Skip to main content

खेळ विभाग

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 06/07/2010 20:38 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1296
प्रतिक्रिया 53

प्रतिक्रिया

बाडीस

अर्थात, नक्कीच! >> मिपावर क्रिकेटमधे रस असणारे बरेच जण आहेत. त्यांची पर्वणी होईल. अगदी मनातलं बोललास! पर्वणीच खरी!

आपल मत हो ला चालु दे मस्त आहे कल्पना चांगली आहे ______________________________ संपादक घाश्या कोतवाल भुर्जीपाव डॉट कॉम

"हो" ला मत दिले आहे. कल्पना छानच आहे. मात्र जर असा विभाग कायमस्वरूपी करण्यात काही तांत्रिक अडचणी (मुख्यत्वे जागा) असतील तर किमान लेखन/काथ्याकूट आदी करताना "क्रिडा" ह्या लेखनविषयाबरोबरच किमान चॉइसेस ठेवावेत (उ.दा.: क्रिकेट, टेनीस, फूटबॉल, चेस वगैरे). -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

हो ला मत दिले आहे. छान कल्पना आहे.

भारताने जगाला दिलेली अजुन एक देणगी (अश्या अनेक दिल्या आहेत, तरी झोळी भरलेलीच आहे.. आणि घेणार्‍यांची फाटकी) दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

होय !! -(खेळाडुंचा खेळाडु , खेळाडु नं१ , अंतरराष्ट्रीय खेळाडु , खेळाडु , तु आंडुपांडु मी खेळाडु , श्री आणि सौ खेळाडू ) टारझन कुमार

मिपावर खेळ विभाग असावा का? याविषयावर कृपया आपले मत/सुचना द्यावे.
हो, असावा..मिपाला अजून समृद्ध करणारा विभाग असेल तो..! छान कल्पना, छान कौल.. (एक मिपाकर) तात्या.

उत्तम कल्पना!! खेळांशी संबंधित सर्व धागे कायम एकत्रित राहतिल. -रंगोजी

'हो' ला मत दिले आहे. मला खेळात तसा फारसा रस नाही त्यामुळे हे मत म्हणजे 'हो' ला 'हो' करण्यासारखेच झाले.;) पण इतर सदस्यांना हा विभाग आवडेल व कधीतरी मलाही खेळ आवडू लागतील ही आशा! रेवती

In reply to by रेवती

>>पण इतर सदस्यांना हा विभाग आवडेल व कधीतरी मलाही खेळ आवडू लागतील ही आशा! करेक्ट. खरे सांगायचे तर आत्तापर्यंत अशाच प्रतिसादाची वाट पहात होतो. आम्हाला खेळ आवडतो, आम्ही तो अगदी मनापासुन पाहतो व त्यावरुन भरभरुन लिहतो, आमच्यासारखे अनेक जण आहेत. पण केवळ आमच्या आम्ही हे लिहण्यात व त्याचा आनंद घेण्यात जास्त मज्जा नाही. ज्यांना खेळ आवडत नाही व त्यातली जास्त माहिती नसल्याने त्यात रुची निर्माण होत नाही त्यांच्यासाठी हा विभाग असेल. आम्ही इथली माहिती अशा प्रकारे सादर करु की विश्वास ठेवा हा 'खेळ' तुम्हाला नक्कीच आवडेल. जेव्हा तुमच्यासारखे खेळाकडे त्रयस्थ दृष्टीने पाहणारे सदस्य ह्यात रस घेऊन, मनापासुन खेळ एंजॉय करतील व त्यावर आमच्या काँपिटिशनला भरभरुन लिहतील तेव्हाच हा 'खेळ विभाग' काढल्याचा हेतु सफल होईल. मिपावरचे खेळात जास्त रुची नसणारे सदस्य आम्ही एक आव्हान म्हणुन स्विकारत आहोत. आम्ही तुम्हाला हा खेळ आमच्या 'खेळ विभागा'च्या मार्फत नक्की आवडुन दाखवु, आपण स्वतःही हे पाहुन त्यावर लिहावे ही इच्छा आम्ही आपल्यात नक्की निर्माण करु ... :) रेवतीताई, आम्ही आपल्याला अशी खात्री देतो की ह्या विभागातले साहित्य वाचुन आपल्यालाही नक्की खेळ आवडायला लागेल व आपण स्वतःही त्यावर भरभरुन लिहाल. बाकी प्रभ्याचा प्रस्ताव छानच आहे. मिपा व्यवस्थापनातल्या संबंधितांनी योग्य ती दखल घ्यावी :) अवांतर : चेल्सीची काळजी नका करु, इंग्लिश प्रिमियर लीगच्या मुहुर्तावर आमची स्वतःची फुटबॉल ह्या खेळाला समर्पित असलेली नवी वेबसाईट लाँच करु ;) बघु मग कोण आडवतो आम्हाला चेल्सीवर लिहण्यापासुन ;) ------ (टीम 'गेम' आवडणारा)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डॉन्रावांशी सहमत... धाग्यात वर म्हटल्याप्रमाणे 'जर हा खेळ विभाग अस्तित्वात आल्यास तो चालण्यासाठी तुम्हा सर्व मिपाकरांची मदत लागणार आहे.' हा विभाग 'रोचक' ;) बनवण्यासाठी माझे सर्व प्रकारचे सहकार्य राहील.

In reply to by छोटा डॉन

>>पण इतर सदस्यांना हा विभाग आवडेल व कधीतरी मलाही खेळ आवडू लागतील ही आशा! करेक्ट.
चूक. आम्हाला या किंवा इतर खेळांतले काहीही समजत नाही आणि आवडही नाही. आणि केवळ समजावे किंवा आवड निर्माण व्हावी म्हणून या येऊ घातलेल्या विभागातले लेख वाचण्याची सोडा, या विभागाकडे ढुंकून पाहण्याची शक्यता सुतराम् नाही. पण म्हणून ज्यांना समजते, ज्यांना आवड आहे अशांकरिता असा विभाग का असू नये? या (आणि केवळ याच) कारणाकरिता 'हो' या पर्यायाला मत दिले आहे. - पंडित गागाभट्ट.

In reply to by पंगा

>>आम्हाला या किंवा इतर खेळांतले काहीही समजत नाही आणि आवडही नाही. आणि केवळ समजावे किंवा आवड निर्माण व्हावी म्हणून या येऊ घातलेल्या विभागातले लेख वाचण्याची सोडा, या विभागाकडे ढुंकून पाहण्याची शक्यता सुतराम् नाही. चालतेय की, काय हरकत नाही. नकाच बघु अजिबात, उगाच चुकुन एखादा खेळ आवडायला लागेल ;) बाकी आपला 'परखड' प्रतिसाद आवडला बरं का ! मी नेहमीच एक वाक्य वापरतो बघा, आंतरजालावर प्रत्येकाला प्रत्येकच गोष्ट कळलीच किंवा आवडलीच पाहिजे असे नाही, आपला प्रतिसाद म्हणजे ह्याचे जितेजागते उदाहरण आहे. असो, धन्यवाद ! ------ (तुर्तास)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डाण्याचा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचुन मलाही स्फुरण चढले आहे . मी डब्लु.डब्लु.एफ. ह्या रांगड्या खेळातल्या खेळाडुंची आणि डावपेचांची, करंट इव्हेंट्स ची आणि अशीच माहिती देणारे लेख पाडणार :) (सोलो 'गेम' वाजवणारा) ट्रिपल एच

In reply to by टारझन

टार्‍या, साला डब्लु.डब्लु.एफ. च नावं काढून तू तर एकदम मनांतलं बोलला रे.... आपण पण माहिती पाडणार.... (सुपर किक देणारा) डोम मायकल्स्.... स्वगत: टार्‍या बरोबर डीएक्स तयार केली तर कोण बोंबलायला आडवा येइल ;)

असा विभाग अस्तित्वात आला॑ तर या विभागात जास्तित जास्त सहभाग असेलच... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

फारच चांगली कल्पना आहे ...

हो पर्यायाला मत दिले आहे.

मत दिले आहे. चांगले लेखक शोधून नियमीत लिखाण यावे अशी इच्छा आहे. खेळ पत्रकारांना निमंत्रीत करून विभाग आकर्षक बनवता येईल.

हो असे मत दिले आहे ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

In reply to by ऋषिकेश

हेच म्हंतो. -खेळाडु. -Nile

छ्या ब्वा ! एखाद्या कौलावर सर्वांचीच संमती मिपाला शोभत नाय .. एकहि णो नाहि ?? अवांतरः प्रतीक्रिया णो असली तरि मत आपले हो ला - जसे काय नाहि ला दिले मत तर खेळ विभाग व्हायचा थांबणार काय !

ब्रीज या खेळा बद्दल माहीती असणारा कोणी आहे का?

In reply to by विजुभाऊ

ही साईट बघा.डॉ. प्रकाश परांजपे यांची साईट आहे.ते टाइम्सचा ब्रिजचा कॉलम गेले कित्येक वर्षे लिहीत आहेत. त्यांची पत्नी मिपा सदस्य आरसा. (आरसाचा भाऊ) रामदास

वा प्रभो वा ! काय सुंदर कल्पना सुचली आहे तुला. तुझ्या बुद्धीमत्तेची दादच दिली पाहिजे बघ. ह्या अशा समृद्ध दालनाची मिपात भर पडायलाच पाहिजे. मिपा वर अनेक उत्तमोत्तम क्रिडालेखक असताना हा विभाग तसा उशीराच सुरु होतो आहे असे म्हणले पाहिजे. फिफाच्या सध्या चालू असलेल्या दालनाने आम्हाला अवर्णनीय आनंद दिला आहे. आम्हाला फुटबॉलची गोडी लागली आहे, आम्ही देखील आता रात्री जागुन मॅचेस बघायला लागलो आहोत. मॅच संपली कि फोनवरुन डॉन्रावांच्या डोक्याला शॉट लावु लागलो आहोत. बाकी आपल्या ह्या लिखाणामुळे बिकांना फुटबॉलमध्ये (खेळात) रस आहे आणि त्यांना तो खेळ कळतो देखील ह्या नविन माहितीची आमच्या ज्ञानात भर पडली. निखिल देशपांडे ह्यांचे "असा विभाग अस्तित्वात आला॑ तर या विभागात जास्तित जास्त सहभाग असेलच.." हे वाक्य मात्र खटकले. खरेतर त्यांच्या सारख्या बहुगुणी माणसाने मिपाच्या सर्वच दालनात जास्तित जास्त सहभागी व्हायला हवे आहे. जेपी, मेघवेडा,रंगा (काका) सारख्या क्रिडासूर्यांच्या बाबतीत मी काजव्याने काय बोलावे ? ह्या लोकांचे बहुमोल सह्हाय ह्या दालनास लाभणार आणि हे दालन सर्वाय यशस्वी ठरणार हे निश्चीतच आहे. असा छान विषय चर्चेला आणल्याबद्दल व त्यावर मत देण्याची संधी दिल्याबद्दल प्रभोचे आभार. असेच छान छान विषय ह्यापुढे ही चर्चेला आणत जावेस असे वाटते. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

+१ सहमत... लवकरात लवकर हा विभाग सुरु व्हावा अशी कामना आहे..

कबड्डी , कबड्डी खेळाबद्दल ही माहिती मिळेल अशी आशा करतो. ;) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अर्थातच हो!!! कल्पना आवडली, आतापर्यंतचे फिफावरचे आणि इतर खेळांवर आलेले विविध लेख ह्या दालनात एकत्रित करुन घेता आले तर उत्तमच! स्वाती

वाह मस्तच आयडीया... हो ला मत दिले आहे अर्थातच. मिपा कट्ट्यासारख्या क्रिकेट, फुटबॉल्सच्या मॅचेस पण भरवा. आम्ही येऊ खेळायला. :-)

अनुमोदन दिले आहे. एक दिवस सहज फिफा वर्ल्डकपचे एक वेगळे दलन असावे अशी कल्पना मनात आली, ती डान्यापुढे मांडली आणि त्याने मेवे, मॉर्गन, प्रभो आणि निखिल वगैरे पोट्ट्यांच्या मदतीने साकारही करून दाखवली. त्यानंतर मिपावर असे कायमस्वरूपी दालन असावे असे वाटत होते. प्रभोने तीच कल्पना मांडली. सहर्ष अनुमोदन. मात्र या प्रकल्पात सातत्य असणे आणि जास्तीत जास्त सभासदांचा सहभाग असणे यावरच या प्रकल्पाचे यश अवलंबून आहे हे लक्षात असू द्या. बिपिन कार्यकर्ते

माननीय प्रभोजी, माननीय सदस्य मिसळपाव.कॉम आपले विचार वाचले. आपल्याला प्रतिभेचे दैवी देणे आहे, त्यामुळे मनातल्या भावना चपखल शब्दांत मांडण्याचे आपल्याला कसब प्राप्त झाले आहे. आपल्या हातुन साहित्यसेवा अविरत घडावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपल्यासारख्या साहित्यिकांच्या साधनेमधे व्यत्यय येतो, त्या गोष्टींना जबाबदार असलेल्या प्रवृत्तींचे निराकरण लवकर होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपण चालु करु इच्छित असलेला विभाग लवकरच चालु होईल आणि अनेक मान्यवर दिग्गज त्यात आपल्या आपल्या परीने योगदान देतील यात तीळमात्र शंका नाही. आम्हाला उत्सुकता असेल ती घरच्या घरी खेळता येणा-या खेळांची माहिती कोण देईल याची ! त्यादृष्टीने आम्ही श्री विनायक प्रभु यांच्या सदर खेळांची माहिती देणा-या सचित्र धाग्यांची आतुरतेने वाट पहात आहोत हे सांगणे नलगे. दृपलसारख्या कंटेट म्यानेजमेंट सिस्टीम्समुळे हे संकेतस्थळ उभे राहिले आहे त्याबद्दल मी दृपलचा तसेच दृपलटिमचा आभारी आहे. श्री तात्या अभ्यंकर यांच्या प्रयत्नाने हे संकेतस्थळ स्थापन झाले मी त्यांचा आभारी आहे. त्याला अनेक इतर संकेतस्थळे कारणीभुत ठरली, मी त्यांचा आभारी आहे. संपादकांनी केलेले कार्य थोर आहे. त्यांचा महिमा अपार आहे. त्यांचे गुणगान करण्यास मानवी वाणी पुरेसी नाही याची जाणीव आहे. पण तरीही आभार हे मानलेच पाहिजेत. सर्व संपादकांचा मी आभारी आहे. हा प्रतिसाद वाचणा-या वाचकांचा मी आभारी आहे. ज्यांचे ज्यांचे आभार मानणे आवश्यक आहे अशा सर्वांचा मी आभारी आहे. सर्वात महत्वाचे हे संकेत स्थळ चालु ठेवणा-या श्री नीलकांतचा मी आभारी आहे. खरोखर आज मोठा मंगल दिवस आहे. सर्व संपादकांच्या आशीर्वादाने आणि कृपाकटाक्षाने मी हा प्रतिसाद लिहु शकलो आहे. हा प्रतिसाद टिकला आहे. माझे सर्व संपादकांना साष्टांग नमन आहे. माझी खात्री आहे, संपादकांची अशीच कृपा माझ्यासारख्या अल्पमती, निर्बुद्ध बालकावर राहिल. अजुन काय लिहु? शब्दच सापडत नाहीत. मुढावस्था म्हणजे काय याचा मला आज प्रत्यय येत आहे. सर्वांचे मंगल होवो, शुभ होवो हीच कामना.. आपलाच नाना उर्फ अवलिया. संपादकांचा महिमा अपार । संपादकांची थोरवी अपार ॥ कसे मानु त्यांचे आभार । मी तर केवळ पामर ॥

एक शंका: हॉकीबद्दल कोण लिहिणार? का सरकारसारखं हॉकीला आपणही दुर्लक्षीत करणार? :(

In reply to by धमाल मुलगा

तु काय कामाचे बे? नाहीतरी 'आपण हॉकी वाले' चा डंका पीटत असतोस ना. लाग लिहायला. ;) -निलराज हल्ले. -Nile

In reply to by Nile

पिटतो बे? आम्ही हॉकीचा डिफेन्स करतो. बस्स! -धमेन रस्किन्हा.

In reply to by धमाल मुलगा

कोण्हाला काय म्हाईत्ये हॉकी मधलं ... तु काय बी फेकाचं .. (बरीच लोकं करत्यात हल्ली तसं ... ) आणि मालिकांवर मालिका पाडायच्या हाय काय नाय काय ? लिव्ह धम्या तु लिव्ह हाकीवं !!

In reply to by टारझन

=)) =)) आयला! एखाद्या विकीपंडीतानं नाहीतर गुगलज्ञान्यानं पकडला तर अब्रुचं खोब्रु..हे आपलं..खोबरं होईल ना रं! बरं, आपल्याला काय 'गिर्‍या तो ब्बी टांग उप्पर' कुठं जमतं अट्टल आयड्यांसारखं? त्यापरास आपण आपलं सुखासुखी गप र्‍हावं !

In reply to by धमाल मुलगा

=)) =)) >>त्यापरास आपण आपलं सुखासुखी गप र्‍हावं ! हॉकी गप र्‍हावंन खेळता येत नाय...चक दे!!!! म्हणून वरडावं भी लागतया.. ;)

आट्यापाट्या हया 'सरकार मान्य' खेळाविशयि कोनि सदर टाकल काय? नाय तर मी 'एकसपरट' द्यायला तयार हाय.

सर्वांचे आभार मानणार्‍या नानाचे आभार. ह्या विभागात सर्व पारंपारीक खेळाबद्दल सुद्धा लिखाण व्हावे असे सुचना करतो.

In reply to by विनायक प्रभू

आम्ही वाळवंटी मांडियलेल्या खेळाविषयी लिहिण्याचा विचार करतो. (बीच व्हॉलिबॉल, अतिशय सुंदर खेळ आहे.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सर्वांचे धन्यवाद. यावर मिपा व्यवस्थापनाचे काय म्हणणे आहे, हे ऐकण्यास उत्सुक आहे. :)

मुळातच डान्राव,चतुरंग व जेपी हे नावाजलेले क्रिडालेखकानी अगोदरच मिपावर क्रिडालेखनात खुप मोलाची भर घातली आहे. त्या सर्व लेखाचा समावेश त्यात करावा. डानरावाच्या आनंदात सहभागी... श्री नानाच्या संयमीत,दुरदर्शी,सच्च्या प्रतिसादाबद्दल नानांचे त्रिवार अभिनंदन. वेताळ

उत्तम कल्पना आहे. खेळ या विभागाखाली फुटबॉल , क्रिकेट, टेनिस या प्रसिद्ध खेळांबरोबर अस्सल मराठी मातीतले खेळही यात दाखवावेत ही विनंती - खो खो - कबड्डी - कुस्ती - मल्लखांब व इतर... खेळ या मुख्य विभागात प्रत्येक खेळाच्या नावानुसार उपविभाग तयार केले जावेत अशी माझ्यावतीने सूचना.

खेळ विभाग असावा असं जरूर वाटतं. पण त्याचबरोबर सध्याच्या विभागांची पुनर्रचना व्हावी असं वाटतं. सध्या सगळेच विभाग एकाच पातळीवर दिसतात. त्यांची किमान मांडणी अधिक चांगली व्हावी. साहित्य, चर्चा, कला, खेळ, व हे संस्थळ अशा पाचेक मुख्य विभागांखाली सर्व काही यावं... तसंच फिफासाठी स्वतंत्र मुखपृष्ठ होतं, तसं नवीन विभांगांसाठी असणार का? सर्वच मुख्य विभागांसाठी असणार का? असावं असं वाटतं.

आमचा खेळ विभाग कधी सुरू होईल मालक? चला, हाफ शेंचुरी झाली!

In reply to by मेघवेडा

करा जमेल तितक्या लवकर

अवांतरः ईतर विभाग ही चालू करा १. वाद् विवाद २. वीनोद ३. चित्रपट ४. व्रुत्तपत्र .... ----- सौरभ :)