मागच्या आठवड्यातच युपीए सरकारने इंधन दरवाढ केली हे एव्हाना सर्वांना माहिती आहेच.
मात्र याचबरोबर सरकारने एक आणखी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम पदार्थांवरिल सरकारी नियंत्रण हटवण्यात(Deregulation) आलेले आहे. म्हणजे आता आंतरराष्ट्रीय बाजारात ज्याप्रमाणे चढ उतार होतील त्याप्रमाणे पेट्रोलचे दर चढतील/उतरतील. फ्री मार्केट.
डिझेलच्या बाबतीत मात्र सरकारने partial deregulation केले आहे. डिझेलचे दर बाजारभावाच्या जवळपास निश्चित करण्याची मर्यादित स्वायत्तता केंद सरकारच्या मालकीच्या इंधन विक्री कंपन्यांना दिली आहे. पुढील काही महिन्यात डिझेलवरिल सरकारी नियंत्रण पुर्णपणे हटवण्यात येणार आहे.
डॉ. किरीट पारेख समितीच्या शिफारशींना अनुसरुनच हे पाऊल उचलत आहोत असे सरकारने म्हटले आहे. सब्सिडीसाठी सरकारला द्यावे लागणारे किमान २२ हजार कोटी रुपये यांमुळे वाचणार आहेत असे सरकार चे म्हणणे आहे.
नुकतंच सरकारला 3G स्पेक्ट्र्म च्या लिलावातुन जवळजवळ १ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. महागाईचा दर साधारण साडे सोळा टक्के झालाय. असे असताना .. ही दरवाढ करणे गरजेचे होते का ?
तसेच पेट्रोलियम पदार्थांवरिल सरकारी नियंत्रण उठवणे योग्य वाटते का? याचे परिणाम काय होतील ? आता मार्केट नुसार दर बदलणार म्हणजे काय ? ही प्रोसेस कशी आहे? दर दिवसाला दर बदलतील, दर आठवड्याला की आणखी काही? सर्व ऑईल कंपन्यांचे दर समान असतील की त्यातही फरक असेल ?
यापुर्वी कधी पेट्रोलियम पदार्थांवरिल सरकारी नियंत्रण उठवले गेले होते का ? एका मित्राने माहिती दिली की भाजप सरकारच्या काळात असे केले गेले होते. मला याबद्दल माहिती मिळु शकली नाही.
किरीट पारेख समितीच्या शिफारशी नक्की काय होत्या ? त्यांचा रिपोर्ट कुणी वाचलाय का ?
वाचने
4568
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
किरीट पारेख समितीच्या शिफारशी आणि सरकारचे निर्णय...
आज विरोधी
बरोबर
In reply to आज विरोधी by Dipankar
मला एक काल एसएमएस मिळाला.. त्यात
पाकिस्तान-
In reply to मला एक काल एसएमएस मिळाला.. त्यात by वेताळ
अमेरिकेत बहुधा.......
In reply to पाकिस्तान- by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रती
In reply to अमेरिकेत बहुधा....... by वेताळ
सॉरी
In reply to अमेरिकेत बहुधा....... by वेताळ
गॅस
In reply to सॉरी by ३_१४ विक्षिप्त अदिती
गॅसोलीन
In reply to गॅस by महेश हतोळकर
बांगलादेश
In reply to पाकिस्तान- by ३_१४ विक्षिप्त अदिती
दिपांकर साहेब.....
In reply to बांगलादेश by Dipankar
सर्वसाधार
In reply to दिपांकर साहेब..... by वेताळ
दिपंकर साहेब
In reply to सर्वसाधार by Dipankar
हो.
अहो मग
In reply to हो. by नितिन थत्ते
कधी न
अनुदान आहे कुठे?
हे
In reply to अनुदान आहे कुठे? by कोदरकर
फ्री मार्केट