✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

साथ!

न
नीधप यांनी
Tue, 06/08/2010 - 08:45  ·  लेख
लेख
कोकणात भटकताना मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याच्या शिवापूर गावी पोचले. जातच राह्यले. अश्याच एका शिवापूर भेटीत डागदराकडून घराकडे परत जाणारे हे आजोबा आजी भेटले. आजोबांना आधार देत देत हळूहळू घरापर्यंत नेणार्‍या आजी, हात पाय सुजलेले आजोबा... घर बहुतेक गडकरवाडीच्या डोंगरात म्हणजे थोडा चढ मग वहाळ ओलांडायचा आणि मग एक छोटा पण खडा चढ संपवायचा की आलंच घर... sath-01 सगळं कसं एकमेकांच्या साथीनं.. किती काय काय दिवस पाह्यले असणार त्यांनी. कित्ती वर्षं कुणास ठाऊक. आत्ताचेही दिवस कष्टाचे असतीलच की पण तरी डोक्यात जास्वंद का होईना माळण्याइतक्या आजी उत्साही होत्याच. sath-02 ते दूर जाईपर्यंत, डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे मला दिसेनासे होईपर्यंत मी त्यांच्याकडेच बघत राह्यले. हे असंच कायम रहावं अशी इच्छा करत आणि तोच आशिर्वाद त्यांच्याकडे मागत.... sath-03 - नी ---------------------- मिपावर फोटो चढवणे हे थोडं कटकटीचं असल्याने आधी इतरत्र टाकलेलं हे फोटो फिचर इथे टाकायला कंटाळा केला होता.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9918 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

काहीतरी

नीधप
Tue, 06/08/2010 - 08:49 नवीन
काहीतरी गंडलं फोटो टाकताना... अब क्या? - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फ्लिकरवर

भाग्यश्री
Tue, 06/08/2010 - 08:53 नवीन
फ्लिकरवर आहेत ना? मग तिथे फोटोच्या वर ऑल साईझेस असा टॅब असेल. तिथे क्लिक करून मिडीयम्/लार्ज साईझ सिलेक्ट करून खालचा कोड कॉपी कर.
  • Log in or register to post comments

जमलं... धन्स

नीधप
Tue, 06/08/2010 - 09:00 नवीन
जमलं... धन्स भाग्यश्री! - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

संध्याछाया

रामदास
Tue, 06/08/2010 - 09:16 नवीन
एक वेगळासा विषय. एक छोटी कविता या छायाचित्रणासाठी. हातात असू दे थरथरणारा हात ओठात असू दे तेच पुराणे गीत. मी मिटले डोळे तू हळूच दे ना हाक ही सांज कलंडे रात्रीच्या अंधारात, एक हलका झोका मला पुरेसा.....
  • Log in or register to post comments

उफ्फ... क्या

नीधप
Tue, 06/08/2010 - 09:19 नवीन
उफ्फ... क्या बात है!! - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

उफ्फ.. क्या बात

संदीप चित्रे
Tue, 06/08/2010 - 22:28 नवीन
माझ्या मनातलीच दाद फोटो आणि कविता सुरेखच. बाप्पांनी चढवलेला साज ऐकायचाय अजून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप

हॅट्स ऑफ

विनायक पाचलग
Tue, 06/08/2010 - 09:35 नवीन
त्या वृद्ध जोडप्याला.. असा क्षण फोटोत पकडणार्‍याला... आणि कवितेला ,कविता करणार्‍याना.. सलाम विनायक पाचलग वाँट टु टॉक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

क्या बात है...

श्रावण मोडक
Tue, 06/08/2010 - 09:52 नवीन
ही सांज कलंडे रात्रीच्या अंधारात क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

समयोचित

प्रकाश घाटपांडे
Tue, 06/08/2010 - 09:53 नवीन
अगदी समयोचित कविता! विचार करत होतो काय असेल अंतर्मनात दोघांच्याही.कुणीतरी एक आधी जाणार. आपल्या पश्चात सहचारी ला आधार कुणाचा? प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

ही माझी प्रतिक्रिया.

प्रमोद देव
Tue, 06/08/2010 - 10:09 नवीन
http://www.divshare.com/download/11635970-586 :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

अरे वा!

प्रकाश घाटपांडे
Tue, 06/08/2010 - 10:17 नवीन
मूळ लेख सुंदर त्यावर रामदासांची कविता सुंदर बाप्पांनी त्यावर साज पण अगदी पाउणतासात चढवला तो ही सुंदर प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

खूप हळ्वं

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/08/2010 - 15:13 नवीन
खूप हळ्वं केलंत साहेब मनाला, कविता खूपच सुंदर. सध्या कृष्णाबाई सुर्व्यांचं 'मास्तरांची सावली' वाचतो आहे. त्यात बाईंनी नारायण सुर्व्यांच्या मृत्यूबद्दल केलेलं मागणं असंच मनात कालवाकालव करून गेलं. नी, या फोटोजवर मागेच प्रतिकिया दिली होती. परत एकदा आवडले. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

क्या बात है!

चतुरंग
Tue, 06/08/2010 - 21:22 नवीन
(रामदासांचापंखा)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मस्तच!! नीर

प्राजु
Tue, 06/08/2010 - 22:23 नवीन
मस्तच!! नीरजा... हे फोटोरूपी काव्यही मस्तच गं!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

टची फोटूस

टारझन
Tue, 06/08/2010 - 09:31 नवीन
टची फोटूस .... संतमहात्मे म्हणुनंच गेलेत ... "म्हातारपण देगा देवा ............" (ही आपल्या लाडक्या देव काकांवर वैयक्तिक टिपण्णी नाही , कलोअ) -(म्हतारपणाची कुतुहलतेनं वाट पाहाणारा) बुढ्ढा ट
  • Log in or register to post comments

सध्या आनं

शिल्पा ब
Tue, 06/08/2010 - 09:45 नवीन
सध्या आनं दि आनं दगडे जिकडे तिकडे चोहीकडे अस्ल्यामुळे म्हतार्पनाची वाट बघुशि वाटत नाही... (अगदी तरुण) काहीपण *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त फटु!

सहज
Tue, 06/08/2010 - 09:58 नवीन
म्हातारपणावरुन आठवले. न रहावून एक दुवा.
  • Log in or register to post comments

खूप छान

शिल्पा ब
Tue, 06/08/2010 - 10:03 नवीन
खूप छान माहिती मिळाली पपा डॉक यांच्याबद्दल...धन्यवाद सहजराव. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

फोटो

मदनबाण
Tue, 06/08/2010 - 10:05 नवीन
फोटो द्वारे केलेले अनुभव कथन आवडले... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

मस्त

मस्त कलंदर
Tue, 06/08/2010 - 10:16 नवीन
मस्त फोटोज... आधी पाहिले होते.. तुझ्या ब्लॉगावर की माबो वर ते नाही आठवत.. रामदास काकांच्या कवितेला _/\_ मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

सुरेख

आनंदयात्री
Tue, 06/08/2010 - 10:22 नवीन
सुरेख !!
  • Log in or register to post comments

ब्राउनिंग

मनिष
Tue, 06/08/2010 - 10:35 नवीन
ब्राउनिंगच्या ओळी आठवल्या...
Grow old with me, the best is yet to be
रामदास यांची कविताही खासच!
  • Log in or register to post comments

Grow old with me, the best

शिल्पा ब
Tue, 06/08/2010 - 10:39 नवीन
Grow old with me, the best is yet to be वाह!! यापुढे बोलायलाच नको... जन्म जन्मान्चे नाते... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

लिओनार्दो

नीधप
Tue, 06/08/2010 - 10:43 नवीन
लिओनार्दो कोहेन कुणी ऐकतं का? त्याचं Dance me to the end of love! ऐकलंय? मला नेहमी तेच आठवतं या फोटोंबरोबर... - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नाही ब्बा....

वेताळ
Tue, 06/08/2010 - 10:48 नवीन
आम्हाला तर बालकवीच आठवतात. वेताळ
  • Log in or register to post comments

वा ! क्या

संजा
Tue, 06/08/2010 - 15:06 नवीन
वा ! क्या बात है फोटो बघुन मला 'Anthony Gonsalvis' ची प्रकर्षाने आठवण येतेय. त्याच 'My name is anthony' कोणी ऐकलय का ? संजा
  • Log in or register to post comments

अतिशय

पुष्करिणी
Tue, 06/08/2010 - 15:23 नवीन
अतिशय बोलके आणि तितकेच हळवे करणारे फोटो आणि प्रतिसादातील कविताही.. मेरे हाथ में तेरा हाथ हो सारी जन्नते मेरे साथ हो... पुष्करिणी
  • Log in or register to post comments

आजीबाईंनी

शुचि
Tue, 06/08/2010 - 18:11 नवीन
आजीबाईंनी रुप्यायवढं कुंकू लावलय. मस्त फूल खोवलय आणि मंद गुलाबी नऊवारी पतळ नेसल्यात. परत त्याच मदत करतायत आजोबांना, आधार देतायत. आजोबा नशीबवान आहेत. छान वाटलं बघून. दोघांना भरपूर चांगलं, मंगलमय आयुक्ष लाभो. नी छान प्रसंग टिपलायत तुम्ही. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

छान! एक वेगळाच, संवेदनशील चित्रांचा धागा.

चतुरंग
Tue, 06/08/2010 - 21:21 नवीन
बरोबरची टिप्पणीही आवडली. चतुरंग
  • Log in or register to post comments

१+

विनायक प्रभू
Tue, 06/08/2010 - 23:47 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आयुष्याची

भाग्यश्री कुलकर्णी
Tue, 06/08/2010 - 22:08 नवीन
आयुष्याची आता,झाली उजवण येतो तो तो क्षण अमृताचा. ही बोरकरांची कवीता आठवली फोटो बघताना.
  • Log in or register to post comments

एकेकाचं प्राक्तन!!!

पिवळा डांबिस
Tue, 06/08/2010 - 22:21 नवीन
बराय बुवा लोकांना कविता वगैरे सुचतात!! (आणि त्यांना चाली वगैरे पण लावून मिळतात!!!) आम्हालाही फोटो आवडले..... म्हणून हौसेनं काकूलाही दाखवले..... तर खालील प्रतिक्रिया, "म्हणून सांगत असते तुझे उद्योग जरा जपून करत जा म्हणून!!! उद्या तूही असाच मोडून बसलास तर मलासुद्धा तुला असंच डॉक्टरकडे घेऊन जावं लागणारै!!!" ~X( मज फूल ही रुतावे..... :''(
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ!

चतुरंग
Tue, 06/08/2010 - 22:45 नवीन
काय पण वळिखलंय काकूंनी पिडांना? ;) काकूंना आमचा नमस्कार सांगा हो! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

_/\_

श्रावण मोडक
Tue, 06/08/2010 - 22:58 नवीन
काकूंना दंडवत. :) पिडांकाकांची बायकोच असा विचार करू शकते आणि काकांना टोला मारू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

काकू अगदी

मस्त कलंदर
Tue, 06/08/2010 - 23:11 नवीन
काकू अगदी हुश्शार हो!!! त्यांच्यासमोर काकांचा डांबिसपणा पांढराफटक पडत असेल नाही? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हो ना

चतुरंग
Tue, 06/08/2010 - 23:41 नवीन
पांढरा डांबिस! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

बिच्चारी...

नीधप
Wed, 06/09/2010 - 08:08 नवीन
बिच्चारी... ती इथे मिपावर नाही म्हणून तिच्या नावावर सिडॉ काहीही खपवतात... ;) - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा