महाराष्ट्रातील एक एमआयडिसी
छोटा कारखाना
थोडी फार मशिनरी.
इंजिनियरींग जॉबवर्क्स ची कामे घेवुन ती पुर्ण करणारा उद्योजक.
कारखाना सुरु होवुन दोनच वर्षे झालेली.
पीएफ इएसआयसी केवळ कायम कामगारांना.
कायम कामगार मोजुन ८.
जादा कामाचे पैसे मिळतात. त्यांचा पगार वेळेवर. हा मुद्दा नाही
बाकी १०-१२ तात्पुरते, १२-१५ कॉन्ट्रॅक्टरची.
कॉन्ट्रॅक्टरला २५० रु माणशी, अधिक ओटी वगैरे दिले जातात. तो त्यातले १५ टक्के कापुन कामगारांना देतो. हा पण मुद्दा नाही
तात्पुरते गेटवर कधी काळी आलेले. भरलेले.
दिवसाला १२५ ते १७५रु.
१२ तास काम. महिन्यातले २५ दिवस.
जादा कामाचा हिशोब नाही.
१२ तास ड्युटी.
कागदोपत्री ८ तास, पगार २५० रु. हा पण मुद्दा नाही.
काही दिवसांपुर्वी जे काम तात्पुरते कामगार करायचे (ज्यातले बहुतेक मराठी होते) त्यांना ब्रेक दिला. ब्रेक दिलाच जातो. आठ दिवसांनी परत काम असते. मुद्दा तो नाही.
ब्रेक दिल्यावर काही जणांना बोलावलेच गेले नाही. त्यांच्या जागी काही परप्रांतीय भरले गेले. हरकत नाही. पण त्यांना पगार दिला गेला ७०रु. १२ तासांचे. कारखान्यात मागच्या बाजुला असलेली खोली त्यांना रहायला. दोन वेळेचा चहा आणि नाश्ता मालकाकडुन. मालकाला दर दिवशीचा खर्च ८५रु. कुणीही मालक आपला खर्च कमी करणारच. मुद्दा तो नाही.
काढलेल्या कामगारांनी मालकाशी बोलणी केली. मालक म्हणतो ८५ रु रोजाने या ! काम देतो.
कुटुंब असलेल्या किंवा नसलेल्या कारखान्यापासुन थोडे लांब रहाणा-या कुणालाही हे परवडणार नाही. त्यामुळे त्याच्याकडे काम न करता दुसरीकडे करणार. दुसरीकडे पण हीच परिस्थिती होत आहे.
त्या कामगारांनी काय करावे? केवळ परिस्थितीपायी शिकु शकले नाही, शेती पाण्याअभावी करपली म्हणुन शहरात येवुन काही काम करणारी मंडळी अनस्किल्ड वर्कर म्हणुन काम शोधतात. किमान काही वेतन मिळावे अशी अपेक्षा असतांना त्यांच्यावर तुटपुंज्या वेतनावर काम करणे किंवा उपाशी रहाणे ही पाळी येते.
सरकार किमान वेतन तसेच नोकरीत चतुर्थ श्रेणीच्या कामात स्थानिक लोकांना प्राधान्य अशा महत्वाच्या मुद्दयाकडे डोळेझाक करत आहे.
काय करावे?
वाचने
3470
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
आरे नाना
गणपाशी
In reply to आरे नाना by गणपा
मनसे
उपाय आहे.
एक सार्वत्रीक अनुभव
हाच अनुभव
आपण सरकार
सरकार कशाला वेतन देईल?
In reply to आपण सरकार by शानबा५१२
सरकार
In reply to सरकार कशाला वेतन देईल? by चिन्मना
कामगारांच
वा वा छान
महाराष्ट्
+१००००००००००००००००००००
In reply to महाराष्ट् by जयंत कुलकर्णी
नाना, अगदी