Skip to main content

(धूळ)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी शुक्रवार, 25/06/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन यज्ञात आमची एक शुल्लक आहुती हातात झाडू घेवुन आम्ही झाडायचो ती एका कोपर्‍याला साफ ठेवायची अन् मी दुस-या कोपर्‍याला साफ ठेवायचो झाडू सावरत झाडत असताना पुसत असतांना रस्ते प्रत्यक्षातही चकाकायचे एकमेकांना हलकेच चोरुन बघायचो मुकादमाच्या गाडीवरून कधीतरी तिची ड्यूटी बदलून गेली मी मात्र मारतो झाडू रस्त्यांवरून झाडूवाल्यासारख्या कायम...हा कोपरा ते तो कोपरा.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3200
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

हाहाहा!!!!!!!!!!! आज परत पेटतंय आता... एक सूचना: मुकादमाच्या गाडीवरून कधीतरी ती तोर्‍यात बसून निघून गेली हे कसं वाटतंय. :D बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वाटतंय तर चांगलं. पण कसं आहे बदललेल्या 'ड्यूटी'त जो अर्थ आहे तो "तोर्‍यात निघून गेली " असं म्हटलं तर अगदीच विस्कटून सांगितल्यासारखा होईल. नाही का? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>पण कसं आहे बदललेल्या 'ड्यूटी'त जो अर्थ आहे तो "तोर्‍यात निघून गेली " असं म्हटलं तर अगदीच विस्कटून सांगितल्यासारखा होईल. नाही का? सध्या जे आहे तेच 'सुचक' आहे. पुप्या, कविता आवडली रे, मस्त जमते आहे रे तुला विडंबन वगैरे ... ------ छोटा डॉन

या या या, पेशवे तुमचीच वाट पहात होते. बाकी कोणत्या रस्त्यावर झाडता म्हणे तुम्ही हल्ली?? (हो, हो, आठवतं आहे, आपलं काय ठरलं आहे ते!) अदिती

झकास हो पेशवे! झाडून सगळ्या विडंबकांनी विडंबनं पाडली होती, तुम्हीच बाकी होतात! मजा आला! वा वा!

आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे अस गाव भर बोबलून पुन्हा चुकला पीर मशीदीत परत.. चालू दे.. साफसफाई उत्तम .. ड्यूटी शी सहमत (सुकादम)केशवसुमार

छान झाडू फिरवला आहेस रे.. उत्तम विडंबन!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्तच झाडलाय!! ;) (कंत्राटदार)चतुरंग

आयला एवढ्या गाळात ही धुळ झटकायाची राहुनच गेली होती. चांगलू धुळ उडवली आहे :)

>> एकमेकांना हलकेच चोरुन बघायचो>> शी बाई चावट!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

तरीच म्हटलं आमचे शेट कुठे गेले? --अवलिया

पुप्या ब्याक इन फॉर्म......सही रे!!

आलात परत लायनीवर. बरं वाटलं.

भारी जमलंय विडंबन.

अहाहा... झाडलोट, कोपरे, गाडी आणि मुकादम... मस्त ...आवडले....

रस्ते प्रत्यक्षातही चकाकायचे एकमेकांना हलकेच चोरुन बघायचो मी मात्र मारतो झाडू रस्त्यांवरून झाडूवाल्यासारख्या कायम...हा कोपरा ते तो कोपरा. रस्ते इतके चकाकायचे की तुम्ही एकमेकांना हलकेच चोरुन बघायचे ?? कुठला फिनेल / पावडर वापरत होता ?? :? असो किती रस्ते अन कोपरे झाडून पुसून लक्ख केले ?? :? झटका दिया ... ~ वाहीदा