रोहिडा
मागे एकदा रोहिड्याला गेलो होतो पण खुप पाऊस आणि अंधार यामुळे किल्ला पुर्ण न सर करताच परत आलो होतो. परतलो पण परत येण्याचा निश्चय करुनच.
एकदा कार्यालयातील हौशी लोकांनी रोहिड्याला जाण्याचा प्लॅन बनवल्यानंतर पुन्हा एकदा रोहिडा मला साद घालू लागला व मि जान्याचा निश्चय केला. मग नेहमिप्रमाने इ-मेल्स फ़ॉरवर्ड झाल्या. पण शेवट्याच्या दिवशी त्यातले किति लोक येतिल हे ट्रेक च्या दिवशीच समजते.
शेवटी तो दिवस उजाडला. रात्री जोरात पाऊस झालेला होता. पण सकाळी पुर्ण उजाडले होते. शेवटी आम्हि ६ लोक ३ बाईक घेवून सकाळी ८ ला सातारा महामार्गावरुन निघालो. मधे नारायणपूर फ़ाट्याला मिसळ, वडापाव आणि आणि सोबत चहा अशी न्याहरी केली.मग भोर कडे मार्गस्थ झालो. भोर च्या शिवाजी राजेंच्या पुतळ्यापासुन बाजारवडीला जाणाय्रा रस्त्याने निघालो. मधे एका ठिकाणी थांबलो असता एक मोठा आंबा सापडला.तो पिकुन खाली पडला होता. खरतर तो माझ्या मित्राला सापडला पण तो मि माझ्या बॅग मधे टाकला. नंतर तो मिच फ़स्त केला हे सांगायला नको . काय गोड चव होति त्याला आहाहा ! आता जास्त स्तुती नको नाहीतर बाकीची मंडळी मला मारायला धावतील :).
असे करत आम्ही ९.४५ पर्यंन पायथ्याशी पोहचलो. दुरुनच रोहिड्याचे बुरुज दिसत होते. त्याला कॅमेर्यात बंद करून व आमच्या दुचाकी पार्क करून आम्ही १० ला किल्ला चढायला सुरू केले.
४. दरवाज्यावरील हत्ती व शीलालेख.
१. गाड्या पार्क केल्या ती जागा.
चढता चढता माझी पुरती दमछाक झाली.
२. वाटेतुन दिसनारा रोहिडा.
मग मधे मधे विश्रांती घेत घेत ११ ला मुख्य दरवज्यापर्यंत पोहोचलो. मग थोडा फ़ार आराम व फोटोसेशन केले. किल्याचा दरवाजा अजुन तरी शाबुन आहे.
३. दरवाजा.
वरती गेल्यावर तेथीम बुरुजही शाबुत दिसले. बुरुज खरच खुप सुंदर आहेत. मग बरुज एके बुरुज करत अम्हि सगळा किल्ला फ़िरलो.किल्ल्याच्या एका दरवाज्यावर कोरलेला हत्ती व काही शिलालेख दिसले.
४. दरवाज्यावरील हत्ती व शीलालेख.
५. बुरुज.
६. जलकुंड
७. हेच ते चक्र
ह्या किल्ल्याला विचित्रगड असे पण म्हणतात. पण का ? हा एक अजुन अनुत्तरीत प्रश्न . मग आम्ही मंदिराजवळ गेलो.बघतो तर काय ? मंदिरातला कुलुप ! आमची थोडी चिडचिड झाली . नंतर आम्ही भोजन उरकुन घेण्याचे ठरवले. जेवण व पाणी आम्ही बॅग मधे आणले होते. गडावर पिण्यायोग्य पाणी नाही सापडले. तोरण्यावरील जिवंत झय्राची नकळत आठवण आली. जेवणान मसुर भाजी,चपाती,थालीपीठ,पराठे,सॉस,लोणचे,शीरा असा बेत होता.

८. असा होता बेत.
एकाला उपवास होता त्याने सफ़रचंदावर भागवले. आम्ही मात्र दणकुन जेवलो. चढण केल्यामुले दमलो होतो म्हणुन जरा जास्तच जेवण गेले.
थोड्या वेळाने मंदिराचा देखरेख करणारा गावकरी त्याच्या सोबतीला(कुत्रा) घेवुन आला. त्याने मंदिराचे दार उघडले व आम्हाला दर्शन घेता आले. मंदिराची थोडी डागडुजी करण्याचे काम चालू आहे व त्याचे सामान आत आहे म्हणुन कुलुप लावले अशी माहिती त्याने पुरवली. मग आम्ही पन सह्याद्री ट्रेकर्स या नावाने देणगी देवुन थोडाफ़ार हातभार लावण्याचा प्रयत्न केला. त्याला पण विचित्रगड का म्हणतात हे निटसे सांगता आले नाही.

९. मंदिराच्या आत.
मग परत किल्ल्यावर थोडी भ्रमंती केली . मग मस्तपैकी एक जागा शोधुन ताणून दिली. मस्त वारे चालु होते. ए.सी. ला नेहमीप्रमाने २-४ शिव्या हादडल्या . अशा ठिकाणी आलो कि ह्या आपोआप बाहेर पडतात J
किल्ल्यावरून राजगड,रायरेश्वर इ. गडांचे थोडेसे दर्शन होते. मन लगेच तिथल्या गडांना सर करण्याचा निश्चय करते. मग परत फोटोसेशन वगैरे करत दुपारी ३ ला आम्ही परतण्याचे ठरवले. येथील सरड्यांचे एक विशेष आहे. ते फोटो साठी खुप सही पोज देतात J अगदी ट्रेन्ड केलेत असे वाटते.
१०. सरडेराव.
आणी परतीच्या वाटेत ज्या वेगाने वारे आले ते या आधी मि तरी कधी अनुभवले नव्हते.
अशा तर्हेने आम्ही संध्याकाळी ६ पर्यंत घरी पोहोचलो देखील व ह्या पावसाळ्यातील पहिला ट्रेक संपला.
परतताना वाटेत चहा आणि शितपेयांसाठी थांबा हा ओघाने आलाच.
या गडावरील एक गोष्ट नमुद करावी वाटते की,इथे एक स्तुत्य उपक्रम चालु आहे सौर दिव्यांचा. गडावर ठिकठिकानी लावलेले सौरदिवे नक्कीच रात्रीचा ट्रेक करण्यार्यांसठी उपयुक्त ठरेल. ईथे गडावर जाण्यासाठी रस्त्याचे काम चालू आहे. पण त्यामुळे याचा सिंहगड नाही झाला म्हणजे मिळवले. लोकांसाठी इथे काही नियम करणे गरजेचे होईल.
११. सौरदिवा
तसा हा गड पुण्याहुन १ दिवसात व आरामात करण्यासारखा ट्रेक आहे. संपुर्ण पावसाळ्यात तर हा गड बघण्यालायक असतो. सगळीकडे हिरवळच हिरवळ. फ़क्त चिखला मुळे जपुन चढावे. तसा रस्ता तर होतोच आहे ,तेव्हा काळजी करण्याचे काही कारण नाही J
१२. पावसाळयातील रोहीडा.
असा हा ट्रेक तुम्ही लोक पण मस्त इंजॉय करू शकता.
याद्या
5057
प्रतिक्रिया
14
मिसळपाव

रोहिडा ट्रेक
संदीप,
छान फोटो आणि माहिती
लई भारी..
हेच ते
माहिती बद्दल धन्यवाद ...........
In reply to हेच ते by जिप्सी
व्वा!
तांत्रिक प्रकार
ते चक्र.........
हाहाहा!
In reply to ते चक्र......... by वेताळ
धन्यवाद.
मस्त रे...
दुःखाची बातमी
अरेरे.