खेकडे
साहित्य :
४-५ खेकडे
आल लसुण पेस्ट १ चमचा
मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
एक मोठा कांदा
२ चमचे मसाला
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा चिंचेचा कोळ
वाटण : १ कांदा व पाव वाटी सुके खोबरे किसुन भाजुन थंड झाल्यावर वाटावे
१ चमचा गरम मसाला.
तेल
कृती:
चिंबोरे साफ करुन घ्यावे. टोपात तेल टाकुन लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळावा. आता त्यात आल, लसुण पेस्ट टाकुन हिंग हळद, मसाला, चिंबोरे व चिंबोरे बुडतील एवढ पाणी टाकायच. आता १० मिनीटे उकळू द्याव मग त्यात गरम मसाला, चिंचेचा कोळ मिठ टाकुन थोडा वेळ उकळवुन गॅस बंद करावा.
अधिक टिपा :
* ह्यात चिंबोर्याचे जे दोन मोठे नांगे सोडून छोटे पाय असतात ते मिक्सरमध्ये वाटून त्याचा गाळही रश्यात टाकतात.
* चिंचेचा कोळ त्याचा वईसपणा घालवण्यासाठी टाकतात. म्हणून थोडाच टाकावा. आंबट होऊ देउ नये.
* चिंबोरी छोटी असतील तर कापली नाहीत तरी चालतात.
मोठ्या चिंबोर्या मधुन कापुन त्यच्या पोटातील काळी पिशवी काढुन टाकतात.
* चिंबोर्याचे पिठ भरुन कालवण करतात त्याची रेसिपी नंतर टाकेन.
वाचने
7343
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
कालच केले होते
In reply to कालच केले होते by प्रियाली
हे खायचं
In reply to हे खायचं by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे खायचं!
In reply to कालच केले होते by प्रियाली
व्वा!
धन्यवाद
In reply to धन्यवाद by आंबोळी
दोन्ही!!!
In reply to दोन्ही!!! by सुनील
आणि
जरूर
प्रियाली,
In reply to प्रियाली, by जागु
साफ करून
बर आहे पण
असा कि वेळ लागतो जागु
तुमच्या
In reply to तुमच्या by सिमन्तिनि
अहो जागु
वेताळ त्या