मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नेदरलँड अंतिम फेरित....

बबलु · · विशेष
विशेष
उरुग्वे ला ३-२ ने मारून नेदरलँड अंतिम फेरित पोहोचली आहे. [माझ्या मते नाहितरी उरुग्वे किंचीत रडीचा डाव खेळून उपांत्य फेरीत पोहोचली होती (आठवा... घाना विरुद्धचा 'तो' हँडबॉल). त्यामुळे उरुग्वे हरल्यामुळे मला थोडा आनंदच झाला नियमाप्रमाणे त्यात चुकिचं काही नाही, पण खिलाडूपणाही नाही म्हणता येणार. हे माझं वैयक्तिक मत आहे]. असो. नेदरलँड - उरुग्वे सामना मस्तच झाला. सर्वच गोल अफलातून होते. त्यातल्या त्यात उरुग्वेने केलेला दुसरा गोल एकदमच कडक. दोन्ही टीमनी जरा ढिसाळ डिफेंडिंग केलं, चुकीचे पासेस दिले, आणि अंमळ सेमिफायनलला साजेसा काही प्रोफेशनल खेळ केला नाही. तरीही पहायला जाम मजा आली. आता डोळे उद्याच्या जर्मनी - स्पेन सामन्यावर. (असो.... कोणीही जिंकलं तरीही यावेळी युरोपचा घोडा विन मदी). ....बबलु

वाचने 11623 वाचनखूण प्रतिक्रिया 43

Nile Wed, 07/07/2010 - 04:02
मागच्या मॅचला उरुग्वेने रडीचा डाव खेळला याबाबत असहमत आहे. जर रीप्ले पाहिला तर लुई हेड करायचा प्रयत्न करत आहे असे दिसते अशी अर्ग्युमेंट होउ शकते. शिवाय त्या क्षणी गोल वाचवणे हाच मुख्य उद्देश असल्याने हात लावला जाउ शकतो. (घाना थोडीशी सरस होती हे मात्र सहमत आहे, पण दुर्दैव, शेवटी आजही दुर्दैवाने स्नाईडरच्या गोलवेळी ऑफसाईड असुनही दिली गेली नाहीचकी!) आजची मॅच छान झाली, बचाव ढिसाळ होते हे खरे आहे. स्नाईडर गोल्डन बुटसाठी वियासह आघाडीवर गेला आहे. उद्याची मॅच माझ्यासाठीतरी फायनल आहे, जो जिंकेल तोच कप घेईल असे आमचे भाकित आहे. (बुट मात्र विया किंवा क्लोसा ला मिळावा अशी इच्छा आहे) -Nile

In reply to by Nile

बबलु Wed, 07/07/2010 - 06:10
असं काही समजू नका नाईलशेठ.... नेदरलँड चकवा देउ शकते. :) (दर वर्ल्डकपला किमान एक डार्क हॉर्स निघतोच). :) :) पण जर्मनीचं पारडं यावेळी जड आहे, हे मान्य. ....बबलु

In reply to by रंगोजी

Nile Wed, 07/07/2010 - 19:58
अवघड आहे, फोरलॉन समोर जर्मनी किंवा स्पेन असेल त्यामुळे त्याला गोल करायची संधी कमी आणि त्याच बरोबर प्रतिस्पर्ध्याला गोल करायची संधी जास्त असल्याने फोरलॉनला मिळणे फार अवघड आहे. फोरलॉन छान खेळतो, पण ह्या स्पर्धेत विया आणि क्लोसे त्यापेक्षा सरस आहेत हे मानावे लागेल. -Nile

नाटक्या Wed, 07/07/2010 - 04:50
या सामन्यात थोडासा रडीचा डाव खेळले.. दुसर्‍या गोलच्या वेळेस ऑफ-साइड होता पण ... असो.. - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

आमचा आपला ठरलेला प्रतिसाद. ;) डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!! डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!! डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!! डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!! डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!! डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!! डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!! डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन Wed, 07/07/2010 - 14:59
हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =))

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!! हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!! हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!! हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!! हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघवेडा Wed, 07/07/2010 - 15:54
गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप!
=))
गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप!
=))
गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप!
=))
गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप!
=))

रंगोजी Wed, 07/07/2010 - 15:05
विधान क्र. १ : या वर्षी सगळ्या जगात युरोप भारी विधान क्र. २: या वर्षी सगळ्या युरोपात ईटलीतली टीम भारी -रंगोजी (आमच्यायेथे वडाची साल पिंपळाला लावून मिळेल)

गणपा Wed, 07/07/2010 - 15:25
कालची मॅच फार रटाळ झाली हे माझ वैयक्तिक मत. असेच खेळले तर हॉलंडच काही खर नाही अंतिम सामन्यात. बाकी आजच्या पुरता आम्ही देव पाण्यात ठेवले आहेत. ( स्पेनला ला घाबरण्याचा प्रश्नचं नाही पण त्या पंचांचा काही भरवसा देता येत नाही. कालपण साला एक ऑफसाईडचा गोल देउन टाकला. एखदा चुकीचा निर्णय आख्खी मॅच फिरवु शकतो. इंल्गंड आठवतय ना ;) )

In reply to by गणपा

छोटा डॉन Wed, 07/07/2010 - 15:52
आत्तापासुनच सुरवात झाली का ? म्हणे पंचांचा भरवसा देता येत नाही, अहो स्पेनने काय पंच माद्रिदमधुन आयात केले आहेत का ? असो. काल नेदरलँड्स जिंकल्याचा आम्हाला आनंद झाला. वेल्सी स्नायडर आणि आयन रॉबेन हे आमचे आवडते मिडफिल्डर्स आहेत व त्यांनी काल गोल मारल्याने डब्बल आनंद झाला. फायनलला त्यांनी स्पेनविरुद्ध गोल नाही तर तिब्बल आनंद होईल ;) ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

मेघवेडा Wed, 07/07/2010 - 15:56
शेवटच्या वाक्यातला आपला फुकाचा कॉण्फिडण्स पाहून तुम्हीच सांगितलेली ती अंड्यांची गोष्ट आठवून ड्वाले पानावले! ;)

In reply to by मेघवेडा

छोटा डॉन Wed, 07/07/2010 - 16:04
आत्ताच डोळे पाणवले ? एवढ्या लवकर ? बरं बरं, असो असो ! अवांतर : च्यायला २-४ कविता पाडुन ठेऊ का ? जर्मनी जिंको किंवा स्पेन, जरा राडा झालाच पाहिजे ... ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

रंगोजी Wed, 07/07/2010 - 15:57
वैसे भी स्नायडर-रोब्बेन ने माद्रिद मे रहके स्पेन का नमक खाया है -(नमकहलाल) रंगोजी

In reply to by छोटा डॉन

गणपा गुरुवार, 07/08/2010 - 01:50
. आभिनंदन आभिनंदन आभिनंदन आभिनंदन आभिनंदन ही जागा मुद्दाम राखुन ठेवत आहे. संध्याकाळी येउच इथे ;)

In reply to by छोटा डॉन

अहो स्पेनने काय पंच माद्रिदमधुन आयात केले आहेत का ? ते पण चालले असते हो एखादेवेळेस... पण तिसरेच पंच ठेवून मग चुकीचे निर्णय देऊन म्याच आपल्या बाजूने फिरवायचा डाव असला म्हंजी? बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन Wed, 07/07/2010 - 16:02
जाऊ द्या मालक. अहो तुम्ही ४-४ गोल मारणारी मान्स, यखांदा निर्णय चुकीचा लागला तर त्यात काय मोठेसे. ;) बाकी आज काय मग मोबाईल बंद काय ? ;) ------ छोटा डॉन

In reply to by धमाल मुलगा

टारझन गुरुवार, 07/08/2010 - 01:56
लोल .. धम्या काय हापपिच बॉल सोडना =)) =)) =)) आज आम्हाला जर्मणी हारल्या पेक्षा बिका-गणप्या हारल्याचा आणंद झाला आहे =)) आता आमचा हॉलंड चषक उंचावणार ;)

In reply to by टारझन

धमाल मुलगा गुरुवार, 07/08/2010 - 02:07
येड्या यवढा भारी पेनल्टी कॉर्नर मिळालेला कोण सोडेल? आन ते पण समोर कोण तर बिपीन श्वाइन्टायगर असताना? =)) =)) =)) असा चानस कधी मिळतो का? ;) >>आता आमचा हॉलंड चषक उंचावणार घ्या घड!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

छोटा डॉन गुरुवार, 07/08/2010 - 02:27
१ अपडेट : आत्ताच बिकांना फोन लावायचा प्रयत्न केला. फोन लागला आणि त्यावर "स्पेन पाठिराख्यांनो चालते व्हा ..." अशी डायलर टोन होती. आम्ही घाबरुन फोन ठेऊन दिला. बाकी काही माहित नाही. असो. ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

Nile Wed, 07/07/2010 - 19:55
त्या रॉबीन च्या आयच्या गावात गोगलगाय! एक नंबरचा *#($#(@#)@) आहे (@)*$%(#)#)#. खेळण्यापेक्षा इतरांना पकडण्याचं काम जास्त करतो फोकलीचा. -Nile

In reply to by गणपा

जे.पी.मॉर्गन Wed, 07/07/2010 - 16:32
गणपा... ह्या वेळेस फिफानं पंचांना अजून एक अ‍ॅडिशनल जबाबदारी दिली आहे. रटाळ सामन्यात रंग भरायची. एखादा संघ आरामात जिंकतोय असं वाटलं की किडा करून दुसर्‍याला गोल मारून द्यायचे!!!! शेवटी काय... सामना म्हंजे कसा.... अस्सा झाला पाहिजे !!!! म्हणून हे सगळे किडे!! जे पी

रंगोजी Wed, 07/07/2010 - 15:38
फायनलमधल्या प्रतिस्पर्धी संघाला अंधारात ठेवण्यासाठी काल डच तसे खेळले ओ.. -रंगोजी

मराठमोळा Wed, 07/07/2010 - 16:18
जर्मनी - स्पेन मधे जो जिंकेल तो विश्वकप घेऊन जाईल असे वाटते. स्पेनचे चान्सेस जास्त. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

जर्मनीच्या भविष्य वर्तवणार्‍या ऑक्टोपसने आधीच स्पेनच्या बाजूने कौल दिलेला आहे. त्यामुळे आज कोणावरच पैसे नाहीत. बाकी जर्मनीने अर्जेंटीनाची कशी पिसे काढली ते पाहून अंमळ हळवा झालो होतो. पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अनिल हटेला Wed, 07/07/2010 - 18:17
जर्मनीच्या भविष्य वर्तवणार्‍या ऑक्टोपसने आधीच स्पेनच्या बाजूने कौल दिलेला आहे. ही बातमी आम्ही देखिल वाचली.. पण अतीशय उत्तम संघ असलेल्या जर्मनीने असं भविष्य खोटं ठरवावं.( आणी ते ठरवतील देखिल) एकुण काय आज ची मॅच जो जिंकेल तो कप घेउन जाइन... जर्मनीस best of luck !!:) बैलोबा चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D

विसुनाना Wed, 07/07/2010 - 17:27
या (नेदरलँड वि. उरुग्वे) मॅच पेक्षा पहिल्या साखळी फेरीतील काही मॅच जास्त चांगल्या होत्या. दोन्हीकडून बकवास खेळ झाला. आक्रमण चांगले झाले म्हणून गोल झाले असे नव्हे तर बचाव बेकार होता म्हणून गोल झाले.

In reply to by विसुनाना

Nile Wed, 07/07/2010 - 20:03
खरे आहे, दोन्ही टीम्स इथे येण्याच्या लायकीच्या नाहीत हेच आम्ही केव्हांपासुन म्हणत आहोत. सेमिफायनलच्या लायकीची मॅच झाली नाही. पण त्या टिम्सनुसार मॅच छान झाली, अशीच होईल अशी अपेक्षा होती (तरी उरुग्वेचा एक स्ट्राईकर नव्हता काल) :) -Nile