Skip to main content

<चूळ>

लेखक शुचि यांनी गुरुवार, 24/06/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
हातात दातून घेवुन आम्ही दात घासायचो ती एक चूळ भरायची अन् मी दुसरी चूळ भरायचो दात घासत चूळा भरत असताना, चुंबनाआधी माउथफ्रेशनरची शिस्त पाळायची एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो माउथफ्रेशनर वापरता वापरता कधी तिची बत्तीशी पडली कळलच नाही मी मात्र भरत आहे त्याच चूळा माऊथफ्रेशनर वापरत... डे टु नाईट.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2305
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

खि खि खि! आता कोणीतरी 'चूळ' भरेलच असे वाटत असताना हे विडंबन आले. आज (चूळ) भरून पावले.;) रेवती

=)) =)) भडकमकर मास्तरांकरांकडून जालिंदरबाबांचा अंगारा आणा! अदिती

आज काही खरं नाही! =)) =)) अरे केसूशेठ कुठे गेले? शोधा शोधा.... चतुरंग

वा सुचि वा !! मस्त मस्त मस्त :) ए कुठाय रे माऊथगफ्रेशणर ... घेऊन या पोतंभर ;) - कवळ्या

नुसतं चुंबन काय आलिंगन काय आणि मौथ फ्रेशनर वापरून चुंबन काय !!! एवढी चुम्बाचुम्बी !!! बर्याच रोम्यांटिक मुडात दिसतेय... छान विडंबन. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

'रूळा' वरून धाडधाड करीत विडंबन एक्सप्रेस "गूळ" काढायचे "खूळ" काढून थेट चुम्बा चुंबी पर्यंत ! अन तेही फ्रेशनर ने "चूळ" भरून ! वा ! लगे रहो ! ! ! आवडले ! ! !

अशक्य विडंबन आणि त्याची थीम ...
चुंबनाआधी माउथफ्रेशनरची शिस्त पाळायची एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो
_/\_ अत्यंत जबरा ( आणि वास्तविकतेच्या जवळ जाणारे ;) )!!! लै जबरा ... ------ (शिग्रेटी फुकुन माऊथ फ्रेशनर वापरणारा) छोटा डॉन

विडंबनातुन समुपदेशन... लगे रहो --अवलिया

दणका विडंबन !!! (चूळप्रेमी) बिपिन कार्यकर्ते