विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - द सांबा किंग्ज
विशेष
काय मग लोक्स..... काय भारी माहौल बनतोय की नाही मिपावर फुटबॉलचा? डॉन, प्रभो, मेघवेडा... धमाल उडवतायत! आकडेवारी काय, टीम्सच्या फॉर्मची चर्चा काय, मोठमोठ्या स्टार खेळाडूंची ओळख काय.... ओहोहोहो.... बहार आलिये ! बाहेर पाऊस, हातात - गरमागरम चहा / कॉफी... वाफाळणारी भजी (किंवा थंडगार बीअर आणि दाणे), आमचा गणपा म्हणतो त्याप्रमाणे "आपलं आवड्त्या व्यक्तीचा सहवास" आणि समोर चाललेला रंगतदार सामना (आणि कानांत १३७४९ डास एकदम गुणगुणावेत असा तो वुवुझेलांचा आवाज).... अशी चैन करत नसाल तर खरंच एक सोहळा मिस करताय बरं का.
काय टाकलाय भौ जर्मनीनी ऑस्ट्रेलियाला... आयव्हरी कोस्ट काय खेळलं बघित्तलंत? हॉलंड आहे...इंग्लंड नेहेमीसारखं माती खातंय... सगळं काही मस्त चाललंय. पण काल पोर्तुगल आयव्हरी कोस्ट मध्ये ऐकलंत? टीव्ही कमेंटेटर्स सुद्धा म्हणत होते... आज "बझ" थोडा जास्तच आहे. पण तो कशासाठी जास्त होता? ड्रॉग्बासाठी की क्रिस्तियानो साठी?? नाय - कारण - "the Brazilians are in town" - आज ब्राझील खेळणार म्हणून.
अरे काय जर्मनी, स्पेन, इंग्लंड, पोर्तुगाल, हॉलंड घेऊन बसलात..... हा... सगळे भारी खेळतातच ... शंकाच नाही. जर्मनीचा वेग, स्पेनचा "परिपूर्ण" खेळ, इंग्लंडचं "स्टारडम", इटलीचा भक्कम बचाव, हॉलंडची अनपेक्षित खेळ करण्याची ताकद .... सगळं सगळं मान्य... पण कोणीही मान्य करील की ब्राझील हा फुटबॉलच्या सिनेमाची हिरॉईन आहे. फुटबॉलचं जर काही ग्लॅमर असेल....काही सेक्स अपील असेल... काही oomph factor असेल.. काही सौंदर्य असेल, नजाकत असेल, अदा असेल.. घायाळ करणारं असं काही असेल तर ते फक्त आणि फक्त ब्राझील आहे. ब्राझील म्हणजे फुटबॉलची मधुबाला, माधुरी दीक्षित, अँजेलीना जोली आणि मेरलिन मोन्रोदेखील ! तिच्याशिवाय कसले वर्ल्डकप आणि कसला फुटबॉल?
म्हणतात ना “The English invented football, the Brazilians perfected it”. अरे एखाद्या खेळावर जर पोटच्या पोरासारखं प्रेम केलंत... त्याच्यासाठी प्रेमिकांसारखे झुरलात... घरच्या वडीलधार्यासारखी त्याची काळजी घेतलीत तर अजून काय होणार? दुनियेत फिफाचे २०८ सदस्य देश आहेत. पण आत्तापर्यंतची प्रत्येक विश्वचषक स्पर्धा खेळलेला एकमेव संघ म्हणून फक्त ब्राझीलच मिरवू शकतो. पुढची स्पर्धा २०१४ मध्ये ब्राझीलमध्येच व्हायची आहे... तेव्हा तिथेही ते असणारच ! लोकं कुठकुठल्या टीम्सची पात्रता फेरीतली कामगिरी कशी होती, त्यांचा सध्याचा "फॉर्म" कसा आहे, त्यांचे डावपेच कसे असू शकतील, त्यांची "काँबिनेशन्स" कशी असतील, त्यांच्या प्रशिक्षकामुळे काय फरक पडू शकेल, कुठल्या संघाविरुद्ध ते कसा खेळ करतील, काय योजना आखतील असल्या एक ना दोन.. हजारभर गोष्टींबद्दल चर्चा करूदेत. ब्राझीलबद्दल काय चर्चा करणार डोंबल? आकडे, फॉर्म, स्टार खेळाडू, प्रतिस्पर्धी ह्या सगळ्या पलिकडे गेलेली लोकं आहेत ही.
समजा, ब्राझील अगदी मरत मरत पात्र ठरलं असेल, तरी आहे कोणाची हिंमत त्यांना "संभाव्य विश्वविजेत्यांत" न गणायची? आणि सगळ्यांना चेचत अंतिम फेरीपर्यंत पोचले तरी अंतिम सामना जिंकतीलच ह्याचीही गॅरंटी नाही! तेव्हा कुठे ह्यांचे आकडे न काय घेऊन बसायचं? त्यांचे डावपेच - त्यांना ठाऊक असतील तेव्हाच तुम्हाला कळतील ना? ठीके - ४-४-२ नी खेळणार.... मधल्या फळीतले काका, दादा पुढे बॉल देणार...पुढे दोघे आक्रमण करणार.. पण जरका गोलरक्षकाच्या शेजारी उभा असणं अपेक्षित असलेल्या रोबेर्टो कार्लोसला गोल मारायची हुक्की आली तर कोण काय करणार?? डाव्या बाजूनी एकटाच घुसेल न गोलकीपर भानावर यायच्या आत गोल मारून कॉर्नरच्या झेंड्याशेजारी नाचत बसेल! कसलं प्लॅनिंग आणि कसली "स्ट्रॅटेजी" ! आणि कार्लोस, रोनाल्डो, बेबेतो, रोमारिओ, झीटो, गारिंचा, सॉक्रेटस, रिवाल्डो, पेले, टॅफॅरेल, सध्याचा कोच डुंगा ही नावं बदलली आणि त्या जागी काका, लुइझाओ, गिल्वेर्टो सिल्व्हा, ज्युलियो सेझार, रोबिन्हो ही नावं घातलीत तरी विशेष फरक पडत नाही. कारण ह्या पिवळे शर्ट घालून खेळणार्यांचे देह वेगवेगळे असले तरी त्यांचं फुटबॉल खेळण्याच "डोकं" एकच असतं. फुटबॉलचं मैदान हा कोणासाठी रणभूमी असते, कोणासाठी आपले गुण दाखवायचं "शोकेस", कोणासाठी प्रेरणास्थान तर कोणासाठी तीर्थक्षेत्र. पण विश्वचषक खेळणार्या प्रत्येक ब्राझीलियनसाठी ते असतं एक मोठ्ठं कॅनव्हास. आणि हे ११ कलाकार त्या कॅनव्हासवर आपल्या अचाट दैवदत्त प्रतिभेचं आणि अपार कष्टांचं चित्र रेखाटतात. कधी ते जमून येतं - कधी तितकंस येतही नाही. एक मात्र नक्की, ब्राझील आपल्या चाहत्यांना रटाळ खेळानी निराश मात्र कधीच करत नाही.
पण भौ... ब्राझील म्हणजे हरफनमौला, मस्तकलंदर, मौजमजा करणारा, मनोरंजन करणारा संघ एवढंच वाटत असेल तर अजून १८ वेळा विचार करा. ह्यांच्या आचरटपणाचा इतिहास खूप मोठा आहे. १८ व्यांदा विश्वचषक खेळतायत ते! ५ वेळा विश्वचषक जिंकणारा एकमेव संघ आहे हा. २ वेळा उपविजेता तर २ वेळा उपांत्य फेरीत हारलेत. १९३८ नंतर फक्त एकदा त्यांना दुसर्या फेरीत जाण्यात अपयश आलं आहे. तब्बल ८ वेळा "कोपा अमेरिका" आणि ३ वेळा "कन्फेडरेशन्स कप" जिंकणारा हा संघ फिफाच्या जागतिक क्रमवारीत सर्वांत जास्त वेळा अव्वल स्थानावर राहिला आहे. २०१०च्या स्पर्धेतही त्यांना प्रथम मानांकन आहे.
संघः
गोलरक्षक: - ज्युलियो सेझार, गोम्स, दोनी
बचावफळी - माइकॉन, लुशिओ, उआन, लुइझाओ, थिएगो सिल्व्हा आणि गरज पडल्यास कोणीही
मधली फळी - सँटोस लेइट्टे (काका), गिल्बेर्टो सिल्व्हा (आबा), क्लेबर्सन (मामा), ज्युलिओ बॅप्टिस्टा (दादा), एलानो (भाऊ), फेलीपे मेलो (आण्णा) आणि रामिरेझ (छोटू - आमच्या वर्ल्डकपच्या मॅचला यायचं हं)
आक्रमक - तसे सगळेच. पण नावंच घ्यायची झाली तर फॅबियानो, रोबिन्हो, निलमार आणि ग्राफिटे
साक्षात रोनाल्डिन्हो, मार्सेलोसारख्या दिग्गजांना संघाबाहेर ठेवणारा डुंगा त्यांचा प्रशिक्षक आहे. "विजय मिळवण्यासाठी आम्ही अनाकर्षक फुटबॉल खेळायला देखील तयार आहोत" असं त्यानं आधीच जाहीर केलंय. त्यातला दुसरा भाग - अनाकर्षक खेळण्याचा - त्याच्या संघाला कधीच जमणार नाही ही गोष्ट निराळी! पण विजेतेपदासाठी भुकेला ब्राझील हा आकर्षक खेळणार्या ब्राझीलपेक्षा नक्कीच जास्त धोकादायक ठरू शकतो. पोर्तुगल, आयव्हरी कोस्ट आणि उत्तर कोरियाच्या "ग्रुप ऑफ डेथ" मध्ये सुद्धा ब्राझीलचा दुसर्या फेरीतला प्रवेश निश्चित मानला जातोय ते काही उगाच नाही. पुढे स्पेन किंवा चिलीसारखा मातब्बर प्रतिस्पर्धी येऊ शकतो. पण सामना कोणाशीही असो, ब्राझील "अंडरडॉग्ज" कधीच नसतील. काल उत्तर कोरियाला नमवलं तरी आयव्हरी कोस्टचा पोर्तुगलविरुद्धचा खेळ बघता पुढच्या फेरीत जाण्यासाठी ब्राझीलला सर्वोत्तम खेळ करावा लागणार हे स्पष्ट दिसतंय.
ब्राझीलची ताकद - मधल्या फळीतली गिल्बेर्टो सिल्व्हा - काका आणि आघाडीची फाबियानो - रोबिन्हो ह्या दुकली. जगातला कोणताही बचाव भेदण्याची क्षमता. जिंकण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि खेळाकडे "खेळ" म्हणून पाहण्याची वृत्ती !
ब्राझीलचे कच्चे दुवे - बचावातल्या सातत्याचा अभाव.
ब्राझीलची संधी - अर्थातच विजेतेपदाची. उप-उपांत्यपूर्व सामना सर्वांत महत्त्वाचा.
ब्राझीलला हरवू शकतील असे संघ - खुद्द ब्राझील!
थोडक्यात काय.... निवांत मागे टेकून बसा, पाय समोर ठेवा, आवडती खाद्यं - पेयं जवळ ठेवा आणि "के सेरा सेरा" म्हणत ब्राझीलच्या खेळाचा लुत्फ लुटा ! तो हो ज्जाय !

वाचन
18558
प्रतिक्रिया
74
>>ब्राझील
अरे
अरे
माताय हे
इंटरनेट
कर्कटक,
हे घ्या..पुर्ण बघा.
खालची सही
__/\__ तुला
टिपीकल जे पी
दर्जा!
थोडं रंगात येऊदे !
सध्या
मॉर्गनचा
क्या बात है!!!
रंगाशी सहमत
क्या बात है!
जबरा लेख रे जेपी!
आजच्या
झोपायला
ब्राझीलला
मित्रा
असूंदे की
आणि कानांत
>> बाकी यंदा
असो.
>> तर
या
या
आर्रं यौन
+१
ब्राझील...
:)
नाही हो
विनायका बहुधा ती नसावी
च्यायचं हलकट
का रे छळता
मस्त
ब्राझिल आणि स्पेन.....
जेप्या
रोनाल्डिन्हो नाहि त्याचे जरा वाइट वाटते
द सांबा किंग्ज
धताड तताड
अभिनंदन ब्राझिल
हेहेहेहेहेहे
+१
काका की कका?
कोण आहे ते
१-१
गेला
हरलेल्याच
हा हा हा ...
अहो बै,
>>स्पेन
बाडिस! >>
मेवे,
सहमत,
ओ मालक,
वरील सर्वं
तुमचीच
काय राव?
बरोबर आहे,
अरेरेरे...
हे हे हे,
हे हे हे,
हा हा हा
घाना
आजची मॅच बघू शकलो नाही
दुसर्या
मेलो अण्णा
चूक, आज
अर्रर्र ..
हा हा हा!
सेल्फ गोल