कोण अर्जेंटिना? धन्यवाद!
विशेष
पहिल्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाची ४-० अशी अक्षरशः कत्तल केली, कोपर्यातून काही आवाज आले, "ऑस्ट्रेलिया काही तितकी स्ट्राँग नाही."
बरं ऑस्ट्रेलिया स्ट्राँग नाहीतर नाही, नॉकआऊट फेरीत इंग्लंडचा ४-१ असा फडशा पाडला, तर "इंग्लंड म्हणजे काय नुसती टीम ऑफ चॅम्पियन्स. ब्रिटिश मीडियाने मोठे केलेले खेळाडू ते. ती कसली स्ट्राँग टीम. छ्यॅ.." असे प्रतिवाद झाले!
मग "अर्जेंटीनापुढे कसला निभाव लागतोय जर्मनीचा.. हॅहॅहॅ.. अर्जेंटीना कच्ची खाणार आहे त्यांना.." अशा गर्जना कालपर्यंत होत होत्या!
पण ते आले, अर्जेंटीनाच्या धसमुसळ्या, रांगड्या आक्रमक खेळाला चोख प्रत्त्युत्तर म्हणून अभेद्य जर्मन वॉल उभी केली आणि स्वतः मशीन्सप्रमाणे अत्यंत पद्धतशीर खेळ करत अर्जेंटाईन तथाकथित 'तगडा' बचाव एकदोनदा नव्हे तर तब्बल चारदा भेदला! 'काऊंटरअॅटॅक म्हणजे काय आणि तो यशस्वीपणे कसा पार पाडायचा' हे त्यांनी अख्ख्या जगाला आज पुनरेकवार दाखवून दिलं. टेकनिकल अॅनालिसिस करायचा झाला, तर अर्जेंटीनाकडे बॉल पझेशन जास्त होतं अर्थात! अर्जेंटीना जर्मनीपेक्षा निश्चितच अधिक आक्रमक होते आणि जर्मनीच्या पहिल्या दोन गोल्सच्या दरम्यानची ६५ मिनीटे अर्जेंटिनाचं मॅचवर वर्चस्व होतं ही गोष्ट खुद्द जर्मन खेळाडू देखील मान्य करतील! पण एका मोक्याच्या शोधात असलेल्या जर्मन वाघांनी ती संधी मिळताच तिचं व्यवस्थित सोनं केलं आणि दुसर्या गोलनंतर अर्जेंटाईन खेळाडूंनी खांदे टाकले.
आज आम्हाला कोण का जाणे नेहमीच्या पाईंट्सऐवजी 'बड'च्या बॉटल्स घेण्याची हुक्की आली आणि टाईमर २:४० अशी वेळ दाखवत असताना, आम्ही काउंटरवर पैसे देऊन बॉटल्स हातात घेतोच म्हणेस्तोवर श्वाईन्स्टायगरच्या एका अप्रतिम फ्री-किकवर म्युलरने 'डेफ्ट टच' व्याख्या लिहिली आणि अर्जेंटिनाच्या गोलला खिंडार पाडलं! झालं बॉटल्सचा पहिला राऊंड असाच एकमेकांवर उडवण्यात गेला.. :( जर्मनी १ - ० अर्जेंटिना!
यापुढची ६५ मिनिटं वर वर्णन केल्याप्रमाणे अर्जेंटिनाने अक्षरशः वर्चस्व गाजवलं. डिमारिया, तेवेझ सुंदर फुटबॉल खेळत होते, मात्र त्यांना जर्मन वॉल भेदणं काही शक्य होत नव्हतं. ६८व्या मिनीटाला एका काउंटरअटॅकवर त्यांचे बेस्ट थ्री फॉरवर्ड्स म्युलर, पोडोल्स्की आणि क्लोस्जा यांनी अतिशय थंड डोक्याने 'एक्सिक्युशन' केलं. म्युलरनं तीन डिफेण्डर्सच्या गराड्यात असतानाही, स्वतः खाली पडलेला असतानाही पुढे लेफ्ट कॉर्नरवरून 'डी' मध्ये आलेल्या पोडोल्स्कीला अतिशय सुंदर पास दिला आणि उजवीकडून पुढे आलेल्या मिरोस्लाव क्लोस्जेकडे पोडोल्स्कीने फक्त बॉल सरकवला. त्याच्यासमोर अर्जेंटाईन गोलपोस्ट उघडा नाही चक्क नागडा होता! मग काय 'केलान काम बराबर'! ;) क्लोस्जेने आपल्या १००व्या सामन्यात आपला ५० वा, या विश्वचषकातला तिसरा, एकूण ११वा आणि कदाचित आयुष्यातला सर्वात सोपा गोल केला! आणि अर्जेंटिना इथंच संपली. जर्मनी २ - ० अर्जेंटिना!
यापुढची २२ मिनिटं फक्त बचाव करायचा होता जर्मनीला, जो त्यांनी आत्तापर्यंत चोखपणे केलेला होता! पण पुढल्या सहा मिनीटातच आणखी एक काउंटरअॅटॅक जर्मनांनी केला! यावेळेस त्यांचा फुलबॅक आर्ना फ्रीडरीक मैदानाच्या मधोमध धावत अर्जेंटिनाच्या 'डी' पर्यंत पोहोचला होता. श्वाईनस्टायगरने अक्षरशः एखाद्या वाघाने हरणाला खेळवावे तसे अर्जेंटाईन डिफेण्डर्सना खेळवत गोलच्या डाव्या बाजूने क्रॉस-इन टाकला त्याला फ्रीडरीकने व्यवस्थित दिशा दिली आणि जर्मनीसाठी आपला आयुष्यातला पहिला गोल करून अर्जेंटिनाचा आणखी एक लचका तोडला! जर्मनी ३ - ० अर्जेंटिना!
आता फक्त औपचारिकता उरली होती. अर्जेंटाईन खेळाडूंचे हरलेले चेहरे, पडलेले खांदे सगळी कथा व्यवस्थित कथन करत होते! मॅशेरानो वैतागत होता, तेवेझ चिडत होता काय काय नि काय.. जर्मन वॉल अजूनही अभेद्यच होती. दोन अर्जेंटाईन आक्रमणं झाली पण अयशस्वी! ८८ मिनिटं झाली तोवर आम्ही जर्मन विजय साजरा करत होतो! यावेळी पाईंट्स घेतल्या होत्या. शेवटचा घोट घेऊन गिलास टेबलवर ठेवतोच म्हणेपर्यंत अजून एक काउंटरअॅटॅक झाला! ओझिल, श्वाईनस्टायगर, खेदिरा आणि क्लोस्जे चौघे वारा प्याल्यासारखे धावत होते आणि समोर होते फक्त तीन अर्जेंटाईन डिफेण्डर्स! ओझिलने लेफ्टवरून एक क्रॉस इनचा गुलाबजामुन क्लोस्जेच्या ताटात आणून वाढला! आता कितीही पोट भरलं असलं तरी गुलाबजामुन खायला कोण नाही म्हणेल? आमचा टार्या आणि क्लोस्जे तर नक्कीच सोडणार नाहीत! क्लोस्जेने तो व्यवस्थित गट्टम करून टाकला! आणि इथे आम्ही बॉटल्सचा अजून एकेक राऊंड मागवून शॅम्पेनची तहान बीयरवर भागवून घेतली! जर्मनी ४ - ० अर्जेंटिना!
नाही म्हणायला अर्जेंटिनाच्या खेळात बरेच प्लस पॉईंटस होते पण हा लेख फक्त आणि फक्त जर्मनीची स्तुती याच उद्देशाने लिहिलेला असल्याकारणाने मी ते इथे लिहिणार नाही! सगळ्या विरोधकांच्या नाकावर टिच्चून जर्मनीने अर्जेंटिनाला कच्चा खाल्ला! आणि या विश्वचषकातली 'बेस्ट मॅच' खिषात घालत अंतिम चौघात मानाने प्रवेश केला! इथून पुढे जर्मनी हरली (जे होणे शक्य नाही असे दिसत आहे!) तरी आम्ही अत्यंत समाधानी असू! आमची जर्मनी उपांत्य फेरीत आहे! स्पेन, सावधान! ;)
Ich bin Deutschland, bis ich sterbe!
वाचने
18730
वाचनखूण
प्रतिक्रिया
71
अरे
In reply to अरे by गणपा
+१ सहमत
In reply to +१ सहमत by सागर
कालपर्यंत
In reply to कालपर्यंत by मेघवेडा
खरे आहे मेघ्या
In reply to खरे आहे मेघ्या by सागर
नाही तेही
In reply to नाही तेही by मेघवेडा
पर्सनली काय घ्यायचं?
In reply to पर्सनली काय घ्यायचं? by सागर
नाही अरे..
In reply to नाही अरे.. by मेघवेडा
बर बर....
In reply to बर बर.... by सागर
हॅ हॅ
In reply to हॅ हॅ by ऋषिकेश
स्पेनचे काही खरे नाही
In reply to स्पेनचे काही खरे नाही by सागर
स्पेन
In reply to नाही अरे.. by मेघवेडा
हा हा हा
In reply to हा हा हा by सहज
है
छान रे
In reply to छान रे by श्रावण मोडक
योग्य परीक्षण!
In reply to योग्य परीक्षण! by मेघवेडा
खरच मजा
In reply to खरच मजा by पुष्करिणी
अर्र्रं..
In reply to अर्र्रं.. by मेघवेडा
सहमत्...आता
In reply to छान रे by श्रावण मोडक
अर्जेंटिना हरली..
In reply to अर्जेंटिना हरली.. by संजय अभ्यंकर
भारी
आता , आमचा
दिएगो ची
In reply to दिएगो ची by अभिषेक९
असहमत
In reply to असहमत by मेघवेडा
>>दिएगो ची
Eins, zwei, drei and fear
अरे मला
In reply to अरे मला by निखिल देशपांडे
हा हा हा!
In reply to हा हा हा! by मेघवेडा
आम्ही
In reply to आम्ही by निखिल देशपांडे
पराग्वे
In reply to पराग्वे by निखिल देशपांडे
शाब्बास!
In reply to शाब्बास! by मेघवेडा
ओ जास्त
In reply to ओ जास्त by निखिल देशपांडे
खेळ आवडला?
In reply to खेळ आवडला? by मेघवेडा
हा हा हा ...
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
आम्ही
In reply to आम्ही by गणपा
अर्थात
In reply to आम्ही by गणपा
मग काय ?
In reply to खेळ आवडला? by मेघवेडा
कसले रे
In reply to कसले रे by मस्त कलंदर
हॅहॅहॅ!
In reply to हॅहॅहॅ! by मेघवेडा
त्या
In reply to त्या by मस्त कलंदर
>> स्वतःकडे
In reply to पराग्वे by निखिल देशपांडे
असो.
In reply to असो. by छोटा डॉन
बर्बरं..
In reply to बर्बरं.. by मेघवेडा
हाबिणंदन
In reply to हाबिणंदन by गणपा
+१
In reply to +१ by छोटा डॉन
या एकदा
In reply to +१ by छोटा डॉन
हॅहॅहॅ..
In reply to बर्बरं.. by मेघवेडा
जाऊ द्या साहेब ...
In reply to जाऊ द्या साहेब ... by छोटा डॉन
छ्याट पण
In reply to छ्याट पण by मेघवेडा
>>छ्याट पण
In reply to >>छ्याट पण by छोटा डॉन
आत्मविश्वास!
In reply to आत्मविश्वास! by मेघवेडा
स्वल्पविराम ....
In reply to स्वल्पविराम .... by छोटा डॉन
माझा पण
In reply to माझा पण by मस्त कलंदर
>>बरे झाले
In reply to >>बरे झाले by गणपा
हा हा!
In reply to >>बरे झाले by गणपा
यातच आल
In reply to यातच आल by मस्त कलंदर
गणपाशी
In reply to छ्याट पण by मेघवेडा
>>पॅराग्वेन
In reply to >>पॅराग्वेन by गणपा
एक जोक ...
In reply to एक जोक ... by छोटा डॉन
हॅत्तिच्य
In reply to छ्याट पण by मेघवेडा
छ्याट पण
In reply to छ्याट पण by निखिल देशपांडे
आदमी अक्सर
In reply to अरे मला by निखिल देशपांडे
असो आता
डिएगोचे हावभाव पाहून वाईट वाटले.....
जर्मनी हा कप जिंकणार ह्यात काही शंका नसावी.
डॉइशलांड............................!!!!!
In reply to डॉइशलांड............................!!!!! by स्वाती दिनेश
जर्मनीत
In reply to जर्मनीत by ऋषिकेश
बुधवारी..
हॅहॅहॅ.........
जर्मनी - लाजवाब!
In reply to जर्मनी - लाजवाब! by तिमा
+१
हे खरं टोटल फुटबॉल