मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोव्याची छायाचित्रे

Manish Mohile · · कलादालन
शांतादुर्गा मंदीर - मंगेश मंदीर - दोना पावला पुतळा व सुर्यास्त - Spice Farm - पणजी पासून काही अंतरावर ही जागा आहे. साधारण दिडशे एकर जमिनीवर "ऑर्गनिक" पद्ध्तीने मसाल्यांची लागवड केलेली आहे. तेथील काही चित्रे - वेलची - ऑल स्पाइस - ह्या एका झाडामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचा स्वाद असतो. व्हॅनिलाची वेल - स्पाइस फार्म मधील एक छोटासा पुल - बाघा बीच - पलोलिम समुद्र किनारीचा सुर्यास्त -
लेखनविषय:

वाचने 6278 वाचनखूण प्रतिक्रिया 23

Manish Mohile 15/06/2010 - 22:34
फोटोच्या दुव्यामध्ये योग्य ते फेरफार केलेले आहेत. आता फोटो दिसावेत.

In reply to by Manish Mohile

पांथस्थ 15/06/2010 - 23:10
आता सर्व छायाचित्रे दिसत आहेत. धन्यवाद. मस्त आली आहेत! - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

मुक्तसुनीत 15/06/2010 - 22:37
फोटो फारच सुरेख आहेत. मी एक धागा काढायचा म्हणतो : गोवा कसा पहावा ? तुम्ही तुमच्या फोटोनी उत्तर दिलेले आहेच. :-)

शिल्पा ब 15/06/2010 - 22:37
देवळे चर्चसारखी का आहेत? फोटो छान. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

पाषाणभेद 16/06/2010 - 04:18
असेच मला वाटले. मंदिरांवर चर्च ची छाप म्हणजे मंदिर अलिकडचे आहे का? (पोर्तूगीज आल्यानंतरचे म्हणतो.) The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

In reply to by पाषाणभेद

फोंड्याच्या आजूबाजूची प्रमुख देवळे पूर्वी सासष्टी तालुक्यात होती. उदाहरणार्थ वरील मंगेशीचे देवस्थान (हल्ली फोंडा तालुक्यातील मंगेशी गावात) पूर्वी कुठ्ठाळी (सासष्टी/मुरगांव तालुक्यांत) होते. सासष्टी भाग पोर्तुगिजांच्या "जुन्या जित" भागात होता. फोंडा तालुक्यात पोर्तुगिजांनी सौंद्याच्या (हिंदू) राजाला शरण दिली होती. तिथे देवळांच्या पावित्र्याचे रक्षण केले जाईल असे पोर्तुगिजांचे सौंदेकरांना आश्वासन होते (आणि त्यांनी ते पाळले). म्हणून सासष्टीमधील देवस्थळे फोंड्याच्या बाजूला स्थलांतरित झाली. सर्व इमारती १७४० काळाच्या नंतरच्या आहेत. मंगेशी देवस्थानाच्या संकेतस्थळावर काही जुने फोटो आहेत. १७४४-१८९० काळातली इमारत : १८९०-१९७३ काळातली इमारत : १९७३ सालच्या जीर्णोद्धारात इमारतीचे स्थापत्य बदललेले नाही : माझ्या मते गोव्यातल्या देवळांचे स्थापत्य गोव्यातील चर्च-इमारतींसारखे नाही. घुमट गोल आहेत खरे. पण त्रिकोणी मुख, "फ्लाइंग बट्रेसेस" हे सर्व प्रकार मुळीच दिसत नाहीत. १८९०च्या जीर्णोद्धारानंतरही मंगेशीच्या मुख्यद्वारत कमानी (आर्चेस) दिसत नाहीत. १९७३ नंतर दिसतात, ते वेगळे.

In reply to by धनंजय

प्रदीप 16/06/2010 - 07:48
मंगेशी व अन्य देवस्थाने कुठ्ठाळीहून धर्मसंकटामुळे स्थलांतरीत करावी लागली हे वाचून/ ऐकून आहे. पण त्यातील 'पोर्तुगिजांनी सौंद्याच्या (हिंदू) राजाला शरण दिली होती. तिथे देवळांच्या पावित्र्याचे रक्षण केले जाईल असे पोर्तुगिजांचे सौंदेकरांना आश्वासन होते (आणि त्यांनी ते पाळले)' हा भाग मात्र मलातरी नवीन आहे. देवळे चर्चेस सारखी दिसत नसली तरी त्यांच्या व प्रांगणांतील आजूबाजूच्या इमारतींवर पोर्तुगीज/स्पॅनिश स्थापत्याचा प्रभाव जाणवतो. उदा. देवळांच्या उंचच उंच खिडक्या व त्यांच्या काचा, सभागृहातील घुमट इ.

In reply to by प्रदीप

चिरोटा 16/06/2010 - 10:36
मंगेशी व अन्य देवस्थाने कुठ्ठाळीहून धर्मसंकटामुळे स्थलांतरीत करावी लागली हे वाचून/ ऐकून आहे
खरे असावे. 'विशेष लोकप्रिय' नसलेले नार्वे येथील सप्तकोटेश्वराचे मंदिर तसे आहे. हे मंदिर १६व्या शतकातले आहे.मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शिवाजी महाराजांनी खर्च दिला होता.(मंदिराच्या बाहेर तशी माहिती दिली आहे). P = NP

In reply to by प्रदीप

सुनील 16/06/2010 - 16:25
पण त्यातील 'पोर्तुगिजांनी सौंद्याच्या (हिंदू) राजाला शरण दिली होती. तिथे देवळांच्या पावित्र्याचे रक्षण केले जाईल असे पोर्तुगिजांचे सौंदेकरांना आश्वासन होते (आणि त्यांनी ते पाळले)' हा भाग मात्र मलातरी नवीन आहे. फोंडा शहराच्या वेशीवर फर्मागुडी नावाचे गाव आहे. तेथे संभाजी महाराजांचा पुतळादेखिल आहे. असे, सांगितले जाते की, ह्या देवळांचे रक्षण करण्याचे आश्वासन पोर्तुगीझांकडून घेतल्यानंतरच ते तेथून गेले. असो, खरा इतिहास जाणून घ्यायची इच्छा आहे. बहुसंख्य देवळे साष्टीतून फोंड्यात आली हे मात्र खरे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by प्रदीप

सुनील 16/06/2010 - 16:32
देवळे चर्चेस सारखी दिसत नसली तरी त्यांच्या व प्रांगणांतील आजूबाजूच्या इमारतींवर पोर्तुगीज/स्पॅनिश स्थापत्याचा प्रभाव जाणवतो. उदा. देवळांच्या उंचच उंच खिडक्या व त्यांच्या काचा स्थापत्याबाबतीतचे मतप्रदर्शन जाणकार करतीलच. पण मला गोव्यातील देवळांवर जो प्रभाव आढळतो तो वेगळाच आहे. अतिशय स्वच्छ परिसर. कुठेही भिकार्‍या-कुष्ठरोग्यांची गर्दी नाही. शांत वातावरण! महाराष्ट्रातील बहुसंख्य "लोकप्रिय" देवळांच्या तुलनेत अतिशय वेगळी. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

यशोधरा 15/06/2010 - 22:57
शांतादुर्गेच्या मंदिराचा फोटो अतिशय आवडला.

शुचि 16/06/2010 - 01:34
शांतादुर्गा मंदीर सुंदर :) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अरुंधती 16/06/2010 - 09:21
फोटू झकास! आवडले! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

अमोल केळकर 16/06/2010 - 10:40
मस्त फोटो अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

jaypal 16/06/2010 - 10:43
पहिले दोन विशेष आवडले =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/