Skip to main content

भारत बंद

लेखक इंटरनेटस्नेही यांनी सोमवार, 05/07/2010 15:18 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 848
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

देशी विदेशी दुकानं बंद आहेत हे पाहून डोळे पाणावले !

नितीन थत्ते यांनी इथे अशा विषयांवर एकमेव आणि अंतिम ठरावा असा प्रतिसाद लिहिलाच आहे. [प्रतिसाद एकमेव आणि अंतिम ठरावा हे माझे मत] फक्त मला एका गोष्टीकडे आपले लक्ष वेधायचे आहे की, बंद वगैरे असले की 'बसेसची तोडफोड ही ठरलेली असतेच' पण आमच्या औरंगाबादेत असे दिसले की, पाच किंवा अधिक बसेस पोलिसांच्या संरक्षणात स्थानकापर्यंत आणि बाहेरगावी सोडत होते. दिवसभर त्यांचा हा उद्योग चालू होता. पोलिसांशी हुज्जत घातल्यावर [ बसेसचा गृप होईपर्यंत खूप वेळ जात होता त्यामुळे त्यांच्याशी माझी हुज्जत झाली. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कार्यवाही करेन अशी एका पोलिसानं धमकी दिल्यावर आणि माझ्या हुज्जतीचे रेकॉर्डिंग केल्यामुळे मी जरा नमते घेतले. तसं नाही साहेब, मला काय म्हणायचे आहे, माझी विनंती आहे, वगैरे असे म्हणून मी शेपूट घातले] त्यांचे म्हणने होते की, साहेबांचे आदेश आहेत. बसेसची काळजी घ्या म्हणून... बाकींच्याकडे काय परिस्थिती होती कळेल काय ? >>>बंद मुळे जनतेचे अधिकच नुकसान होते. महिला, विद्यार्थी आणि रुग्ण याचे अतोनात हाल होतात............ यामुळेच बंद नको वाटतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>बंद मुळे जनतेचे अधिकच नुकसान होते. महिला, विद्यार्थी आणि रुग्ण याचे अतोनात हाल होतात............ आऊट ऑफ क्यूरीऑसिटी ... महिलांचे नक्की कसे हाल होतात? नाही म्हणजे माझे हाल झाले नाहीत, आमच्या हापिसातल्या कँपसवर न रहाणार्‍या महिलांशी बोलले, त्यांचेही हाल झाल्याचं ऐकीवात नाही. अंमळ गंमत वाटली म्हणून प्रतिसाद. रूग्णांना त्रास होतो, गरोदर महिलांना त्रास होऊ शकतो, इ.इ. मान्य! बाकी दुसर्‍या धाग्यावर आधी व्यवस्थित चर्चा चाललेली असताना इथे कौल टाकण्याचे प्रयोजनही समजले नाही. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>आमच्या हापिसातल्या कँपसवर न रहाणार्‍या महिलांशी बोलले, त्यांचेही हाल झाल्याचं ऐकीवात नाही. जर्मनीतही संप चालू आहे का ? आपन जर्मनीत आहात असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते...! :) बाय द वे, महिलांचे हाल म्हणजे असे असावे की, समजा ज्या स्त्रिया रिक्षाने [शेअर रिक्षा हं. नोकरी करणार्‍या बायका लंबर एकच्या चिक्कू. अपवाद असतीलही ] दररोज हाफिसात जात असतील तर त्यांना आज रिक्षा नसल्यामुळे एकतर किरकोळ रजा टाकावी लागणार होती. [रजेचे कारण आपण संपात सहभागी आहात आपल्यावर कार्यवाही का करु नये असेही बॉस कडून विचारले जाण्याची शक्यता असल्यामुळे] अशा महिलांची जाणे-येणे बाबत [ नवर्‍याने सोडणे, मुला-मुलीने सोडणे, मित्राने सोडणे हे सर्व सोडून] आज तारांबळ झाली असेल असे वाटते. >>बाकी दुसर्‍या धाग्यावर आधी व्यवस्थित चर्चा चाललेली असताना इथे कौल टाकण्याचे प्रयोजनही समजले नाही. माफ करा त्यांना....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> जर्मनीतही संप चालू आहे का ? काही कल्पना नाही. भारताततरी संप सुरू नाही; काल एक दिवसाचा बंद होता. संप आणि बंदमधे काही फरक असावा. >> आपन जर्मनीत आहात असे कुठे तरी वाचल्याचे स्मरते...! अंमळ चुकीची माहिती डोळ्याखालून गेली आहे. मी काही दिवसांपुरती जर्मनीत होते आणि आता परत पुण्यातच आहे. असो, व्यक्तीगत गप्पाटप्पा झाल्यावर आता मुख्य मुद्द्याकडे येऊ या ...
महिलांचे हाल म्हणजे असे असावे की, समजा ज्या स्त्रिया रिक्षाने [शेअर रिक्षा हं. नोकरी करणार्‍या बायका लंबर एकच्या चिक्कू. अपवाद असतीलही ] दररोज हाफिसात जात असतील तर त्यांना आज रिक्षा नसल्यामुळे एकतर किरकोळ रजा टाकावी लागणार होती....
हे हाल फक्त स्त्रिया स्पेसिफिक नसावेत नाही का?
तुम्ही अथवा तुमच्या सारख्या शे-पन्नास महिला म्हणजेच महिलावर्ग का हो ?? चार टाळकी म्हणजे जसा देश होत नाही तसेच तुम्ही चार स्त्रीयां म्हणजे महिलावर्ग होत नाही....!
असा माझाही दावा नाही. पण महिला/स्त्रियांना बंदचा त्रास होतो असं वाचलं म्हणून विचारलं की असा काय त्रास आहे जो फक्त स्त्रियांनाच होतो आणि पुरूषांना होत नाही? स्त्रियांना अनेक ठिकाणी फक्त जेंडरबायसमुळे डावलणं जेवढं चूक तेवढंच हे शॉव्हेनिझमही! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>महिलांचे नक्की कसे हाल होतात? नाही म्हणजे माझे हाल झाले नाहीत, आमच्या हापिसातल्या कँपसवर न रहाणार्‍या महिलांशी बोलले, त्यांचेही हाल झाल्याचं ऐकीवात नाही. अंमळ गंमत वाटली म्हणून प्रतिसाद. तुम्ही अथवा तुमच्या सारख्या शे-पन्नास महिला म्हणजेच महिलावर्ग का हो ?? चार टाळकी म्हणजे जसा देश होत नाही तसेच तुम्ही चार स्त्रीयां म्हणजे महिलावर्ग होत नाही.... ! असो, अंमळ गंमत वाटली म्हणून हा प्रतिसाद.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

महिलांचे नक्की कसे हाल होतात? सर्वच महिलांचे अतोनात हाल होतात. संप असल्यामुळे नोकरदार महिलांना कामावर जाता येत नाही, घरकाम करावे लागते. म्हणजे त्यांना घरकामाचा आळस असतो म्हणून त्या नोकरी करतात असे मला म्हणायचे नाही. पण संपामुळे सुट्टी मिळाली तरी ती पुरुषांसारखी उपभोगता येत नाही. नशिबातले घरकाम काही सुटत नाही. नवरा, मुले घरी असल्यामुळे सर्वच बायकांना (नोकरदार तसेच गृहिणी वर्गास) एकंदर घरकाम (चहा, पाणी , नाश्ता, चमचमीत साग्रसंगित जेवण वगैरे) जास्त पडते. तरूण आणि मध्यमवयीन नवरे इतरही बराच 'त्रास' देतात. (मिपाच्या नविन धोरणात तपशील देता येत नाही, क्षमस्व.) म्हातार्‍या नवर्‍यांचा 'तसा' काही त्रास नसला तरी, 'ज्येष्ठ नागरिक संघा'त जाऊ शकत नसल्याने घरच्याघरी म्हातारीचे डोके खातात. सुनांना नातींना उपदेशाचे डोस पाजत बसतात. (सर्वच नाही, पण तरी काही जणं) त्यामुळे संपामुळे महिलांना सर्वाधिक त्रास होतो ह्या विधानात जरूर तथ्य आहे. ------------------------------------------------------ विवाहित पुरुषाने कितीही नोकर्‍या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

मग या त्रासामधे संपाचा हात किती? इतर "सुट्ट्यां"च्या दिवशी घरोघरी काय वेगळी परिस्थिती असते का? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नक्कीच वेगळी परिस्थिती असते. सुट्टीच्या दिवशी बाहेर उपहारगृह, चित्रपटगृह, मॉल्स, टॅक्स्यॅ, रिक्शा, बसेस, गाड्या चालू असतात. पुरूषवर्ग बाहेर उंडारायला गेलेला असतो. बायका (संप काळाच्या तुलनेत) निवांत असतात. घरी स्वयंपाक न करता नवर्‍याला-मुलांना बाहेर जेवावयास जाण्यासाठी 'पटवू' शकतात. सहलीचा, चित्रपटाचा, माहेरी जाण्याचा कार्यक्रम योजू शकतात. असो. अदिती, माझा प्रतिसाद फार गांभिर्याने घेऊ नकोस. जरा, गंमत म्हणून दिलेला आहे. पण त्यात तथ्यही आहे. ------------------------------------------------------ विवाहित पुरुषाने कितीही नोकर्‍या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

संपामुळे महिलांचे जास्त हाल कसे होतात? १. संपामुळे नेहमीचे टाईमटेबल बदलल्यामुळे उशीर, खोळंबून रहाणे हे होतेच. पण जेव्हा हे होते तेव्हा शरीराचे अन्य धर्म पार पाडावेच लागतात. त्याकरता पुरुषाला विशेष अडचण येत नाही. पण महिलांना अनेक अडचणी येतात. पुरुष हा नि:संकोच थोडासा आडोसा बघून धार सोडू शकतो. महिला तसे करु शकत नाहीत. आणि आपल्या देशात सार्वजनिक स्वच्छतागृहे किती प्रमाणात आणि काय प्रकारची असतात हे वेगळे सांगायला नको. विशेषतः पाळीच्या काळात जर असे खोळंबावे लागले तर फारच अवघड होते. पुरुषांना अर्थातच हे लागू नाही. २. गाड्या वगैरे नेहमीची साधने बंद असतात तेव्हा पुरुष मंडळी चालत जाऊ शकतात (शारिरिक ताकद बायकांपेक्षा जास्त असल्यामुळे), ट्रक, टेंपो वगैरेकडे लिफ्ट मागून मजल दरमजल करत घरी येऊ शकतात. स्त्रिया (अपवाद वगळा) तुलनेने नाजूक असल्याने मैलोनमैल चालू शकत नाहीत. वाट्टेल त्याला लिफ्ट मागितली तर गैरप्रकार होऊ शकतात. त्यामुळे तो धोकाही पत्करत नाहीत. ३. अर्भके तर दुधाकरता आईवर अवलंबून असतातच. पण रांगती मुले, शिशु वर्गातील मुले हीसुद्धा आईवर जास्त अवलंबून असतात (अपवाद वगळा). त्यामुळे तिचा उशीर हा मुलांना आणि तिलाही जास्त त्रासदायक होतो.

ह्या बंदमधून काय साधणार? महागाई तर तसूभरही कमी होणार नाही असे आधीच प्रणव मुखर्जींनी जाहीर केले आहे. बसा हात चोळत! बरं, तरीही ''निषेध'' म्हणून जो बंद झाला त्यात : १. चाकरमान्यांना फुकाची एक रजा टाकावी लागली. काहींना विदाऊट पे! म्हणजे नुकसान! २. कंपन्या, कारखाने, दुकानदारांचे नुकसान ३. हातगाडीवाले, हातावर पोट असणार्‍यांचे नुकसान. ४. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड. त्याचे नुकसान सरकार पक्षाच्या खासगी तिजोरीतून नव्हे, तर सर्वसामान्याच्या खिशातूनच जाणार! ५. राडेशाहीला, मनगटशाहीला पुन्हा एकदा उधाण. जुने स्कोअर सेटल करायला विविध गुंडांना, राजकीय संघटनांना नामी संधी! ६. पेशंट्स, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी, होस्टेलमध्ये/परगावी राहणारे, परावलंबी व्यक्तींनाही ''बंद''चा त्रास. ७. पोलिसांनी संरक्षणाची महत्त्वाची कामे करण्याऐवजी बंदच्या नियोजनात त्यांना गुंतवणे. मग फायदा कोणाचा झाला? १. विविध राजकीय संघटनांचा, ज्यांनी त्या निमित्ताने आपली पोळी भाजून घेतली. सरकारी व विरोधी पक्षांचा फायदा. एकाने गरीबांविषयी कळवळा दाखवायचा, दुसर्‍याने सामान्यांची अडचण होऊ देणार नाही अशी गर्जना करायची.... सगळेच नाटक जोरात! २. सरकारी बाबूंचा.... ज्यांना आपल्या कामात दिरंगाई, निरुत्साह, उदासीनता दाखवायला अजून एक निमित्त मिळाले! ३. प्रसिध्दीमाध्यमांचा! त्या चॅनलवाल्यांनी तर काव आणलाच.... आणि आता पुढचे अनेक दिवस त्यावर रकानेच्या रकाने भरून वाहातील! मग ज्या सर्वसामान्य जनतेचा एवढा तोटा झाला ती जनता आपणच निवडून दिलेल्या सरकारला थोड्या प्रमाणात तरी हालवू शकली का? तर त्याचे उत्तर ''नाही'' हेच आहे! बरं, रस्त्यावर हातात लाठ्याकाठ्या घेऊन कोण उतरते? सामान्य माणूस! तो कोणावर हल्ला चढवतो? सामान्य माणसावर! त्याचे लक्ष्य काय असते? सार्वजनिक मालमत्तेची नासधूस (जी त्याच्याच खिशातून कररुपातून उभारली जाते!) ह्या बंदमुळे सरकारी पक्षाचा काही तोटा होतो का? उत्तर ''नाही''. जबाबदार नेत्यांचा तोटा होतो का? पुन्हा उत्तर ''नाही''. मग अशा ''बंद''चा काय उपयोग? फक्त आपण एक लोकशाही राष्ट्र आहोत हे दाखवण्यासाठी? की लोकांना एक दिवसाची सक्तीची सुट्टी देऊन देशाचे आर्थिक नुकसान करण्यासाठी? सामान्य माणसालाच सामान्य माणसाविरुध्द राडा करायला फूस लावण्यासाठी? आणि त्यात सामील होणार्‍या ''सामान्य'' माणसाला स्वतःचे दुटप्पीपण जराही लक्षात येऊ नये? निवडणुकांमध्ये कोण किती पैसे/ वस्तू देतंय ह्यावरुन त्या उमेदवाराला मते देताना नाही आठवण होत मग तो पक्ष आपल्याला सरकाररूपात किती नाडतोय ह्याची? आणि ते पैसे घेऊन मत दिलेले उमेदवार जेव्हा नेते बनून असे महागाई वाढीचे निर्णय घेतात तेव्हा त्यांच्याविरुध्द बोंब? अर्रे, ज्या भुसभुशीत मातीवर तो नेता झालाय त्या मातीतून अशीच ''गोमटी'' फळे येणार! मग आता कशाला हे अरण्यरुदन? आंदोलन करण्याची ''बंद'' हीच एकमेव पध्दत आहे का? ''गो स्लो'' धोरण राबवून किंवा काळ्या फीती लावून निषेध व्यक्त करता येत नाही का? एरवी ''थाळी बजाव'', ''घंटानाद'' वगैरे वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करणारे पक्ष अगदीच कल्पनादारिद्र्याने का वागतात? आणि ह्या सर्वाचा उपयोग तरी आहे का? उद्या महागाई कितीने कमी झाली ते सिध्द करुन दाखवा ह्या ''बंद''मुळे! (हाच प्रतिसाद काशिद यांच्या धाग्यावर दिलाय) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

काय इंटरनेटप्रेमी... आज काय निवांत का? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

भारत बंद ०५.०७.२०१० ला किती नेमके किती मिपाकरांचे समर्थन होते याची संख्याशास्त्रीय माहिती जमवणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. आपुलकीने दिलेल्या प्रतिसादांबद्दल सर्वच मिपाकरांचा आभारी आहे. || राजे ||, अरुंधती यांचा विशेष आभारी आहे. काही उपरोधिक प्रतिसाद वाचुन मात्र अतिशय वाईट वाटले. असो. -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.