बसरा ते बावला
सतराव्या शतकाच्या सुरुवातीनंतर हिर्याचे महत्व वाढत गेले. त्या आधी हिर्याचे मोल कमी होते असे नाही पण दागीन्यामध्ये मोत्यांचा वापर खास करून बसर्याचा वापर होत असे.
मोती म्हणजे बसरा.चोखा मोती .त्यात जीवन आणि पातळ जीवन असे दोन प्रकार .
त्यानंतर बदला मोती .थोडेसे खडबडीत कमी गोल असे.
काळे मोती कागाबाशी तर बाकी सगळे गावशाही .
कधी कधी लांबोळक्या नूर मोत्याचा वापरही केला जायचा.
फिकट रंगाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या मोत्यांना पण वेगळीशी नावे होती. हुर्मुजी म्हणजे गुलाबी.लालसर म्हणजे गुळधानी .थोडी फिकट पांढरी छटा पण काळी नव्हे असे शुक्री मोती . शुभ्र पांढरा नाही पण पिवळाही नाही म्हणजे खुलता मोती.
ही रंगाप्रमाणे केलेली वर्गवारी आणि खास मराठी नामकरण खांबेट्यांच्या मौक्तीक चिकीत्सेत आहे.
भारतात होर्मझ -तलाई मनार अशा वेगवेगळ्या आखातातून मोती यायचे .कपूरथळ्याच्या महाराजांकडे मोती ज्या खणात भरलेले असायचे त्यात कोपरापर्यंत हात बुडायचे असाही एक उल्लेख आहे.
पण त्या काळी हिर्याच्या खाणी आणि खास करून आकाराने मोठ्या हिर्याच्या खाणी गोळकोंड्यात असूनही मोत्यांचा गवगवा जास्त होता. मोत्यातल्या पाण्याची झळाळी जास्त मोहवत होती .हिर्याच्या तेजाचे लोळ उलगडले ते सतराव्या शतकात पैलू पाडण्याचे तंत्र बदलल्यानंतर .
भारतीय शास्त्राप्रमाणे जे पैलू पाडले जायचे त्यामागची भूमीका हिर्याचे मूळ व्यक्तीमत्व टिकवून ठेवणे ही होती. हिर्याच्या प्रकाश लिळा त्यात पूर्णपणे उलगडल्या जायच्या नाहीत. भारतात पैलू दोन तीन प्रकारानी पाडले जायचे त्याला बिलंदी आणि परब अशी नावे होती.
युरोपात ब्रिलीयंट कट चा शोध लागला आणि हिर्याचे नशीब पालटले.
अजूनही मुंबई बाजारात ब्रिलीयंट कट ला देशी नाव बिलीयन कट हेच आहे. बाकी रोझ कट म्हणजे गुलाब घाटी आणि लोटस कट म्हणजे कमळ घाटी. टपोर्या कटाला (काबुचान ) मदारघाटी किंवा पोट्या.
पण ब्रिलीयंट कट म्हणजे क्रांती . आपल्या डोळ्यासमोर हिरा म्हटला म्हणजे जे चित्र उभे राहते तो म्हणजे ब्रिलीयंट कट.अशा प्रकारचा पैलू पाडताना हिर्यातल्या प्रकाशाच्या लिळेला पूर्ण न्याय देणारा कट .या नंतर युरोपीयन बाजारात भारतीय हिर्यांची मागणी प्रचंड वाढली.
हिरे जन्माला येतात तेच काहीतरी दंतकथा घेऊन. कोहीनूर आपला कोहीनूर म्हणून आपल्याला माहीती आहे पण बरेच हिरे असे आहेत की कोहीनूरचे भाऊबंद म्हणजे गोळकोंड्याच्या खाणीतून आलेले आहेत. पांढरा शुभ्र कोहीनूर -निळा होप -हिरवा ड्रेस्डेन यादी अमर्यादीत आहे.शुध्द कार्बनचा कोहीनूर .बोरॉनची मिसळ झालेला गहीरा निळा होप तर नैसर्गीक किरणोत्सर्गानी हिरवा झालेला ड्रेस्डेन.
आज फक्त इंदोर पिअर्सची कथा वाचा .
१९२५ साली जानेवारीतल्या एक संध्याकाळी मलबार हिलच्या लिटल गीब्ज रोडवर अब्दुल कादेर बावला नावाच्या एक श्रीमंत मुस्लीम व्यापार्याचा गोळ्या झाडून खून झाला. त्यावेळी त्याच्या सोबत मुमताझ नावाची एक त्याची रखेली होती .ही घटना बघणार्या काही ब्रिटीश आर्मी अधिकार्यांनी काही आरोपींना जागीच पकडले आनि एका सनसनाटी खटल्याला सुरुवात झाली.
मुमताझ इंदूरहून पळून आली होती. बावलाची आवडती तवायफ. इंदूरच्या तुकोजीरावाच्या मनात पण ती भरली होती. काही वर्षापूर्वी तुकोजीरावांनी तिला आपल्या जनानखान्यात ठेवले.बावला पण तेव्हढाच धीट .त्यानी इंदूरहून मुमताझला परत सोडवून आणले.सूड म्हणून मारेकर्यांनी बावलाचा खून केला. या खूनाचे सुत्रधार होते इंदूरचे राजे तुकोजीराव होळकर. खटला दोन वर्षे चालला. आरोपींतर्फे जीना सारखे वकील लढत होते. पण प्रत्यक्ष पुरावा असल्यामुळे काही आरोपींना जन्मठेप तर दोघांना फाशीची शिक्षा झाली. आता खर्या पेचप्रसंगाला सुरुवात झाली. तुकोजीरावांचे नाव आरोपींमध्ये आले. बर्याच खलबतानंतर तुकोजी रावांना एकतर खटल्याला सामोरे जा अथवा राज्य सोडा असा पर्याय देण्यात आला
तुकोजीरावांनी सिंहासन सोडले आणि अल्पवयीन यशवंतरावांना गादीवर बसवले.
शक्य तो दूर रहा असा मैत्रीपूर्ण सल्ला ब्रिटीशांनी दिला असल्यामुले ते युरोपात गेले.स्विट्जरलंड मध्ये अॅनी मिलर नावाच्या अमेरीकन बाईशी लग्न केले .अॅनी मिलर राणी शर्मीष्ठादेवी झाली या प्रसंगी तुकोजीरावांनी आपल्या नव्या आणि तिसर्या पत्नीला जे हिरे घेतले ते इंदोर पीअर्स नावानी प्रसिध्द आहेत. प्रत्येकी सेहेचाळीस कॅरेट वजनाचे हे दोन हिरे काही वर्षांनी बाजारात पुन्हा विक्रीला आले कारण तुकोजीरावांनी शर्मीष्ठादेवींना घटस्फोट दिला.
हॅरी विन्स्टन नावाच्या ते खरेदी करून विकले. परत विकत घेतले. परत विकले.सध्या एका उद्योगपतीकडे आहेत.
बघा हा फोटो .
झालंच तर हॅरी विन्स्टनचं नाव पण लक्षात ठेवा .कारण प्रत्येक मोठ्या हिर्यासोबत या जव्हेर्याचं नाव जोडलेलं आहे. आपण तर खास लक्षात ठेवू कारण आपल्या त्र्यंबकेश्वराचा नासक (नाशीक ) डायमंड त्याच्याच संग्रहात होता.
झालंच तर हॅरी विन्स्टनचं नाव पण लक्षात ठेवा .कारण प्रत्येक मोठ्या हिर्यासोबत या जव्हेर्याचं नाव जोडलेलं आहे. आपण तर खास लक्षात ठेवू कारण आपल्या त्र्यंबकेश्वराचा नासक (नाशीक ) डायमंड त्याच्याच संग्रहात होता.
प्रतिक्रिया
मस्त रोचक
असेच म्हणतो...!
कहाण्या
रोचक
त्रोटक
होप
मस्तच लेख...
मस्त लेख
वा! खूप माहितीपूर्ण लेख
ग्रेट
दुर्दैवी हिरे
रोचक लेख
सहज
धन्यु
सहज
बिलियन कट!!
मस्त लेख
मस्त
जवळ असावी
अॅनी मिलर
व्वा!
काका मस्त
वा!
मस्त माहिती
खूप दिवसांनी एक चमकदार लेखन आले!
एक से बढकर एक
आपण च्यायला काय बोलणार?
रामदासकाक
छान
पुढे
भारी आसामी
डायमंडस आर फॉर एव्हर