लागणारे साहित्य:
तिसर्या (शिवल्या) १ ते २ वाटे
लसुण पाकळ्य ४-५
१ मोठा कांदा चिरुन
आल, लसूण, मिरची कोथिंबीर वाटण दिड चमचे.
अर्धा वाटी सुके खोबरे व १ मोठा कांदा भाजून केलेले वाटण
हिंग, हळद
२ चमचे मसाला
चविपुरते मिठ
अर्धा ते १ चमचा गरम मसाला.
पाककृती:
पहिला तिसर्या स्वच्छ धुवुन घ्यावात. मग त्या एका टोपात त्या बुडतील इथपर्यंत पाणी टाकायचे. व त्याला एक उकळी आणायची. टोप मोठच घ्यायच. तिसर्या सोडून टोप अर्ध रिकाम राहील पाहीजे नाहीतर कधी कधी उकळल्यावर पाणी बाहेर येत.
उकळी आणल्यावर तिसर्या सुट्ट्या होतात. मग त्यातील ज्याला तिसरीचे गर आहे अशी शिंपली घ्यायची व दुसरी काढुन टाकायची.
http://farm5.static.flickr.com/4116/4754440150_0d68f7caee_m.jpg
आता पातेल्यात किंवा कढईत तेलावर लसणाची फोडणी द्यायची व त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळायचा. मग त्यावर आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला, तिसर्या घालाव्या. जे तिसर्या उकडलेले पाणी असते त्यातलेच थोडेसे पाणी ह्यात घालावे. जर रस्सा करायचा असेल तर जास्त पाणी घालायचे. थोडावेळ वाफेवर ठेउन मग त्यात कांदा खोबर्याचे वाटण, गरम मसाला व मिठ घालायचे. परत थोडावेळ वाफ देउन गॅस बंद करावा. ह्या शिजलेल्या असल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नसते.
तिसर्यांचे सुके.
अधिक टिपा :
* ह्या न उकडता विळीवर मधुन कापुन दोन शिंपल्या बाजुला करता येतात. त्यामुळे उकडल्यावर जे पाणी फु़कट जाते ते जात नाही कारण त्यात तिसर्यांचा रस उतरलेला असतो. पण हे कापायला वेळ लागतो म्हणून बहुतेक जण उकडूनच करतात.
* ह्यात आंबट घालण्याची तशी गरज नसते. पण जर आवडत असेल तर एखादा टोमॅटो घालावा.
* ह्याच प्रकाराने रस्साही करता येतो. रश्यामध्ये तिसर्या उकडलेले जे पाणी असते तेच वापरायचे.
वाचन संख्या
8806
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुबईला
>> मला आत्ता शिवल्या पायजेत
In reply to दुबईला by गणपा
:-)
जागुतैंना दंडवत!
ह्या तिसर्या....
जरूर!
In reply to ह्या तिसर्या.... by वेताळ
तुम्ही
In reply to जरूर! by सुनील
सुरेख!
जबरदस्त!!!
छान, इकडे
कोणे एकेकाळी मिश्राहारी
गणपा,
पहिल्या
आदिती वरील
जागु ताई ,
टारझन