास्त कार्ड दिली..
स्पेनचे
हि फायनल
होय
In reply to हि फायनल by शिल्पा ब
बरं... ****************
In reply to होय by रेवती
सगळी म्याच
अभिनंदन डॉनराव
हा हा!
In reply to अभिनंदन डॉनराव by सहज
हॅ हॅ हॅ
In reply to हा हा! by चतुरंग
सर्व
फपहिल्या
हॉलंडचा धुसमुसळा खेळ
+१
In reply to हॉलंडचा धुसमुसळा खेळ by विसुनाना
+२ हॉलंडचा खेळ म्हणजे निव्वळ मारामारी होती!
In reply to +१ by धमाल मुलगा
Mission Accomplished ....
ते तुमचं
In reply to Mission Accomplished .... by छोटा डॉन
आकडेवारी आणि सांख्यिकी
In reply to Mission Accomplished .... by छोटा डॉन
अगदी
In reply to आकडेवारी आणि सांख्यिकी by ३_१४ विक्षिप्त अदिती
विकेट्स
In reply to अगदी by Nile
... अगदी
In reply to आकडेवारी आणि सांख्यिकी by ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहाहा
In reply to ... अगदी by राजेश घासकडवी
स्पेन चे
२०२६ पॉल बाबाकी जय हो!!!!!!
हॅ हॅ हॅ!!
In reply to २०२६ पॉल बाबाकी जय हो!!!!!! by गणपा
२०१२
In reply to २०२६ पॉल बाबाकी जय हो!!!!!! by गणपा
स्पेनचे
हॅ हॅ हॅ!!
In reply to स्पेनचे by बिपिन कार्यकर्ते
हा हा
In reply to हॅ हॅ हॅ!! by चतुरंग
माझापण *
In reply to हा हा by गणपा