रविवार सकाळ ...सुट्टीचा दिवस ...आरामात उठाव असा बेत मनाशी करताच होते ...तोच नेहमीच्या अलार्म पेक्षा जरा जास्तच मोठ्याने काहीतरी वाजू लागल थोड नॉर्मलला आल्यावर कळल त्या आवाजाच्या जनक खुद्द आईसाहेब होत्या ..... तो रिपीटेड अलार्म बंद व्हावा म्हणून नाईलाजाने उठलेच .....
थोडाफार आवरून चहा घेत असतानाच आई साहेबांनी डायरेक्ट युद्धाच पुकारला होत ..." संध्याकाळी आत्याला केळवण आहे मंडईतून भाजी आणायची आहे स्वयंपाक घरात तुझा उपयोग नाही तेव्हा तु मंडईत जायचं आहे " झाल ' हे धरणी माते मला उदरात घे ' असलं काहीतरी ओरडावस वाटल पण त्याचा उपयोग नव्हताच म्हणून मुकाट्याने शरणागती पत्करली.
रविवारी सकाळी ९.३० वाजता आवरून सावरून मी चक्क मंडईत निघाले ...बाबांच्या मते चेहरा पोचवून आल्यासारखा दिसत होता ... दीदीच्या मते मी रडणार होते ... कसबस चीड चीड करत निघाले ...नेहमीप्रमाणे पार्किंग लाही कटकट झाली ...सरतेशेवटी मी मंडईत प्रवेश केला ......
गर्दी आणि भाजीवाल्यांचे आवाज याने अक्षरशः "हे भगवान उठाले "असा झाल होत ..... एकेका दुकानासमोरून मी फेरी मारत होते ....त्या वातावरणाला सरावल्यावर हळूहळू मला तिथे असलेल्या चैतन्याचा साक्षात्कार व्हायला लागला .... विविध प्रकारच्या ताज्या भाज्या तिथे सुंदर पद्धतीने रचून ठेवल्या होत्या ... काही खी ठिकाणी तर रंगांची उत्तरं रंगसंगती साधली होती .... नेत्रसुखद वाटत होत ..... मग हळूहळू मी तिथल्या रंगांच्या उधळणीत स्वतःला हरवू लागले....
हिरवीगार कोथिंबीर तिच्याकडे पाहीले तरी डोळे शांतवून जात होते .... सुखद गारवा देणारा तिचा रंग पटकन उचलून तिला पिशवीत टाकले ..... नंतर नजर वळली ती लालबुंद टोमाटो वर वळली रसरशीत लाल लाल गोळे मला तर सलील च्या माझ्या भाच्याच्या गालांची आठवण झाली ...पटकन मी ते लाल चैतन्य पिशवीत भरलं..... पुढे पुढे जस जशी मी सरकू लागले तसं तशी रंगांचं एक नव जग हाती आल्यासारख वाटल ..... जणू निसर्गाने कसलेल्या चीत्राकाराप्रमाणे त्यात रंग ओतले आहेत .....पालेभाज्यांचे किती प्रकार सगळ्या हिरव्या पण त्या हिरवे पणातही वेगळे पण होत.... मेथी मखमली हिरवी .. शेपू पिवळट हिरवा... तर पालक रेघाळी हिरवा .... मग रंगातल वेगळ पण ओळखायला डोळे भिरभिरू लागले ,,,, बीटाचा गर्द गुलाबी रंग तर लाल मुळ्याचा माणकासारखा रंग ....नुसत्या मुळ्याचा पांढराशुभ्र रंग तर लसणाचा गौर गुलाबी कांती सारखा लोभसवाणा रंग ..... आल्या बटाट्याचा मातीशी नात सांगणारा तपकिरी रंग ... तर पाकळी गणिक उलगडत जाणारा कांद्याचा गुलाबी रंग .....गवारीच्या पिस्ता कलरची वेगळीच खुमारी तर तोंडल्याच्या अंगावर पंदुरकी नक्षी ..... रंगांच्या दुनियेत मी हरवूनच गेले ..प्रत्येक भाजी म्हणत होती जणू "बघ मी किती सुंदर आहे घेना मला" पिशवी बरीच जड झाली आणि मी भानावर आले....
निसर्गाची खरच कमाल वाटली किती सिध्दहस्त आहे टो की आहे एक कलंदर कलाकार??पण भाजी खरेदी हा माझ्यासाठी सोहळा झाला ...पण ज्या मूड मध्ये इथे आले होते तो पार कापरा सारखा उडून गेला आणि मागे उरले ताजी तवानी त्या भाज्यांसारखी टवटवीत मी... अवघा रंग एकची झाला होता.....
......................................................................................................................
होने होने दे नशा खोने खोने को है क्या
एक सांस में पी जा जरा जिंदगी चढा
है है तो एक जशन तु थिरकने दे कदम
अभी सांसोन में है दम अभी चलने दे सितम
वाचने
5732
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा , मजा
लेख आवडला
In reply to व्वा , मजा by टारझन
बोरं ?
In reply to लेख आवडला by jaypal
टा-र्या
In reply to बोरं ? by टारझन
हा हा हा ...
In reply to टा-र्या by jaypal
मस्त लेख!
खरं आहे
In reply to मस्त लेख! by शुचि
मस्त लेख!
सुंदर!
सुन्दर!! भा
मला
सुरेख रंगी
आणि मागे
+१
In reply to आणि मागे by भडकमकर मास्तर
हिरवीगार
लोक अलग
झुम्बरातै आता बाजार उटल्यावर कसे दिसते ह्यावर एक लेख लिह.
नाही हो
In reply to झुम्बरातै आता बाजार उटल्यावर कसे दिसते ह्यावर एक लेख लिह. by वेताळ
दाण गा कसला अन काय.......
ह्म्म