Skip to main content

नैसर्गिक काष्टशिल्पं (माझ्या नजरेतुन)

लेखक jaypal यांनी रविवार, 20/06/2010 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
"ये कौन चित्रकार है ? " हे माझं आवडत्या गाण्या पैकी एक गाण. निसर्गाची थोरवी, कलाकारी सगळ, सगळ ओतप्रत भरला आहे त्या काव्यात. भटकी जमात असल्याने ब-याच ठिकाणच्या भटकंती दरम्यान मला आढळलेली काही नैसर्गीक काष्टशिल्पं आपल्या समोर मांडतो आहे. ती इतकी स्वयंस्पष्ट आहेत की मी अजुन काही लिहण म्हणजे .............. ठिकाण = कलकत्ता बॉटनिकल गार्डन dfsd येऊरच्या जंगलातील (अलिंगण) शिल्प fgdg रायगड भट्कंती fdsfd व्हॅली ऑफ फ्लॉवर्स (उत्तराखंड राज्य) ggjk वसई किल्ल्याच्या एका भिंतीवर हा शेपटी सोडुन निवांत बसला होता ghasd माल एवढा आवडला हा, की एक कोल्ज शॉट घ्यावासा वाटला याचा fsk
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5354
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

याला म्हणतात कलाकाराची नजर! यात निसर्ग एक कलाकार तर आहेच पण तुमची नजर त्यात मिळाली अन एक वेगळाच अनुभव जन्माला आला. The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

याला म्हणतात कलाकाराची नजर! यात निसर्ग एक कलाकार तर आहेच पण तुमची नजर त्यात मिळाली अन एक वेगळाच अनुभव जन्माला आला.
--- सहमत आहे. संजय पेठे यांनी टिपलेलं असंच एक सुरेख काष्ठचित्र.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by नंदन

संजय पेठे यांनी टिपलेलं ते चित्र खरोखरीच खुप सुंदर आहे. हॅट्स ऑफ. =D> =D> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

नजर आहे चांगली. पण तुझ्या एकूण फिरतीचा वगैरे विचार केला तर अशी अजून प्रकाशचित्रे असणारच. ती बाहेर काढ... :)

In reply to by श्रावण मोडक

अगदी सहमत! लवकर टाका इथे.. मस्त नजर.. मस्त फोटू! अन् मुख्य म्हणजे जे शिल्प तुम्हाला दिसलं ते आम्हाला पोचवायचा अँगल साधलात ते सगळ्यात भारी! राघव

फारच सुरेख.. दाद देता हूं.. आपकी पारखी नजर .. और फोटो सुपर.. दोनोंको ;) ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

जयप्या, क्लास फोटो रे. आंबोलीच्या लाड हाऊसमध्ये पाहिलेल्या काष्टशिल्पांची आठवण झाली. (भोचक) जाणे अज मी अजर

सर्व काष्ठशिल्पे सुरेख आहेत! त्यांना छायाचित्रात बांधून आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/