I WANNA GROW UP ONCE AGAIN
office मधलं तेच रटाळ वातारण त्या deadlines आणि कामाचे डोंगर ... बाहेर उन्ह भकाभका आग ओकताय असा एकंदरीत माहोल अतिशय कंटाळवाणा ..... प्रचंड चीडचीड होत होती.... पण खरच इलाज नव्हता
असाच कसाबसा दिवस सरकत होता आणि अचानक दुपारी थंड गारवा हवेत पसरायला लागला AC चे सगळे नियम धाब्यावर बसवून मी खिडकी उगडली आणि आहाहाहा ............. एक थंड हवेचा झोत गालाचे लाड करून गेला ... मागचा कंटाळा विसरून आणि काम थोड बाजूला टाकून मी बाहेरच्या निरीक्षणात गुंतले ...क्षणभरापूर्वी जे आकाश आग ओकत होत तेच आता सुंदर नीळसावळ झाल होत ..बरसायला आतुर ...
आणि झाल त्याच आगमन ..टपटप आवाज करत तो आला आणि तनमन चैतन्यमय करत गेला ...एकेका थेंब बरोबर कंटाळा हाहा म्हणता विरघळत गेला .... रस्तावर उगीचच धावपळ माजली ... रेनकोट घालायला वेळाही मिळालं नाही म्हणून आडोश्याला उभ राहून कोणी रेनकोट चढवत होत... कुणी तसाच भिजत पहिल्या पावसाचा मनमुराद आनंद घेत होत .... लहान मुल दिसतील त्या डबक्यात उद्या मारून त्याचं लहानपण साजर करत होती ....
त्यांना पाहिलं आणि वाटल अरे आपण आपल लहानपण कुठच्या कुठे विसरून आलोय ....अश्या पावसाळी डबक्यात उडी शेवटची कधी मारली हे ही आठवत नव्हत ....मोठेपणाच्या नावाखाली मोठ्या आनंद मिळवण्यात गुंतलेय मी असा वाटून गेल ..लहानपणी मला उगीचच खोटे केस लावायची हौस होती म्हजे डोक्याला रुमाल लावायला आणि गल्लीभर माझे केस माझे केस करून फिरायचं ...आणि परवाच नवीन कंपनी जॉईन करण्याआधी हातभार लांब वेणीचा सुटसुटीत लेयर कट करून आले ... संक्रातीला अगदी पहिल्या घरापासून शेवटच्या घरापर्यंत मी तिळगुळ घ्यायला जायची (तिळगुळ अजिबात आवडत नसत तरीही ) दसर्यालाही हीच तर्हा पण परवाच्या दसर्याला मावशिकडेही रडत खडत गेले .... चोरून काजू खाणे हाही आवडीचा उद्योग आता तर दिएतिन्ग मुळे तेही बंद झालाय ..... पूर्वी आठवतंय आत्याकडे गेलो होतो तेव्हा तिने एक पेन ठेवायचा पाउच दिलेला मला इतका काही आनंद झाला होता की बस्स ...पूर्ण प्रवासात शाळा सुरु झालीये आणि मी माझा तो अलौकिक पाउच मिरवतेय असा स्वप्न मला पडत होती ....आणि वाढदिवसाच्या दिवशी बाबांनी नवीन पर्स दिली अस्सल कातडी आनंद झाला पण तीव्रता खूपच कमी झाली होती ....
का असा झाल असेल ???? आनंद लुटण्याची क्षमता कमी झालीये की अपेक्षा वाढल्या आहेत .... प्रोफेशनल लाईफ जगता जगता मी स्वताबाद्दलाही प्रोफेशनल झाले होते ....मग ठरवलं या पावसाळ्यापासून नवी रुजवात करायची पुन्हा एकदा नव्याने जगायचं लहान लहान आनन उपभोगत आणि हो दुसर्यालाही आनंद देत ........मस्त कॉफी चा वाफाळलेला कप मी हातात घेतला आणि रेदिओ ट्यून केला गायक गात होता .....give me some sunshine
give me some rain GIVE ME ANOTHERE CHANCE I WANNA GROW UP ONCE AGAIN LA LA LA LA LALA LA
वर्गीकरण
प्रतिक्रिया
किती
विषय जुनाच
पुन्हा
कमवायला
हे मात्र खर आहे...! अगदी सहमत..
+२
कमवायला
बेधुंद जगायचं.. बास्स!
झुम्बर...
अर्रे काय
पुन्हा
आवडले.
टाऱझन बर
टाऱझन बर
मी असा
मला
सही चुकली
लोकांनाचा
लेखन