मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिस्किट शेवपुरी

सुप्रिया · · पाककृती
From bisuit shevpuri 2
साहित्य :
From bisuit shevpuri 2
कांदा, टमॅटो बारिक चिरावे.
From bisuit shevpuri 2
उकडलेले बटाटे मॅश करावेत.
From bisuit shevpuri 2
गोड चटणी : खजूर, चिंच, लाल तिखट, मीठ, गूळ, जीरे भिजवून एकत्र वाटून घ्यावे.
From bisuit shevpuri 2
हिरवी चटणी : कोथिंबीर, पुदीना, मिरची, मीठ एकत्र वाटून घ्यावे.
From bisuit shevpuri 2
मोनॅको बिस्किटं, बारिक शेव
From bisuit shevpuri 2
प्रथम मोनॅको बिस्किटं ताटलीत घ्यावीत.
From bisuit shevpuri 2
त्यावर उकडलेला बटाटा ठेवावा.
From bisuit shevpuri 2
त्यावर चिरलेले कांदा, टमॅटो ठेवावेत.
From bisuit shevpuri 2
त्यावर दोन्ही चटण्या घालाव्यात.
From bisuit shevpuri 2
त्यावर बारिक शेव घालावी. चवीपुरतं मीठ, कोथींबीर घालावी.

वाचने 8291 वाचनखूण प्रतिक्रिया 24

अमोल केळकर Mon, 06/28/2010 - 12:07
मस्त आयडिया. गोल पुरीतून ( पाणी पुरीच्या ) मिळणार्‍या शेवपुरीला चपट्या पुरीची सर नाही. मात्र बिस्किटाचा पर्याय मस्तच :) अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by टारझन

सुप्रिया Mon, 06/28/2010 - 14:12
बापरे! टारझनची ड्र्मभर भेळेची रेसिपी आठवली. :) "अंमळ मोघम बनवा मात्र " - हा धोका लक्शातच आला नव्हता. :S

जागु Mon, 06/28/2010 - 13:02
अरे वा. खुपच छान. लहान मुलांना वेगळीच बिस्किट पुरी छान आहे.

जागु Mon, 06/28/2010 - 13:02
अरे वा. खुपच छान. लहान मुलांना वेगळीच बिस्किट पुरी छान आहे.

रेवती Mon, 06/28/2010 - 17:40
मला फोटू दिसत नाहीत.:( शिर्षकावरून पदार्थ भारी असणार असं वाट्टय. रेवती

संदीप चित्रे Mon, 06/28/2010 - 17:40
पाकृ बघून शेव-पुरी लगेच खावीशी वाटतेय. निदान फोटो पाहून म्हणून तू दिलेल्या दुव्यांवर गेलो तर असं दिसतंय.... "Oops... there's nothing to see here. Either you do not have access to these photos, or they don't exist at this web address. Please contact the owner directly to gain access."

रेवती Mon, 06/28/2010 - 19:25
फोटो दिसले. दिसायला तरी नेहमीच्या शेवपुरीसारखीच दिसते आहे. चवीला कशी लागते ते बघायला हवे. रेवती

पक्या Tue, 06/29/2010 - 04:49
पुरीसाठी बिस्कीटाचा पर्याय ठि़क वाटतोय. खाल्ल्यावरच समजेल आवडले की नाही ते. बाकी, बटाटे स्मॅश नाही मॅश करतात. स्मॅश व मॅश दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत. जय महाराष्ट्र , जय मराठी !