असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग ३
वाचकमित्रहो,
वणक्कम!! असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय? - भाग १ आणि भाग २ ह्या स्फुटांस मिळालेला भरघोस प्रतिसाद, आणि त्यासह वाचकांनी पाठविलेल्या खरडी, व्यनि, आणि जीमेलावरील प्रेमळ आग्रहवजा विनंतींस मान देवून मी त्याच मालिकेतले हे तिसरे स्फुट आपणांसमोर मांडण्याचे धार्ष्ट्य करित आहे. कृपया गोड मानून घेणे!
ह्यापूर्वीच्या माझ्या स्फुटांत मी श्री. वैरमुत्तु ह्यांच्या एका कवितेविषयी लिहिले आहे. सदरील स्फुटांतदेखील त्यांच्याच दुसया एका कवितेविषयी लिहित असल्याने मूळ लेखनापूर्वी त्यांची एक औपचारिक ओळख करून देतो :- श्री. वैरमुत्तु हे तमिळभाषेमध्ये ’कविराज’ नामाभिधानाने मान्यताप्राप्त आहेत. अनेकविध पुरस्कार त्यांस प्राप्त आहेत. तमिळभाषेवर जिवापलिकडे प्रेम करणाया तमिळ जनतेच्या अभिमानांपैकी एक असे स्थान त्यांस प्राप्त आहे. मराठीभाषक वाचकांसाठी थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, श्री. वैरमुत्तु हे "तमिळनाडुचे लाडके व्यक्तिमत्त्व" होत. असो.
வைரமுத்து
ह्यापूर्वीच्या भाग २ मध्ये मी श्री. वैरमुत्तुंच्या चिन्न चिन्न आसै ह्या कवितेबद्दल लिहिले होते. त्या कवितेचे रसग्रहण मराठीभाषकांस सुलभ व्हावे ह्याकरिता तमिळभाषेतील "जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते" हा नियमही उलगडून सांगितला होता. आता ह्या स्फुटांतील वैशिष्ट्यपूर्ण कवितेकडे...
---
---
व्याकरणशास्त्रीयदृष्ट्या ह्या कवितेत एकही वाक्य नाही. केवळ एकासमोर एक मांडलेले शब्द आहेत. प्रत्येक शब्द हा त्याच्या पुढल्यामागल्या शब्दांत असा काही गुंफला गेला आहे की तो संपल्यानंतरदेखील कवितेमध्ये त्याचा अर्थ संपत नाही; उर्वरीतच राहतो. ह्याकारणे, रसग्रहणात नुसता एकच शब्दार्थ लक्षात घेवून चालत नाही, तर त्या शब्दाचे मागीलपुढील शब्दांच्या अर्थाशी नाते जुळवावे लागते. हे झाले ढोबळ अर्थासाठी - तमिळभाषेत एका शब्दाचे अनेक सूक्ष्मार्थ असतात. ते सारे लक्षात घेवून जुळवाजुळवी करून कविता समजावून घेणे म्हणजे एक आनंददायी कसरतच असते. असो! वाचकांस लक्षात येईल, वरील कवितेत कमीत कमी शब्दांत ’प्रेम’ ह्या संकल्पनेची जास्तीत जास्त महती वर्णन करण्याची किमया श्री. वैरमुत्तु ह्यांनी साधली आहे. असे करतांना केवळ एकासमोर एक नामे उपयोजिली आहेत. [नाम:- प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंच्या किंवा गुणांच्या नावांना ’नाम’ असे म्हणतात.]
अशा प्रकारच्या कवितांचा सरळसरळ अनुवाद न करता त्यांचा अर्थ (interpretation) करावा लागतो. हे विधान तमिळमधून मराठीमध्ये सांगण्यासाठी म्हणून नव्हे, तर तमिळमध्येदेखील अशी कविता समजावून घेण्याकरिता तिचा अर्थ करावा लागतो. हा अर्थ बहुतांशी अर्थकर्त्यावर अवलंबून असल्याने तो नानाविध प्रकारे होऊ शकतो. जितके अर्थकर्ते, तितके वेगळे अर्थ. आणि तरीही सारे अर्थ बरोबरच!
उदा:- एखादा तत्त्वचिंतक वरील कवितेतील पहिल्या ओळीचा अर्थ ’देह म्हणजे जगतात प्रकाश पसरविणाया दिव्याची वात होय.. प्रेम म्हणजे त्या दिव्याची ज्योत होय’ असा करू शकेल, तर त्याच ओळीचा अर्थ एखादा निराशाग्रस्त मनुष्य ’देह हा दिव्याच्या वातीप्रमाणे असतो.. प्रेम हे त्यास ज्योतीप्रमाणे जाळत संपविते..’ असाही करू शकेल.. असे नानाविध प्रकारे अर्थ केले जावू शकतात. त्यातील अमुक अर्थच बरोबर - तमुक चूक असे छातीठोकपणे म्हणतां येणार नाही; कारण कोणास कोणता अर्थ लागू करवून घ्यावयाचा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. गूढकाव्य जे म्हणतांत ते हेच काय?!
व्याकरणदृष्ट्या ही चमत्कृती भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उपयोजनामुळे झालेली आहे. एकासमोर एक मांडलेली शुद्ध नामे सोडता ह्या कवितेत व्याकरणदृष्ट्या इतर काहीही नाही, आणि तरीही केवढा अफाट अर्थ ही कविता सामावून जाते!
---
तर प्रश्न असा, की; असा काव्यप्रकार मराठीभाषेमध्ये अस्तित्त्वांत आहे काय?
---
ह्यापूर्वीच्या भाग २ मध्ये मी श्री. वैरमुत्तुंच्या चिन्न चिन्न आसै ह्या कवितेबद्दल लिहिले होते. त्या कवितेचे रसग्रहण मराठीभाषकांस सुलभ व्हावे ह्याकरिता तमिळभाषेतील "जोपर्यंत एखाद्या वाक्यात ’नाही’ असे म्हटले जात नाही, तोपर्यंत तेथे ’आहे’ असे गृहित धरले जाते" हा नियमही उलगडून सांगितला होता. आता ह्या स्फुटांतील वैशिष्ट्यपूर्ण कवितेकडे...
---
| தமிழெழுத்தில் | देवनागरीमध्ये लिप्यंतरीत | मराठीभाषेमध्ये शब्दार्थ |
|---|---|---|
| யாக்கை திரி காதல் சுடர் | याक्कै तिरि कादल् सुडर् | देह वात प्रेम ज्योत |
| ஜீவன் நதி காதல் கடல் | जीवऩ् नदि कादल् कडल् | जीवन नदी प्रेम समुद्र |
| பிறவி பிழை காதல் திருத்தம் | पिऱवि पिऴै कादल् तिरुत्तम् | जन्म चूक प्रेम शुद्धीपत्र |
| இருதயம் கல் காதல் சிற்பம் | इरुदयम् कल् कादल् सिऱ्पम् | हृदय दगड प्रेम शिल्प |
| சென்மம் விதை காதல் பழம் | सॆऩ्मम् विदै कादल् पऴम् | जन्म बीज प्रेम फळ |
| உலகம் துவைதம் காதல் அத்வைதம் | उलहम् तुवैदम् कादल् अत्वैदम् | विश्व द्वैत प्रेम अद्वैत |
| சருவம் சூன்யம் காதல் பிண்டம் | सरुवम् सूऩ्यम् कादल् पिण्डम् | सर्व शून्य प्रेम पिण्ड |
| மானுட மாயம் காதல் அமரம் | माऩुड मायम् कादल् अमरम् | मनुष्यजात माया प्रेम अमर |
वाचन संख्या
15640
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर ओळख
+१
In reply to सुंदर ओळख by अरुंधती
असाच काहीस
सररास.
In reply to असाच काहीस by कानडाऊ योगेशु
प्रस्तुत
>>असा
In reply to प्रस्तुत by नील_गंधार
नाही.
In reply to >>असा by कानडाऊ योगेशु
+१
In reply to >>असा by कानडाऊ योगेशु
प्रथम तुमचे आभार
In reply to प्रस्तुत by नील_गंधार
श्री. नील_गंधार,
In reply to प्रस्तुत by नील_गंधार
श्री.हैयो
In reply to श्री. नील_गंधार, by हैयो हैयैयो
काही
आवं
In reply to काही by शिल्पा ब
श्रवण आनंद घ्यायला आवडेल.
श्रवणानंदासाठी
In reply to श्रवण आनंद घ्यायला आवडेल. by शशिकांत ओक
हैय्या'जी!..
In reply to श्रवण आनंद घ्यायला आवडेल. by शशिकांत ओक
सर्वप्रथम,
+१
In reply to सर्वप्रथम, by बिपिन कार्यकर्ते
हा लेख सकाळीच वाचला होता.....
धन्यु......!
सहमत
In reply to धन्यु......! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+२
In reply to सहमत by अक्षय पुर्णपात्रे
सुंदर काव्य - अनेक उत्प्रेक्षांची माळा
ஜீவன் நதி.
In reply to सुंदर काव्य - अनेक उत्प्रेक्षांची माळा by धनंजय
मान्य...!
In reply to सुंदर काव्य - अनेक उत्प्रेक्षांची माळा by धनंजय
चांगली ओळख करून दिलीत.
.
In reply to चांगली ओळख करून दिलीत. by प्रमोद देव
मग बापू देखिल...
In reply to . by नितिन थत्ते
विलास सारंग आठवले ,
प्रकार तर
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वाचते आहे.
चांदणशब्द
वेगळाच प्रयोग
रेगे आणि कोलटकर....!!
आणखी एक उदाहरण - मिसळपावावरचे
ह्या
वा!