"काय सर, खुप दिवसांनी भेटताय?" एकदम बिझी का?
हो.
"वयोमानाप्रमाणे जरा सबुरी घ्या की".
बर.
"मुलाचे ग्रॅज्युएशन पुर्ण झाले असेल ना?"
हो.
"कितीचा जॉब मिळाला?"
अजुन मिळायचा आहे.
"क्काय?"
परिक्षा संपुन आताशी महीना तर झाला.
"पण तो यु.डी.सी.टी.मधला ना?"
हो.
"कँपस मधे जॉब मिळाला नाही?"..
जास्त कुणी आले नाहीत.
"क्काय सांगताय? मला तर वाटले की कँपस मधे कमीत कमी पन्नास साठ चा जॉब मिळाला असेल."
वर्षाला का महीन्याला?
"काय चेष्टा करताय सर? युडीसीटीवाल्याला वर्षाला पन्नास?"
शक्यता नाकारता येत नाही.
"कठीण आहे. हीच तर आपल्या शिक्षण प्रणाली ची त्रुटी आहे. मर मर अभ्यास करुन प्रिमियम इन्स्टीट्युटमधे प्रवेश घ्यायचा आणि जॉब नाही?"
चालतय हो. मिळायचा तेंव्हा मिळेल. जेवढा कमी पगाराचा मिळेल तेवढे चांगले.
"काय बोलताय सर, निदान युडीसीटी बद्दल तरी असे बोलु नका".
(आयला रे त्या युडीसीटी च्या)
अहो तुम्ही म्हणताय त्या सर्व पेशवेकालीन गोष्टी. कँपस, प्रिमियम वगैरे. आणि जरा झळ पोचु दे की. पुढे उपयोग होतो.
"मग सध्या काय करतोय?"
इतर सर्व पदवी धारकांसारखे सीव्ही पोस्ट करतोय. बाकी वेळ झोपा काढतोय.
"अरेरे."
त्यात अरेरे करण्यासारखे काय?
"तुम्ही काही हालचाल करताय की नाही".
नाही बॉ.
"कमाल आहे."
त्याच तो बघेल.
"अहो पण पालक म्हणुन काही जबाबदारी?"
हो ना. गाडी दिली की मजा करायला.
"अहो मी ते बोलत नाहीये. जॉब मिळायला काही मदत.?" त्याची जागा त्याने स्वतः शोधायची. खुपच अडल तर मग बघु.
"अडायची वाट का बघताय? जेवढा लवकर मार्गी लागेल तेवढ बरे. पुढचे सग़ळे सुरळीत."
पुढचे?
"लग्न वगैरे..."
म्हणजे तुम्ही कुठली मुलगी सुचवताय की काय?
"आता जॉब नाही म्हणजे बोलणच खुंटले की".
अस म्हणताय. बर बर. आजपासुनच बघायला सुरु करतो. मिळाला की पे पॅकेज लगेच तुम्हाला कळवतो.
हो हो लगेच कळवा.
वाचने
7538
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
टेक ईट इझी..
अगदी
In reply to टेक ईट इझी.. by रामदास
माझ्या
In reply to अगदी by सहज
हॅ हॅ हॅ!
In reply to माझ्या by कानडाऊ योगेशु
+१
In reply to अगदी by सहज
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वयोमान
हम्म
नशिब
In reply to हम्म by विनायक पाचलग
तुम्हीपण??
In reply to नशिब by विनायक प्रभू
मास्तरने एका चांगल्या पोरा ला
In reply to नशिब by विनायक प्रभू
झकास!
लोकांना
छान
मास्तर एकदम सही लेख
मास्तर,
मास्तर ईज
माष्टर लेख
अरे
वा वा वा
उद्बोधक.....
आठवण
+ बरोबर आहे
In reply to आठवण by नितिन थत्ते
त्याखेरीज
In reply to + बरोबर आहे by चतुरंग
हा हा हा! जबरा!!
In reply to त्याखेरीज by रामदास
+२
In reply to आठवण by नितिन थत्ते
अरे वा!
In reply to +२ by स्वाती२
थत्ते काका ही घ्या
In reply to आठवण by नितिन थत्ते
ही होय
In reply to थत्ते काका ही घ्या by jaypal
आमच्या
In reply to थत्ते काका ही घ्या by jaypal
लँब्रेटा
In reply to आठवण by नितिन थत्ते
मास्तर,
बसवला ऑटोत
जेवढा कमी पगाराचा मिळेल तेवढे चांगले.
+ सहमत
In reply to जेवढा कमी पगाराचा मिळेल तेवढे चांगले. by संजय अभ्यंकर
घरचा धंदा आयताच अशी मुलांची भावना होता कामा नये हा उद्देश..
In reply to + सहमत by चतुरंग
+१
In reply to घरचा धंदा आयताच अशी मुलांची भावना होता कामा नये हा उद्देश.. by संजय अभ्यंकर
बाकी ह्या
खूप दिवसांनी वाचला लेख
मजेदार लेख
कालपासून
सरांचा
लेख आवडला . .