Skip to main content

भारतीय रुपयाचे नवे चिन्ह कोणते असावे असे आपल्याला वाटते?

लेखक मिलिंद यांनी बुधवार, 30/06/2010 17:24 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1600
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

मी माझे मत पर्याय क्रमांक ४ ला दिलेले आहे. कारण लिहायला सोपे तर आहेच पण त्या देवनागरी टचही आहे

४ लाच दिले आहे.. देवनागरीशी जवळीक साधणारे आहे..

लिवायला सर्वी अवघड. त्यतल्या त्यात २ लंबर बरा. नितिन थत्ते

माझं मत २ ला :)

सर्व चित्रे भिकार वाटली. प्रमाणीक प्रतिक्रीया खटकल्यास क्षमस्व. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धेत हा विषय दिला असता तरी ह्यापेक्षा ढिगानी चांगले सिंबॉल्स मिळाले असते. सगळेच रोगट दिसताहेत ! जे पी

In reply to by जे.पी.मॉर्गन

सहमत आहे. ज्युरी काय मसंवरचे अधिकारी वर्गांपैकी होते काय ? बकवास. --अवलिया

In reply to by अवलिया

प्रतिसाद लिहीणार तेवढ्यात पर्‍या-णाण्या-जेप्या चे प्रतिसाद वाचले :) असेच म्हणतो ... कसलं बकवास षिलेक्शन केलंय =)) रुपया चं बोधचिन्ह की रोगटचं म्हणायचं हे ? ;)

In reply to by अवलिया

आज दुपारी शँपल्स द्यायची आहेत पण अजून एकही तयार नाही. मग घाईघाईने काहीबाही खरडून ते उमेदवार म्हणून जाहीर केले. सगळी पाप्याची पितरे वाटतात. बहुधा भारतात पापाचा पैसा जास्त आहे असे सुचवायचे असेल. ;-)

नान्या,पर्‍या,टार्‍या व जेपी आता चिन्ह द्यायचेच आहे. त्यामुळे सिलेक्ट करणे महत्वाचे आहे. १,२,३ लिहण्यास खुप अवघड आहे. वेताळ

४ ला मत दिले आहे. काढायला आणि समजायला सोपे असे तेच एक आहे ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर

वरील अनेकांशी सहमत.. सारीच चित्रे बकवास आहेत.. त्यातल्या त्यात चौथे बरे होते, देवनागरीशी जवळीक साधणारेही होते. परंतु त्या 'र' च्या पायाशी दोन आडवे बांबू का मारून ठेवले आहेत ते कळले नाही.. त्यामुळे ते शुभचिन्ह वाटत नाही.. साला, लक्ष्मिच्या पायाशी दोन बाबू? छ्या..! सबब, कुणालाही मत दिलेले नाही..
सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धेत हा विषय दिला असता तरी ह्यापेक्षा ढिगानी चांगले सिंबॉल्स मिळाले असते.
मॉर्गनशी अगदी सहमत.. दिवाळखोर प्रतिभा श्रीलक्ष्मिच्या पायी बांबू दुखावला मम जीव दु:ख कुणाला ते सांगू? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

साला, लक्ष्मिच्या पायाशी दोन बाबू? छ्या..!
रूपयाला गोल्ड स्टँडर्डचा आधार नाही, चलनवाढ अमर आहे, हे सर्व क्षणभंगूर आहे (कमोडीटी मार्केटच खरं!) असं सुचवायचं नाहीये ना? मलातरी चौथं चित्रं आवडलं. अजून दोन वर्षांनी जेव्हा यातलं एखादं चित्रं रूळेल तेव्हा ते अनेकांना आवडायलाही लागेल. मला शंका आहे ती भारतात मिळणार्‍या संगणक कीबोर्डांवरून हे चित्रं डायरेक्ट टंकता येईल का? सध्या आपण "अमरिक्के"त बनवलेले, त्यांच्याच ले-आऊटचे कीबोर्ड वापरतो ... अगदी सेम-टू-सेम!! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला शंका आहे ती भारतात मिळणार्‍या संगणक कीबोर्डांवरून हे चित्रं डायरेक्ट टंकता येईल का?
अगदी हेच म्हणणार होतो.पण ब्रिटिशांचे पौंडचे चिन्ह पण कि-बोर्डवर नाही आहे हे बघुन चुप्प बसलो. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

>> ब्रिटिशांचे पौंडचे चिन्ह पण कि-बोर्डवर नाही आहे हे बघुन चुप्प बसलो. युकेत मिळणार्‍या सगळ्या कीबोर्डांवर पौंडांचं चिन्हं असतं आणि युरो+पौंडाचं चित्रं असलेले कीबोर्ड, लॅपटॉप्स मिळतात. अदिती

In reply to by विसोबा खेचर

II R II
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) वैधाणिक इशारा : ह्या सिंबल मुळे रुपया वाळीत टाकल्या जाऊ शकतो. - टारकचंद

In reply to by रेवती

वर पाच फालतु प्रकारचे सिंबॉल्स आहेत , त्यात माझं एक फालतु क्रियेशन असावं असं मला वाटलं ... ह्यात कसलीच च्येष्टा मस्करी नाही ... ह्याचा विश्वास कसा बसवुन देऊ ... बाकी चलणांत जशा एक किंवा दोन काड्या आहेत .. तशा मी चार लावल्या फक्त .. थोडीशी शक्कल लढवुन .. :) - शक्कलीमामा

In reply to by टारझन

सहमत आहे. चेष्टा वाटली नाही. तसेही आपण || श्री अमकेश्वर प्रसन्न || किंवा ||श्री अमकीदेवी प्रसन्न|| किंवा नुसतेच ||श्री|| असे लिहितो की नाही? आपल्या परंपरेला साजेसाच आहे हा सिंबॉल. फक्त आंतरराष्ट्रीय म्हणून आर इंग्रजीत लिहिलेला आहे. (परंपरावादी =)) )नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

तसेही आपण || श्री अमकेश्वर प्रसन्न || किंवा ||श्री अमकीदेवी प्रसन्न|| किंवा नुसतेच ||श्री|| असे लिहितो की नाही?
आरारारारा =)) =)) =)) बाजार उठला =)) =)) =)) थत्ते काका आता मी || श्री थत्तेकाका प्रसन्न|| लिहायला सुरुवात करिन म्हणतो प्रत्येक लेखाच्या आधी =)) - || श्री टारझन प्रसन्न ||

२ छान आहे समुद्री लाटांसारखं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

? चा पाय उलटा मोडा (मात्रा दिल्यासारखा) अन हेच चिन्ह ठेवा. कोण कोठून पैसा खातो त्याचे चिन्ह तयार होईल मग. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

४ ला मत दिले आहे. मोहन

सारी चिन्हे बेकार आहेत. वास्तववादी हवे असेल तर एक' खाणारे तोंड' दाखवा. मत दिले नाही. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

५ हे चिह्न आवडले. दिमाखदार वाटले. एक शंका- केंद्र – सरकारचे कॅबिनेट यावर आता अंतिम निर्णय घेणार आहे हे चिह्न एकूणात रुपयाचे आहे, की फक्त भारतीय रुपयाचे? 'रुपया' या चलनाचे म्हणून हे चिह्न असेल, तर रुपया हे चलन वापरणार्‍या अन्य देशांचेही(पाकिस्तान) मत विचारात घ्यावे लागत असेल. मग आपले केंद्र सरकार त्यावर निर्णय कसा घेणार आहे?

In reply to by ज्ञानेश...

>>>'रुपया' या चलनाचे म्हणून हे चिह्न असेल, तर रुपया हे चलन वापरणार्‍या अन्य देशांचेही(पाकिस्तान) मत विचारात घ्यावे लागत असेल. मग आपले केंद्र सरकार त्यावर निर्णय कसा घेणार आहे? काय राव शिर्षक वाचा की लेखाचे नीट? भारतीय रुपयाचे नवे चिन्ह कोणते असावे असे आपल्याला वाटते?

एकही आवडले नाही ( भारतातील बर्‍याचश्या गोष्टीं आणि लोकांप्रमाणे) पण काय फरक पडतो? ज्युरी आर्ट्स कॉलेजचे असावेत.

कुठलेच चिन्ह आवडले नाही. नुस्ता रू काय वाईट आहे?

मलाही "रू" का नाही ठेवले असा प्रश्न पडला. नाहीतर पहिले चिन्ह वस्तुस्थिती बरोबर दाखवते. "रू" खालपर्यंत पोहोचायच्या आत त्याचा अर्धा भाग (दारिद्र्य)रेषेच्या वरच्या कोणीतरी खाल्ला आहे व तो त्यामुळे गबर झाला आहे :)

In reply to by महेश हतोळकर

रूपयाचे नवे चिन्ह (आणि विजेत्या उदय)च्या चित्रांसाठी प्रतिसादः अदिती

माझे 'बहूमूल्य' मत मी ४ ल दिले, कारण त्या चिन्हात आणी 'गांधीजींमध्ये ' काहीतरी साम्य आहे! ============ माउ

कळ फलकावर सोय केली पाहिजे..