ह्याला बोलतात निळे डोळे!
काही महीन्यांपुर्वी 'एका' जागी गेलो होतो,पहील तिकडे सारख जाण असायच्,आता नाही.तेव्हा मित्रांबरोबर बसलेलो असताना हे मांजराच पिल्लु सारख पायाशी यायच् व कपड्यांना दातात पकडुन मांडीवर येउन बसायच.मी थोडावेळ गोंजारल की लाडात येउन तिथेच झोपायच्. :) .मी वैतागुन त्याला जोरात उचलायचो व दुस-या मित्राकडे द्यायचो तर ते परत माझ्याकडेच यायच.मित्राने बिस्कीट दाखवल तर माझ्यापाशी बसुन तोंड पोहचेल एवढच तोंड वर करायच व दुर पकडल तर ते घेण्यासाठी पुढे सरायच नाही.तेच बिस्कीट मी पकडल की ते तोंडात पकडायला माझ्या मागेही यायच!! बघणारे विचारयचे,"अरे घर से लाया है क्या?" मी "नही" म्हणालो की "फीर लेके जाना घर पे!" बोलायचे.
मी घरी विचारल पण घरी पोपट पिंज-याबाहेर सोडलेले असतात म्हणुन "नाही............तु संभाळणार आहेस का?" अस उत्तर आल.
मग मी त्याला दुध.बिस्कीट द्यायचो तेव्हा खाउन झाल की मी त्याला लांब सोडुन यायचो,तर ते रस्ता शोधत शोधत यायच व परत मांडीवर येउन बसायच.एकदा मी त्याला 'खुपच'(काही मीटर) लांब सोडुन आलो,तर ते पिल्लु रस्ता शोधत शोधत आल व पुन्हा माझ्यासमोर उभ राहील्,मी त्याच्या कडे आश्चर्याने बघितल तर ते मान वर करुन माझ्याकडे बघुन हसल.(म्हणजे मला तस वाटल की हसतय म्हणुन!)
मग थोड्या दीवसांनी मी 'तिथे' जायच बंद केल्,पण आजही आठवण आली की त्या पिल्लाच कौतुक वाटत.
अशा त्या निळ्या डोळ्याच्या 'चिनु'ला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!
'चिनु' हे नाव माझ्या एका म्रुत पाळीव प्राण्याला अर्पण........'तो' प्राणी पाळु नका बोलतात कायदेवाले!!
चांगला खाउन पिउन झोपला होता गादीवर,झोपेतच मेला बिचारा!
चिनुच्या आत्म्याला शांती लाभो म्हणुन आपण प्राथना करावी.
'चिनु' हे नाव माझ्या एका म्रुत पाळीव प्राण्याला अर्पण........'तो' प्राणी पाळु नका बोलतात कायदेवाले!!
चांगला खाउन पिउन झोपला होता गादीवर,झोपेतच मेला बिचारा!
चिनुच्या आत्म्याला शांती लाभो म्हणुन आपण प्राथना करावी.
प्रतिक्रिया
अय्या!!!
स्वतःवर
साधारण पणे
सहमत आहे ,
>>अशा त्या
आक्रितच घडले म्हणायचे.
पोपटाचे काय?
शान्बाजी सावधान व्हा
ह्या
मित्रा