मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - ३ : Die Mannschaft अर्थात जर्मनी!

मेघवेडा · · विशेष
विशेष
Auf jeden Regen folgt auch Sonnenschein.
थोड्याफार फरकाने 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' या अर्थाचं हे वाक्य! मागल्या खेपेस आपल्याच घरात इटालियन प्रसाद खाऊन, नंतर पोर्तुगालला हरवत तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानणार्‍या जर्मन संघातील प्रत्येक खेळाडू, नव्हे प्रत्येक जर्मन नागरीक हेच म्हणत असावा. २००६ सालच्या विश्वचषकात जर्मनीकडे अर्गन क्लिन्समन सारखा धूर्त व चाणाक्ष सेनापती, मिरोस्लाव क्लोज व ल्युकास पोडोल्स्की सारख्या आग ओकणार्‍या तोफा आणि मायकल बलॅक, फिलीप लाह्म, बॅस्टियन श्वाईन्श्टायगर, आर्ने फ्रीडरीक असली भरभक्कम तटबंदी असतानाही इटलीकडून उपांत्य फेरीत मात खाऊन विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी जर्मन संघ गमावून बसला. 'सुवर्णसंधी' इतक्याचसाठी म्हटलं की तर घरचा सपोर्ट होताच त्यात ते उपांत्य फेरीपर्यंत अजिंक्य होते. एकही सामना त्यांनी गमावलेला नव्हता. ग्रुप स्टेज टॉप करून पुढे जर्मनीने स्वीडन (२-०) आणि अर्जेंटीना (४-२, पे.) सारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्यांचा अक्षरशः संहार केला होता. त्यात क्लोज (४ गोल्स) आणि पोडोल्स्की (३ गोल्स) दोघेही भयानक फॉर्मात होते. जर्मन अश्वमेधाचा वारू चौखूर उधळलेला असताना इटलीने त्याला लगाम लावला. विश्वचषकाकडे लाखो जर्मन डोळे पुन्हा एकदा गदगदून पाहत होते. त्यांचा विश्वचषकातील इतिहास फार विलक्षण आहे. बेकेनबाऊरने सत्तरीच्या दशकात खेळाडू म्हणून तर ऐंशीच्या दशकात प्रशिक्षक म्हणून जर्मन फुटबॉलला कुठच्या कुठे नेऊन ठेवलं. पुढे १९९० साली त्यांनी विश्वचषक जिंकला तेव्हापासून जवळजवळ प्रत्येक विश्वचषकात ते प्रबळ दावेदार मानले गेलेत. आणि गेल्या दशकातील दोन्ही विश्वचषकांत उत्तम कामगिरी करत अनुक्रमे दुसरा (२००२) आणि तिसरा (२००६) क्रमांक पटकावला. अशात यंदाच्या खेपेला अर्थात पुन्हा तोच जर्मन संघ, सर्वोच्च यशाला गवसणी घालण्याच्या ईर्ष्येने नव्या सेनापतीसह, त्याच आग ओकणार्‍या तोफा आणि तीच भरभक्कम तटबंदी घेऊन पुन्हा कुरुक्षेत्रावर उभा ठाकलाय. यंदाही ते फेव्हरिट्स मानले जात आहेतच. यंदा जर्मनीचा समावेश आहे 'ग्रुप डी' मध्ये जिथं ते भिडणार आहेत सर्बिया, घाना आणि ऑस्ट्रेलियाशी. सर्बिया आणि घाना कडवट प्रतिकार करण्यासाठी मशहूर असले तरी ग्रुप स्टेज मधून सहीसलामत बाहेर येण्यास जर्मनीला फारसे कष्ट पडतील असं वाटत नाही. क्लिन्समनकडून जोआकिम लोव यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जर्मन संघ यशाच्या पायर्‍या चढतोच आहे. २००६ विश्वचषकात तिसरा क्रमांक (तेव्हा लोव सहाय्यक प्रशिक्षक होतेच), २००८ युरो मध्ये उपविजेते ठरल्यानंतर आता फुटबॉल विश्वातील सर्वोच्च सन्मान प्राप्त करण्याच्या दुर्दम्य महत्वाकांक्षेने जर्मन योद्धे रणांगणात उतरत आहेत. मोक्याच्या क्षणी आपल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी जर्मन संघ प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर अनुभवसंपन्न लढवय्ये खेळाडू, योग्य त्या वेळी प्रसंगावधान राखून योग्य त्या चाली खेळण्याचं त्यांचं कसब अजब आहे. उगाच नाही 'फुल बॅक' ला खेळणारा फिलिप लाह्म टर्कीच्या पेनल्टी एरियात येऊन गोल करून जात! The Germans' consistent success is based on deep reserves of experience, finely-honed tactical know-how, and the ability to rise to the occasion when the chips are down. Their qualifying campaign merely served to emphasise the enduring nature of those attributes. या शब्दांत त्यांच्या ताकदीचं वर्णन फिफाने केलंय. संघ गोलरक्षक : मॅन्यूल न्यूर, हान्स-यॉर्ग बट्ट, टिम वीज. बचावफळी : डेनिस ऑगो, हॉल्गर बॅडस्टयूबर, येरोम बोटेंग, आर्ने फ्रीडरीक, मार्सेल येन्सन, फिलिप लाह्म, पर मर्टसॅक, सर्दर ताची मिडफील्डर्स : सॅमी खेदिरा, टोनी क्रूस, मार्को मारीन, मेसुत ओझिल, बॅस्टियन श्वाईन्श्टायगर, पीऑतर ट्रोचोव्स्की फॉरवर्डस : मारिओ गोमेझ, स्टेफान कीब्लिंग, थॉमस म्युलर, ल्युकास पोडोल्स्की आणि मिरोस्लाव क्लोस्जे. प्रशिक्षक : जोआकिम लोव (जर्मनी) यावेळच्या जर्मन संघावर तरूणाईचं वर्चस्व आहे. लोव यांनि संघनिवड करताना अनुभव आणि तरूण रक्ताचा जोश याचा सुरेख ताळमेळ साधला आहे. केवळ मिरोस्लाव क्लोज, आर्ने फ्रीडरीक आणि हान्स-योर्ग बट हे तीनच तिशी ओलांडलेले खेळाडू या संघात आहेत. असे असले तरी युवा पण अनुभवी खेळाडूंची कमतरता नाही. तर आता बघूया या जर्मन संघाचे प्रमुख आधारस्तंभ : फोटोंचा क्रम : फिलिप लाह्म , मिरोस्लाव क्लोस्जे , बॅस्टियन श्वाईन्श्टायगर आणि ल्युकास पोडोल्स्की! यंदाच्या खेपेला जर्मन संघाला हरहुन्नरी मायकल बलॅकची उणीव जाणवणार आहे खरी. ती पोकळी भरून काढणे अशक्य गोष्ट आहे. त्याच्या अनुपस्थितीत जर्मन संघाचा प्रमुख आधारस्तंभ कोण असेल यात वादच उद्भवत नाही. जर्सी क्रमांक १६. बायर्न म्युनिकचा खंदा 'फुल बॅक' डिफेण्डर, काटकुळी शरीरयष्टी, पायात चित्त्याचा वेग. तरूण रक्त पण जोडीला अनुभवाची शिदोरीही! बलॅकच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करण्यास समर्थ असं एकच नाव होतं - फिलिप लाह्म. मागल्या खेपेस आपल्या नावाचा दबदबा निर्माण करत त्या वर्षी युएफा 'टीम ऑफ द ईयर' मध्ये 'लेफ्ट बॅक' म्हणून समावेश. कुणी म्हणेल पॅट्रिक एव्हरा, कुणी म्हणेल अ‍ॅशली कोल पण आमच्या मते आजच्या घडीला 'बेस्ट फुल बॅक इन द वर्ल्ड' इज नन अदर दॅन फिलिप लाह्म! माझ्यामते खुद्द एव्हरा आणि डॉनराव सुद्धा हे मान्य करतील ;) बेस्ट म्हणण्याचं कारण हेच की बचावाचे कार्य यशस्वीरित्या सांभाळत, वेळप्रसंगी आक्रमकता दाखवत, चपळाईने प्रतिस्पर्ध्याच्या पेनल्टी क्षेत्रात शिरून गोल मारण्यात लाह्मचा हातखंडा आहे. मागल्या विश्वचषकातील पहिला गोल लेफ्ट बॅकहून फॉरवर्डला येत फिलिप लाह्मनेच मारला होता. लाह्म मागल्या विश्वचषकातील कदाचित सर्वोत्तम खेळाडू ठरावा कारण त्याने निर्माण केलेल्या गोल्सच्या संधी! पण त्या संधी पूर्णत्वास नेण्याचं कठीण काम आणखी एक कणखर योद्धा जर्मनीसाठी वर्षानुवर्षे पार पाडत आलेला आहे आणि याखेपेसही 'प्लेमेकर्स'नी निर्माण केलेल्या गोलच्या संधींना तडीस नेण्यासाठी जर्मनीची भिस्त असेल ती आतापर्यंत जर्मनीसाठी ४९ गोल नोंदवणारा, २००६ च्या विश्वचषकात 'गोल्डन बूट' चा मानकरी ठरलेला मिरोस्लाव क्लोज याच्यावर! (याच्या नावाचा उच्चार 'क्लोस्जा' का 'क्लोस्जे' असा होतो म्हणे ;) पण आम्ही 'क्लोज'च करणार!) विश्वचषक, युरो अशा मानाच्या स्पर्धांमध्ये गड्याच्या पायाला जणू वायुवेग लाभतो आणि डोकं तर ध्वनिवेगात काम करत असतं! रायझिंग टू द ओकेजन = मिरोस्लाव क्लोज! मागल्या दशकातील दोन्ही विश्वचषकात पठ्ठ्याने ५-५ गोल्स मारून जर्मनीच्या घोडदौडीत सिंहाचा वाटा उचलला! त्याचं आता वय झालं, तेवढा वेग आता त्याच्या खेळात उरला नाही अशी टीका त्याच्यावर होऊ शकते मात्र विश्वचषकात क्लोजचा खेळ उंचावला नाही असं झालेलं नाही! माझं मत : गोल्डन बूटचा एक प्रबळ दावेदार! २००६ च्या विश्वचषकात जर्मन संघात अनेक तरूण आणि अनोळखी खेळाडूंचा भरणा होता. त्यात एक नाव होतं बॅस्टियन श्वाईन्श्टायगर! नाव कसं भारी आहे की नै? खेळही तितकाच भारी आहे हं.. एक अत्त्युच्च दर्जाचा अटॅकिंग मिडफील्डर. २००६ विश्वचषकापासून फिलिप लाह्मच्या सोबतीनेच नावारूपास आला! त्याच्याकडे जर्मन फुटबॉलचं भविष्य म्हणून पाहिलं जातं. यंदाच्या खेपेस बलॅकच्या अनुपस्थितीत मधल्या फळीची संपूर्ण मदार बॅस्टियनच्या खांद्यावर आहे आणि ती पेलण्यास आपण समर्थ आहोत हे त्याने वेळोवेळी दाखवूनही दिलं आहे. जर्मनीचा 'प्लेमेकर' म्हणून श्वाईन्श्टायगरचं नाव घेतलं जातंय! एका अर्थी श्वाईनश्टायगर हा जर्मनीच्या कामगिरीचा 'बॅरोमीटर' ठरावा! श्वाईन्श्टायगर, क्लोज आणि लाह्म एकाच क्लबसाठी - बायर्न म्युनिक - खेळत असल्याने एकत्र खेळण्याचा सराव आणि ताळमेळ आहेच! याशिवाय या संघाचा चौथा आधारस्तंभ आहे - २००६ च्या स्पर्धेत सर्वोत्तम युवा खेळाडू ठरलेला, लाखो जवान जर्मन दिलों की धडकन असणारा ल्युकास पोडोल्स्की! २००६ च्या स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डो, लायनल मेसी सारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मागं टाकत पोडोल्स्की सर्वोत्तम युवा खेळाडु किताबाचा मानकरी ठरला. त्याचे क्लबसाठीचे (कोल्न) प्रदर्शन तितकेसे उत्कृष्ट नसले तरी जर्मनीसाठी खेळताना मात्र तो नेहमीच भरीव योगदान देत आला आहे. मागल्या खेपेस स्वीडन विरुद्ध पठ्ठ्याने पहिल्या १२ मिनिटातच २ गोल केले. त्या धक्क्यातून स्वीडिश संघ सावरलाच नाही आणि जर्मनीने सामना २-० असा जिंकला. सुरुवातीच्या काही मिनिटांत अतिआक्रमक खेळ करण्यासाठी प्रसिद्ध. पोडोल्स्की, श्वाईन्श्टायगर, क्लोज यातले कुणीही दोघे क्लिक झाले तरी प्रतिस्पर्ध्याच्या दृष्टीने काळजीची गोष्ट ठरू शकते. शिवाय मेसुत ओझिल हा तरूण नवखा खेळाडू जर्मनीच्या संघात आहे. बॅस्टियनप्रमाणेच एक अ‍ॅटॅकिंग मिडफील्डर. त्याच्या नावाचा बराच गाजावाजा झाला असल्याने विश्वचषकाचं प्रेशर तो हॅण्डल करू शकेल का हा एक प्रश्न आहे! जोआकिम लोव यांचा भर शक्यतो ४-४-२ अशा आक्रमक रचनेवर असतो, पण जरी कधी त्यांनी ४-३-२-१ अशी रचना वापरली तरी गोल स्कोअरिंग हा जर्मनीसाठी प्रॉब्लेम ठरेल असं वाटत नाही. पोडोल्स्कीला क्लिन्समननी सुरुवातीच्या काही मिनिटांत आक्रमक खेळवले होते. लोवसुद्धा तीच स्ट्रॅटेजी वापरतील असे वाटतं. बलॅकची पोकळी भरून काढणं अशक्य आहे. त्याच्या शारिरिक क्षमतेस रिप्लेस करू शकेल अशी युवाफळी जर्मनी कडे आहे पण त्याची कणखर मानसिकता हे युवा खेळाडू आत्मसात करू शकतील काय? ब्राझील हा विश्वकप इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असला तरी जर्मन सर्वात कन्सिस्टंट आहेत. त्यांनी १७ वेळा फायनल्सला क्वालिफाय केलंय आणि त्यात फक्त एकदाच ग्रुप स्टेज मध्ये बाहेर पडले आहेत! यंदाच्या खेपेसही ग्रुपमध्ये अजिंक्य राहून सेमी फायनलपर्यंत ते आरामात जाऊ शकतात. पण सातत्य हा एक कळीचा मुद्दा ठरू शकतो, कारण बर्‍याच तरूण खेळाडूंना महत्त्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागतील आणि या कसोटीस ते कितपत उतरतात यावर जर्मन संघाचं यश अवलंबून राहिल! अशा या आक्रमकतेवर भर देणार्‍या जर्मन संघास यंदा फेव्हरीट्स मानण्यास हरकत नसावी. आमचं प्रेडिक्शन : सेमीफायनल नक्की. तिथं स्पेनशी लढत झाल्यास सांगणं कठीण आहे!

वाचने 14550 वाचनखूण प्रतिक्रिया 65

गणपा गुरुवार, 06/24/2010 - 15:42
आहा रे पठ्या. आपलाही फुल सपोर्ट जर्मनीलाच..

In reply to by गणपा

छोटा डॉन Sat, 07/03/2010 - 21:05
जर्मनी सध्या ३-० ने पुढे आहे. आता इथुन पुढे हरेल असे वाटत नाही, सेमी-फायनल डन ! अभिनंदन जर्मनी आणि जर्मन सपोर्टर्स !!! ------ छोटा डॉन

In reply to by गणपा

टारझन Sat, 07/03/2010 - 23:11
बरे हारले आर्जेंटिणा वाले .. .तो येडा म्याराडोणा म्हणे नागवा पळणार होता वर्ल्डकप जिंकला असता तर !! सगळे म्हंटले "वर्ल्डकप नको पण (मेरा)डोन्या ला आवरा "

In reply to by टारझन

पांथस्थ Sat, 07/03/2010 - 23:39
सगळे म्हंटले "वर्ल्डकप नको पण (मेरा)डोन्या ला आवरा "
देवा देवा =)) =)) =)) - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

यशोधरा Fri, 06/11/2010 - 16:43
मेव्या, भारी लिहिलंयस! आवडलं :) पहिला फोटो दिसत नाही, पहा जरा. (कोणता कॅमेरा वापरलास? ;) संबंधितांनी हलके घ्यावे! )

In reply to by यशोधरा

मदनबाण Fri, 06/11/2010 - 17:03
लय भारी... मेजवानी सुरु झालेली आहे... :) (अरे हे काय कोणत्याच फोटोवर पाणी खूण नाही... छ्या कसं शक्य आहे हे ? संबंधितांनी फारच हलके घ्यावे!!! ) ;) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by मदनबाण

यशोधरा Fri, 06/11/2010 - 17:40
>>कोणत्याच फोटोवर पाणी खूण नाही... छ्या कसं शक्य आहे हे ? >> कारण फोटो मेव्याने काढलेले नाहीत, म्हणून मेव्याची पाणी खूण नाही, आणि ज्याने कोणी काढलेत, त्याने आपली खूण ठेवलेली नाही, म्हणून. बाणा, पुन्हा एकदा चर्चा नीट वाचून ये बरं! म्हणजे असे प्रश्न पडायचे नाहीत! :P

In reply to by यशोधरा

मदनबाण Fri, 06/11/2010 - 17:56
ज्याने कोणी काढलेत, त्याने आपली खूण ठेवलेली नाही, म्हणून तेच म्हणायचे हाय मला... तुलाच समजले नाय बघ... असो. चला आता हा चेंडु टोलवा टोलवी करायचा नाय मला... धागा फुटबॉलचा असल्याने मी इथेच थांबतो कसा. :P मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

गणपा Fri, 06/11/2010 - 17:28
हे सामने घरी बसुन पहाता येणार नाही त्या माझ्या सारख्या अभाग्यांना ही साईट पर्वणी ठरावी. ( नाय घरी परवानगी काढावी लागते अश्यातला भाग नाही, त्यावेळी आम्ही हापीसात असणार ना ) http://www.footyfire.com/

डॉइशलांड! डॉइशलांड!! डॉइशलांड!!! डॉइशलांड!!!! डॉइशलांड!!!!! डॉइशलांड! डॉइशलांड!! डॉइशलांड!!! डॉइशलांड!!!! डॉइशलांड!!!!! डॉइशलांड! डॉइशलांड!! डॉइशलांड!!! डॉइशलांड!!!! डॉइशलांड!!!!! डॉइशलांड! डॉइशलांड!! डॉइशलांड!!! डॉइशलांड!!!! डॉइशलांड!!!!! डॉइशलांड! डॉइशलांड!! डॉइशलांड!!! डॉइशलांड!!!! डॉइशलांड!!!!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सहज Sat, 06/12/2010 - 06:03
डॉइशलांड! डॉइशलांड!! डॉइशलांड!!! डॉइशलांड!!!! डॉइशलांड!!!!! डॉइशलांड! डॉइशलांड!! डॉइशलांड!!! डॉइशलांड!!!! डॉइशलांड!!!!! डॉइशलांड! डॉइशलांड!! डॉइशलांड!!! डॉइशलांड!!!! डॉइशलांड!!!!! डॉइशलांड! डॉइशलांड!! डॉइशलांड!!! डॉइशलांड!!!! डॉइशलांड!!!!! डॉइशलांड! डॉइशलांड!! डॉइशलांड!!! डॉइशलांड!!!! डॉइशलांड!!!!!

शुचि Sat, 06/12/2010 - 06:21
>>Auf jeden Regen folgt auch Sonnenschein. थोड्याफार फरकाने 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' या अर्थाचं हे वाक्य! मागल्या खेपेस आपल्याच घरात इटालियन प्रसाद खाऊन, नंतर पोर्तुगालला हरवत तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानणार्‍या जर्मन संघातील प्रत्येक खेळाडू, नव्हे प्रत्येक जर्मन नागरीक हेच म्हणत असावा. >> मस्त लेख छान! आवडला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मेघवेडा Mon, 06/14/2010 - 15:06
अपेक्षेप्रमाणे जर्मन वाघांनी 'सॉकरूज'चा फडशा पाडला अगदी! पाचपैकी चार स्ट्रायकर्सनी एकेक गोल मारून जर्मनीला धडाकेबाज सुरूवात करून दिली! ल्युकास पोडोल्स्कीने नेहमीप्रमाणे सुरूवातीस आक्रमक खेळ करत ८व्या मिनिटालाच ८२ एमपीएच च्या स्पीडने गोलवर तोफ डागली आणली या पहिल्या दहा मिनिटांतच ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर गेली! २६व्या मिनिटाला मुलरच्या सुंदर क्रॉस-इनवर मिरोस्लाव क्लोजने एक अप्रतिम हेडर मारत दुसरा प्रहार केला! काही मिनिटांपूर्वीच पोडोल्स्कीच्या एका निव्वळ हायक्लास पासला फक्त गोलची दिशा द्यायची होती, आणि क्लोजकडून ती सोपी संधी हुकली होती. पण लगेच त्याने भरपाई केल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद सर्व काही सांगून गेला. मध्यंतरापर्यंत हाच स्कोर कायम राहिला. अर्थात तोपर्यंत जर्मनीने अधिकाधिक आक्रमणे करत 'सॉकरूज' ना हतबल केलेच होते. 'आता हा सामना जर्मन किती गोल्सनी जिंकतात' एवढाच प्रश्न उरला आहे असे वाटू लागले होते तोवर! उत्तरार्धात नवख्या ओझिलला जणू नवचैतन्य लाभले होते. वायुवेगाने अवघ्या मैदानावर धावत होता गडी. आणि त्याच्या तरूण जोशास तोडीस तोड जोश दाखवत जर्मन कर्णधार फिलिप लाह्म फुलबॅक ते फॉरवर्ड अशा वार्‍या करत होता! झंझावात म्हणजे काय याचा अक्षरशः प्रत्यय येत होता! त्यात ५६व्या मिनिटास ऑस्ट्रेलियन ट्रम्पकार्ड टिम केहिल याला रेड कार्ड दिले गेले. श्वाईनश्टायगर ला उशीरा टॅकल केल्याने मेक्सिकन रेफ्री मार्को रॉड्रिगेझ यांनी केहिलला 'स्ट्रेट रेड' दिले आणि आधीच जखमी झालेल्या सॉकरूजवर 'त्रयस्थ वार' केला! माझ्या मते हे रेड कार्ड अनावश्यक होते. मग जर्मनीने आक्रमणांच्या अनेक फैरी झाडल्या. ६६व्या मिनिटाला मेसुत ओझिलने ड्रिबलिंगचे अप्रतिम कौशल्य दाखवत ऑस्ट्रेलियन बचाव भेदलाच म्हणताना गोलकीपर मार्क श्वार्झरने त्याला वेळेत अडवले आणि एक गोल वाचवला! पण पुढल्या चार मिनिटांतच थॉमस म्युलर आणि बदली स्ट्रायकर काकाउ (ब. क्लोज) यांनी दोन गोल डागत ऑस्ट्रेलियाची बरोबरीची स्वप्नंही धुळीत मिसळली! जोआकिम लोव यांनी त्यानंतर पोडोल्स्कीऐवजी मारिओ गोमेझ हा आपला पाचवा स्ट्रायकर उतरवला. पण गोलसंख्येत भर पडली नाही. अखेर जर्मनीने १०-मॅन सॉकरूजवर ४-० असा विजय साधला! अप्रतिम खेळ करत आजच्या दिवसाचा प्लेमेकर आणि 'मॅन ऑफ द मॅच' ठरला मेसुत ओझिल! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक पिम वर्बीक यांनी बरोबरीवर लक्ष केंद्रित करून ४-३-२-१ अशी बचावात्मक रचना वापरली तर जोआकिम लोव यांनी नेहमीप्रमाणे ४-४-२ अशी रचना वापरून आक्रमणावर भर दिला! जर्मन झंझावातापुढे ऑस्ट्रेलियन बचाव निष्प्रभ ठरला आणि विजयी सलामी देण्याची आपली गेल्या २८ वर्षांची परंपरा जर्मनीने कायम राखली!

In reply to by मेघवेडा

छोटा डॉन Mon, 06/14/2010 - 15:19
लै भारी रे मेघ्या, मस्त रिव्ह्युव्ह लिहला आहेस. काल जर्मन्स अक्षरशः वाघाप्रमाणेच खेळले, जर टीममध्ये 'बलाक' असता तर काय बहर आला असता ह्याचाच मी विचार करत होतो. पण बलाकची रिप्लेसमेंट असलेला प्लेमेकर 'ओझिल' बी काय कमी न्हाई हेच खरे ... मला फक्त १ आश्चर्य वाटले, जर्मन्सनी त्यांचा सध्याचा लै फॉर्मात असलेला गोली 'हान्स-यॉर्ग बट' ह्याला का अंतिम ११ मध्ये घेतले नाही ? ह्या पठ्ठ्याने गेल्या काही महिन्यात कमाल केली आहे गोलसमोर. आत्ता नाही तरी पुढच्या काही मॅचेसमध्ये ह्याची गरज पडावी असे वाटते. अवांतर : क्लोस्जेच्या खेळाने आपण लै खुष झालो. साला त्या बायर्न म्युनिकवाल्यांना ह्याला उगच कुजवुन ठेवला होता. बट ही इज दी बेस्ट ! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

Nile गुरुवार, 06/24/2010 - 12:09
चला जर्मनी अन इंग्लडपैकी एक बाहेर जाईलच आता. सो हे लोक कुणाला समर्थन देतात ते बघुया. ;) -Nile

In reply to by Nile

छोटा डॉन गुरुवार, 06/24/2010 - 13:35
मी तर म्हणतो की ह्या दोन्ही टिमा जहन्नुममध्ये जाव्यात म्हणजे आमच्या 'स्पेन'ला रान मोकळे सापडेल. ;) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रभो गुरुवार, 06/24/2010 - 18:17
ओ बिका, फेबु म्हणजे काय फिफाची ऑफिशीयल साईट वाटली की काय तुम्हाला??? ;)

In reply to by छोटा डॉन

गणपा गुरुवार, 06/24/2010 - 13:47
>>मी तर म्हणतो की ह्या दोन्ही टिमा जहन्नुममध्ये जाव्यात म्हणजे आमच्या 'स्पेन'ला रान मोकळे सापडेल. वा वा वा डॉन्राव तुम्ही आमच्या जर्मणीला इतक बिचकुन आहात हे जाणुन लै आणंद झाला ;)

In reply to by गणपा

छोटा डॉन गुरुवार, 06/24/2010 - 14:11
>>डॉन्राव तुम्ही आमच्या जर्मणीला इतक बिचकुन आहात हे जाणुन लै आणंद झाला कोण जर्मनी ? खरं सांगु का आम्हाला टेन्शन कशाचे आहे ते ? काय व्हायचं की तिकडे जर्मनी मॅचमध्ये इंग्लंडकडुन मार खायची ( काय पण कल्पनाविलास, असो ) आणि त्या दु:खात इथले आमचे काही 'आंतरजालीय मित्र' भलेबुरे खरडुन बसायचे व आमच्याकडुन रट्टे खायचे. सबब, जर्मनी हारल्याचे काही नाही हो पण उगाच आमच्या मित्रांना जालावर रट्टे खावे लागतात ह्याचेच आम्हाला वाईट वाटते. ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

मेघवेडा गुरुवार, 06/24/2010 - 14:14
>> काय पण कल्पनाविलास हे अख्खा प्रतिसाद संपल्यावर लिहायला हवं होतं कंसात ;)

In reply to by मेघवेडा

छोटा डॉन गुरुवार, 06/24/2010 - 14:18
>> हे अख्खा प्रतिसाद संपल्यावर लिहायला हवं होतं कंसात काय पण कल्पनाविलास ;) ( आता कसे वाटते आहे ? ) ;) ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

गणपा गुरुवार, 06/24/2010 - 14:19
हा हा हा असो घोडा मैदान काही लांब नाही आता. :) आपली पुढची गाठ बहुतेक सांबांशी आहे. जगला वाचलात /वाचलो तर भेट होईलच

गणपा गुरुवार, 06/24/2010 - 13:32
बाद फेरीचे सामने चालु होणार l जर्मनी-इंग्लंड झुंज रंगणार ll जर्मनी गोल डागणार l इंग्लंड बाद होणार निश्चित ll

In reply to by गणपा

निखिल देशपांडे गुरुवार, 06/24/2010 - 13:40
हा हा हा बघुयात काय काय होते ते.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by गणपा

मेघवेडा गुरुवार, 06/24/2010 - 14:02
गोल आमचा ल्युकास करणार। मेसुत, थॉमस मूळ आधार॥ डिफेन्स तगडा असणार। इंग्लंड हरणार निश्चित॥ ये धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड धत्ताड तत्ताड

In reply to by मेघवेडा

छोटा डॉन गुरुवार, 06/24/2010 - 15:01
हे खास मेघ्या आणि जर्मनीसाठी बरं का ! ;) ---------------------------------- आता पुन्हा जर्मनी खेळणार, समोर भुक्कड इंग्लंड असणार, पोल्डोस्की, क्लोस्जे जोरदार धावणार, मग मधेच टेरी ब्लॉक करणार, जर्मन डिफेन्स जोरदार असणार, इंग्लिश अ‍ॅटॅक थर्डक्लास असणार पण जर्मनी मॅच हारणार, काय रे देवा... मग ती हार 'मेघ्या'ला कुणाला दाखवता नाही येणार, मग 'मेघ्या' ती लपवणार, मग लपवुनही ती कुणाला तरी कळावी असं 'मेघ्या'ला वाटणार, मग कोणीतरी आंतरजालीय मित्र ओळखणार, मग मित्र 'गणपा' असेल तर रडणार, हलकट 'प्रभ्या' असेल तर नाचणार, आणि 'डॉन्या' असेल तर सालटी काढणार मग नसतंच कळलं तर बरं, असं वाटणार... आणि ह्या सगळ्याशी जर्मनीला काहीच देण घेण नसणार... काय रे देवा... मग त्याच वेळी दूर स्पेन खेळत असणार, मग त्यांच्यातलाच डेव्हिड व्हिया फॉर्मात असणार, मग त्याला इनियेस्टाने पास दिलेला असणार, मग ती चाल झॅवीने रचलेली असणार, आणि १००% गोल होणार... मग तूही नेमकं आत्ता जर्मन्सबाबत हेच एक्सपेक्ट करत असशील का? असा प्रश्न पडणार, मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार, मग ना घेण ना देण पण फुकाचे ८-१० प्रतिसाद पडणार... काय रे देवा... जर्मनी गेल्यावेळी हारली... जर्मनी यंदाही हारणार... जर्मनी पूढच्या वेळीही हारणार... काय रे देवा... ------ (शिघ्रकवी ) डॉन्या खरे स्वगतः चला बाबा, पळा. आपल्या "फिफावर बोलु काही ..." ह्या कार्यक्रमाची वेळ झाली आहे ;)

In reply to by छोटा डॉन

मेघवेडा गुरुवार, 06/24/2010 - 15:11
प्रतिसाद जपून ठेवत आहे! नाही नंतर एखादवेळेस दाखवून द्यायची गरज पडेल म्हणतो! ;) कविता आवडली! फक्त तेवढ्या नावांच्या जागा रिकाम्या ठेवल्या असत्या तर एक टेंप्लेट म्हणून वापरता आली असती! ;) उद्या तुलाच गरज पडणार आहे याची म्हणून म्हणतो! :D बाकी चालू द्या!

In reply to by मेघवेडा

छोटा डॉन गुरुवार, 06/24/2010 - 15:19
प्रतिसाद जपुन ठेवा, कवितेचे टेम्प्लेट बनवा, त्याची कॉपी करा. नो प्रॉब्लेम ! असो पण आमच्या स्पेनच्या खेळाची कशी कॉपी करणार तुमची ती जर्मनी ? आमचे व्हिया, इनियेस्टा, झॅवी आणि पुयॉल सारखे प्लेयर कुठुन आणणार तुमची जर्मनी ? >>उद्या तुलाच गरज पडणार आहे याची म्हणून म्हणतो! =)) =)) बरं बरं, असु द्यात असु द्यात :) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

मेघवेडा गुरुवार, 06/24/2010 - 15:45
मेल्या तुला प्रभ्याने सुपारी दिली काय? नाय तो दिसत नाय ना म्हणून म्हणतोय. खरंतर त्याने तोफा डागायला हव्यात आमच्यावर सध्या! ;)

In reply to by छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/24/2010 - 15:19
तसं तंगडीचेंडूत मला काही समजत नाही, पण राकोंनी कविता केली आहे म्हणून हा धागा उघडला! लै भारी कविता हो डान्दीप खरे. अदिती

In reply to by Nile

मेघवेडा गुरुवार, 06/24/2010 - 15:35
गपे.. मायला इतं काय इनोदी नाटक हाय काय? अरे आमच्या भावनांशी खेळतोस.. लाजा वाटत नाय काय तुला? आँ? हसणार? आम्हाला हसणार? मेल्या दात आहेत ना ते ३२, सगळे काढून घेऊन चेस खेळीन त्याने.. कळ्ळं? देऊ काय एक? आँ?? :D L) हां आता 'स्पेनवाल्यांना हसणार' असं स्पष्ट लिहिलंस तर ठीके. ;)

In reply to by मेघवेडा

छोटा डॉन गुरुवार, 06/24/2010 - 15:45
श्री. मेघवेडा जर्मनीकर मुक्काम : माहित नाही वय : सज्ञान आपल्याला एका खास नोटीशीमार्फत कळवण्यात येते की 'मिसळपावच्या धागा १२६८६ आणि उप-कलम २०६४७३ अन्वये' यापुढे आपण लिहीत असलेल्या प्रतिसादातले आणि त्याला समर्थन देणार्‍या आपल्या साथीदारांच्या प्रतिसादातला 'प्रत्येक शब्द' हा कोर्टाच्या पुढील 'कविता आणि विडंबन' ह्या कामकाजासाठी 'कच्चा माल' म्हणुन वापरण्यात येईल. मागाहुन कसलीही तक्रार ऐकुन घेतली जाणार नाही ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

मेघवेडा गुरुवार, 06/24/2010 - 15:56
बरं बरं. घ्या. आम्ही लुफ्त लुटू! ;) फक्त ते 'टेंप्लेट'चं तेवढं ध्यानात असू द्या म्हणजे झालं! :D

In reply to by मेघवेडा

Nile गुरुवार, 06/24/2010 - 15:48
विनोदी नाटक माहीत नाही पण तुम्ही सगळे जोकर दिसुन राह्यलेत. =)) तसंही स्पेनची काय खात्री नाही हां कधी हरेल सांगता येत नाही.;) -Nile

In reply to by Nile

छोटा डॉन गुरुवार, 06/24/2010 - 15:52
ए निळ्या, हो बरं तिकडं. च्यायला इथे ४ मोठ्ठी माणसं जरा शिरियस गप्पा मारत आहे हे कळत नाही का ? उगाच का मध्येच पळापळ करतो आहेस ? तुमचे ते शिवणापाणी तिकडे जाऊन खेळा बरं ;) ------ (पोरट्यांना झापणारा )छोटा डॉन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मेघवेडा गुरुवार, 06/24/2010 - 16:19
ओ बै, मदी बोलू नका. आमाला आमच्या लायनीपरमानं जाऊ द्या. ;)

In reply to by छोटा डॉन

Nile गुरुवार, 06/24/2010 - 16:22
च्यायला इथे ४ मोठ्ठी माणसं जरा शिरियस गप्पा मारत आहे हे कळत नाही का ?
कुठंय कुठंय?? मला तर चार जोकरच दिसुन राह्यलेत. ;) बाकी फुटबॉल खेळतो आज संध्याकाळी, गोलकीपर हवा आहे, येताय काय डान्राव? ;) -Nile

In reply to by प्रभो

मेघवेडा गुरुवार, 06/24/2010 - 18:37
या मालक तुमचीच वाट बघत होतो! आता रविवारपर्यंत आमचे विरोधक ना तुम्ही! ;) >> रडतखडत पोचलयं जर्मनी तेच ते खुद का गिरेबान वगैरे! :P

In reply to by वेताळ

छोटा डॉन गुरुवार, 06/24/2010 - 15:13
>>स्पेनचा रंग लाल आहे हे लक्षात असु द्या डानराव. +१, अगदी बरोबर आहे बघा वेताळसाहेब. पण कसे असते की जर्सीचा जो रंग असतो ना तो समोरच्या टीमसाठी एक वोर्निंग असते. आताबघा, जेव्हा 'ऑस्ट्रेलिया' आपल्या पिवळ्या रंगाची जर्सी घालुन क्रिकेट खेळते तेव्हा समोरच्या टीमचे काय होते ? तसेच स्पेनचे आहे, उगाच स्पेनला भिडायला जायचे आणि हॅ हॅ हे व्हायचे ... असो. ------ छोटा डॉन

In reply to by श्रावण मोडक

चतुरंग Sat, 07/03/2010 - 21:32
अरे अगदी तोंडदेखला तरी एक गोल मारायचा होतात रे!!! ४ -० म्हणजे अगदी अगदीच कचरा केला!!!! :( (लई वाईट्ट मूड गेलेला)चतुरंग

In reply to by गणपा

श्रावण मोडक Sat, 07/03/2010 - 21:56
अर्जेंटिनाला एकही गोल करता न आल्यानं छातीत आलेली कळ आहे ती!!! गुलाबाचं फूल घेताना काटाही टोचू नये तसं झालं त्यांचं. ;)