Skip to main content

अगा लेखकांनो

लेखक सन्जोप राव यांनी शुक्रवार, 18/06/2010 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
हे तुमचं लिखाणबिखाण गोष्टीबिष्टी, लेखबिख, कविताबिविता हे सगळं ठीक आहे चांगलंच आहे उदाहरणार्थ चंद्र, नद्या, पक्षी, फुले, निसर्ग पहिला पाऊस, आईची माया, माणुसकी फुटपाथवरची म्हातारी, प्रेयसीची आठवण, फाटका झगा जन्म, मृत्यू, प्रेम, स्वार्थ, मैथुनही गडकर्‍यांपासून कोलटकरांपर्यंत दासू वैद्य, वर्जेश इश्वरलाल सोळंकी मध्ये विंदाबिंदा, बाकीबाब, पाडगावकर आणि कुसुमाग्रज सगळे झाडून कवी झाले बघा गाडगीळ, गोखले, माडगूळकरांपासून गवस पेठ्यांपर्यंतच्या कथा घ्या आपट्यांपासून महाजनांपर्यंत कादंबर्‍या घ्या दोस्तोवस्की घ्या, टॉलस्टॉय घ्या, स्ट्रिंडबर्ग घ्या लोकांना माहिती असलेले तर घ्याच, पण माहिती नसलेले आधी घ्या वैचारिक लेख घ्या, समीक्षणं घ्या, जीव तोडून घातलेले वाद घ्या वामकुक्षाळ च्युईंगमपासून केसफिस्कार मेंदूखाजेपर्यंत सगळं तुमचं साहित्य - तुमचं चिरंतन, अजरामर साहित्य घ्या आणि त्यानी समृद्ध वगैरे केलेली तुमची आयुष्यं घ्या परिसंवादांत जुन्या गहिवरांबरोबर नवी पालवीही कुरवाळून घ्या कलेनं माणसाच्या जीवनाला कसा अर्थ आणला हो म्हणून मिरवणुका काढून त्यात मूठभर गुलालही उधळा वाटल्यास आणि मग थकून जमिनीवर पडाल जेंव्हा डोळे मिटून आकाशात एकच मोठा डोळा उघडावा तसं विक्राळ गगनभेदी आयुष्य दिसेल क्षणभर आपल्या कोट्यावधी रक्ताळलेल्या हातांनी तुम्हाआम्हांला कुस्करणारं, कुरवाळणारं आणि तुमच्या अजरामर वगैरे साहित्याच्या छाताडवर चिखलतुडव नाचत खदाखदा हसणारं दचकाल तेंव्हा क्षणभर स्वतःशी रिते होऊन संपूर्ण संभोगानंतर होता तसे हुबेहूब विरक्त खाडकन डोळे उघडून बघाल आपले हस्तमैथुनी दुबळे हात त्यांतील अशक्त लेखण्यांसह कापून टाकावेसे वाटतील तुम्हाला तुमचे हात हे होईल, उद्या किंवा परवा नक्कीच तोवर चालू द्या तुमचं लिखाणबिखाण.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 18381
प्रतिक्रिया 85

प्रतिक्रिया

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

केले असावे. पण प्राण्यांमध्ये नर व मादी असे दोन प्रकार असतात. ते एकत्र येतात व त्यांना त्यातून काही एक आनंद मिळतो. हे ज्ञान त्यास किमानपक्षी असावे.
वा. थोडी प्रगती आहे. कवीने जी कल्पना मांडली आहे त्यात हे बाह्य ज्ञानच गृहित धरलेलं आहे. बाह्य निरिक्षण व हमै यांच्या बेरजेतून प्रत्यक्ष संभोगाचा अनुभव येतो का? हे म्हणजे दहावीतल्या मुलाला कुत्र्याचं झेंगट पाहून व स्वतःचा हमैचा अनुभव यावरून संभोग म्हणजे काय हे कळण्यासारखं आहे.
...पण ते दर्शवण्यासाठी पुन्हा हमैचे प्रात्यक्षिक आवश्यक नाही.
प्रात्यक्षिक नाहीच. जे आहे ते असं आहे हेच कवीने म्हटलं आहे.

In reply to by राजेश घासकडवी

कवीने जी कल्पना मांडली आहे त्यात हे बाह्य ज्ञानच गृहित धरलेलं आहे.
इतर लेखकांनी लिहिलेले, कलाकारांची कला पाहणे हेही बाह्यज्ञान आहे याचा मात्र निवेदकास विसर पडला आहे. प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर उड्या मारण्यापुर्वी इतर अनेकांनी असा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे व ते त्यांच्या अनुभवासंबंधीच भाष्य करत आहेत याचे भान विसरल्याचे उतावीळ शीघ्रपतन प्रस्तुत लेखनात आढळते, हे मान्य व्हावे.

पूर्णपात्रे-घासकडवी यांच्यातली जुगलबंदी पाहून एकछत्री अमलात प्रसिद्ध असलेला (आणि छत्रचामरधारीनीच वापरायचा असलेला ) वाक्प्रचार आठवला : "बावरला टेंपोत !"

In reply to by मुक्तसुनीत

अहो हे तर 'भेटवला गण्गोत' असं झालं ;)

In reply to by मुक्तसुनीत

पूर्णपात्रे-घासकडवी यांच्यातली जुगलबंदी पाहून एकछत्री अमलात प्रसिद्ध असलेला (आणि छत्रचामरधारीनीच वापरायचा असलेला ) वाक्प्रचार आठवला : "बावरला टेंपोत !" मग त्या दिवशी आमची काय अवस्था झाली असेल कल्पना करा. त्यात परत अजून एक गुरूजी होते तिथे यज्ञात तूप ओतायला. ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

भिजवला किंचित!! ;) (टाकीन यज्ञापुर्ते)चतुरंग

In reply to by चतुरंग

वरील सर्व (खुल्या व छुप्या) संपादकांचा कडकडीत निषेध. उगाच मध्ये येउन मजा खराब करु नका.;) यांचे प्रतिसाद संपादित करा रे कुणीतरी. ;) -Nile

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मग त्या दिवशी आमची काय अवस्था झाली असेल कल्पना करा. त्यात परत अजून एक गुरूजी होते तिथे यज्ञात तूप ओतायला.
च्यायला, भेट. सगळा हिशेब चुकता करतो. ;)

हे असं काही वाचलं की लिहायची खुमखुमी येते ! आता काहीतरी जिलेबी पाडलीच पाहिजे !

लिहिलय भाउ..........

आणि मग थकून जमिनीवर पडाल जेंव्हा डोळे मिटून आकाशात एकच मोठा डोळा उघडावा तसं विक्राळ गगनभेदी आयुष्य दिसेल क्षणभर आपल्या कोट्यावधी रक्ताळलेल्या हातांनी तुम्हाआम्हांला कुस्करणारं, कुरवाळणारं आणि तुमच्या अजरामर वगैरे साहित्याच्या छाताडवर चिखलतुडव नाचत खदाखदा हसणारं मग स्वतः कशाला लिहायला साहित्याचाच आसरा घेतलात? आणि जीवन काही असं तोंड मुस्कटून बसत नाही. जिथे संधी मिळेल तिथे फुलायलाच बघतं. अगदी रस्त्यावर भीक मागणार्याला पण ढीगभर पोरं असतात. ते जीवनाचं फुलणं नाही काय?

हे मुक्तक बिकतक प्रतिक्रिया बित्तीक्रीया आमच्या टक्कुरिच्या बाहेरच आहे मर्हाटीला उदंड आयुष्य ,जगाच्या अंतापर्यंत आहे एवडं निछीत