Skip to main content

मनोरंजक आकडेवारी फुटबॉल विश्वचषक (केवळ गंमत)

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 06/07/2010 00:33 या दिवशी प्रकाशित केले.
वेगवेगळ्या मित्रांकडून फिरत फिरत आलेली एक मेल मराठीत टंकीत करून आपल्या वाचकांसाठी देत आहे. केवळ गंमत म्हणून या कडे पहावे. (हा वर्ल्ड कप कुणाला द्यायचा आहे हे अगोदरच ठरले आहे का?) =========================== विश्वचषकाचे मानकरी त्यांचे वर्ष आणि काही बेरजा १) ब्राझील १९९४ आणि १९७० (१९७०+१९९४)=३९६४ २) अर्जेंटीना १९८६ आणि १९७८ ( १९७८+१९८६)=३९६४ ३) जर्मनी १९९० आणि १९७४ (१९९०+१९७४) =३९६४ ४) ब्राझील २००२ आणि १९६२ (२००२+१९६२)=३९६४ वरील आकडेवारी बघता, एक सोपी गोष्ट करा. ३९६४ मधून २०१० वजा करा. उत्तर येईल,१९५४! १९५४ मध्ये कुणी कप घेतला होता? जर्मनी ??????

वाचने 2646
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

१९५४ ला पश्चिम जर्मनी जिंकली होती. http://en.wikipedia.org/wiki/FIFA_World_Cup म्हणजे यंदा जर्मनीच जिंकणार.. (पण मागच्या विश्वचषकाच्यावेळी ब्राझिल का नाही जिंकली..?? त्यांनी तर १९५८ ला पण विश्वचषक जिंकला होता.) खादाडमाऊ

बादरायण संबंध जोडण्याचा एक हळवा प्रयत्न ;) -(श्वेता जुमानी प्रेमी) स्वतः गजनी

मनोरंजक माहिती ! अतिकिंचीत ओढून-ताणून आकड्यांत बसवलेली. :) ब्राझील जर १९६२, १९७०, १९९४ आणि २००२ मध्ये जिंकली, तर ते आकडे फिरवले कशाला ? उगाच ताणलंय, दुसरं काय ? ....बबलु

माहिती गमतीदार, स्वाती