आमची प्रेरणा चैत्रेचैत यांचे जैव वैविध्य
(जैव वैविध्य)
थांब्याच्या बाकावर बसल्या 'दोन' बायका
काव काव काव काव काव काव काव
काळ्याशार गटारात डुक्कर आणि डुकरीण
त्यांची सदतीस पिल्ले खेळती धूळवडधूळवड
एकदा सर्व अरब फक्त उंटीण१ घेऊन पळाले
तेव्हा मध्यपूर्वेच्या वाळवंटात मोठे वादळ झाले
ओंकारेश्वराच्या घाटावर कावळा आणि कावळी २
पण त्यांना होती एकमेकांना शिवायची चोरी
एक होता नर, एक होती मादी,
पण काय करावे? दोघे नव्हती साधी
अगं मी आधी, अरे मी आधी३
या वादात दोघांना पुरत असे गादी
१ हिला सामान्य मराठीत जरी सांडणी म्हणत असले तरी नवकवितेच्या भाषेत उंटीण असेच म्हणतात.
२ जो नियम सांडणीसाठी तोच कावळीणीसाठी...
३ हे कशाबद्दल नाही हे सुज्ञ वाचक समजतील ह्याची खात्री आहे...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4333
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त......
३ हे कशाबद्दल नाही हे सुज्ञ वाचक समजतील ह्याची खात्री आहे.....
ऑ! चुकुन हे केशाबद्दल नाही असं वाचलं गेलं....
ओंकारेश्वराच्या घाटावर कावळा आणि कावळी २
पण त्यांना होती एकमेकांना शिवायची चोरी
बरोबर आहे...नाही तर उगाच कावळी म्हणेल की 'कावळा शिवला' ;)
(ह. घ्या.)
(आपला शिष्य) टिंग्या ;)
+१
In reply to मस्त...... by ब्रिटिश टिंग्या
हेच म्हणतो मी पण... आणि मग कावळ्याला पण काही दिवस कावळीला शिवता आले नसते... :)))
पुण्याचे पेशवे
:-))))))))))
In reply to मस्त...... by ब्रिटिश टिंग्या
टिंग्या, फोकलिच्या, हल्ली अंमळ जास्तच आचरट झालायस रे तू!
च्यायला, काय पंचेस काढलेत...तेही इडंबनातून !!!!! भले बहाद्दर!
केसुशेठ,
दुव्यावरुन मुळ कविता(! हरे राम!!!) वाचली. इथं विडंबनही वाचलं...
आता मला खात्री आहे तुम्ही तिच्याआयला, काही नाही मिळालं तर पेपरातल्या दशक्रिया विधीच्या 'झाईराती'वर पण विडंबन करु शकता!
अरे काय डोका हाय का चेष्टा????
- शेख(चिल्ली) ध मा ल अरब.
एकदम कडक विडंबन मास्तुरे!;)
जैव वैविध्य भलतेच छान आहे;))
चतुरंग
:)
थांब्याच्या बाकावर बसल्या 'दोन' बायका
काव काव काव काव काव काव काव
हा हा हा :)
हे कशाबद्दल नाही हे सुज्ञ वाचक समजतील ह्याची खात्री आहे...
हे कशाबद्दल आहे एवढेच मला कळले ...(च्यामारी! म्हणजे आम्ही सुज्ञांत मोडत नाही की काय?)
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
विडंबन
प्रिय केसू , ही कविता स्वतंत्र एककात (stand alone ? धर्ती वर )खूप चांगली लिहीली आहे. विडंबन म्हणून ती कशी उतरली आहे हे मी सांगू शकत नाही. पण एक चांगली कविता विडंबन लिहीण्याच्या मोहात वाया जाऊ नये , दुर्लक्षीत होउ नये असे वाटले.लिहीत रहा. ही देणगी प्रत्येकाला मिळत नसते.शुभेच्छा.
:)
काळ्याशार गटारात डुक्कर आणि डुकरीण
त्यांची सदतीस पिल्ले खेळती धूळवडधूळवड
हे सर्वात मस्त! :)
आपला,
तात्या डुक्कर.
धन्यवाद!!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.
(आभारी)केशवसुमार.
नाद खुळा..
नाद खुळा.............नाद्या बाद्...............