हल्ली
हल्ली मिसळपाव खायला आलो की जुने दिवस आठवतात. झणझणीत, तोंडाला पाणी सुटणार्या किती डिशेस खाल्या त्याची आठवण येते.
हली मिसळ खाताना बर्याचवेळा खडा लागून रसभंग होतो. एक चमचमीत डिश खाऊन 'रिपीट' ऑर्डर द्यावी तर पाणी वाढवलेली डिश समोर येते.
कधीकधी डिश खूप आवडलेली असते पण ती खात असतानाच कुठूनतरी पारंबीला लोंबकाळून खराखुरा टारझन येतो आणि काय होताय हे कळायच्या आत आपल्या समोरची डिश घेऊन गायब होतो.
आजुबाजूची अनेक गिर्हाईके एकाच डिशची फर्माईश करत आहेत म्हणून तीच मागवावी तर ती इतकी सपक निघते की आपली टेस्ट बिघडली आहे की पब्लिकची, असे वाटायला लागते. असो, "म्हातारपण वाईट" हेच खरे!!!
प्रतिक्रिया
बरं...आता
दुर्लक्ष
हर..हर ..पेशवाई गेली.. चांगल्या जेवणावळी गेल्या
खडा बिडा
पालथ्या