Skip to main content

महात्म्याची अखेर

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 02/06/2010 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
महात्म्याची अखेर हे जगन फडणीस यांचे अभ्यासपूर्ण पुसक. हे पुस्तक केवळ गांधीहत्या ह्या विषयाला वाहिलेले व ससंदर्भ दाखले असलेले पुस्तक आहे. 'घरगुती सावरकर' मधे ५५ कोटी साठी गांधीजींनी उपोषण केले का यावर अतिशय रोचक व अभ्यासपूर्ण चर्चा चालली आहे. यावर हे पुस्तक काय म्हणते हे दाखवण्यासाठी व त्यायोगे नव्या धाग्यात खंडन-मंडन करता यावे म्हणून हा काथ्याकूट चालु करत आहे. यातील पुढील परिच्छेद लेखकाच्या पूर्वपरवानगीविना मुळ पुस्तकातून जसेच्या तसे टंकत आहे (मिपाच्या धोरणात बसत नसल्यास, मला एकव्यनी पाठवून - म्हणजे ब्याकअप घेता येईल- धागा अप्रकाशित केला तरी हरकत नाहि): पुस्तकातील लेखन निळ्या रंगात देत आहे आधी गांधीजी फाळणीच्या विरोधात होते याचे ४ पुरावे लेखक पुस्तकात देतो. आणि नंतर शेवटाचा पुरावा देतो तो मला लास्त रोचक वाटल्याने तो इथे देत आहे: फाळणीच्या योजनेला मान्यता देण्यासाठी काँग्रेस कार्यकारीणीची बैठक बोलावली होती. या बैठकीला जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया यांना खास निमंत्रित केले होते. डॉ. लिहियांनी ह्या भेटीचा तपशीलवार वृत्तांत गिल्टी मेन ऑफ पार्टीशन या पुस्तकात दिला आहे तो असा "गांधी, सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान, जयप्रकाश नारायण व मी अश्या चौघांनीच फाळणीला विरोध केला. इतर कोणीही फाळणीच्या योजनेविरूद्ध चकार शब्द काढला नाहि." असे नमुद करून लोहिया पुस्तकात पुढे म्हणतात "या बैठकीतील चर्चेत गांधींनी हस्तक्षेप केला तो महत्त्वाचा आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा विषेश विचार केला पाहिजे. फाळणीला मान्यता देण्यापूर्वी नेहरू व पटेल यांनी आपणास त्याची कल्पना दिली नव्हती असे गांधीजी काहिश्या तक्रारवजा भाषेत म्हणाले. गांधीजींना आपले म्हणणे पुरे करू न देताच नेहरू जरा आवेशाने म्हणाले की आपण वेळोवेळी गआंधीजींना सर्व कल्पना दिली आहे. मात्र जेव्हा गांधीजींनी पुन्हा सांगितले की आपणला माहिती नव्हती तेव्हा नेहरूंनी शब्द बदलून "गांधीजी त्यावेळी मोआखलीत होते त्यामुळे त्यांना तपशिल देण्यात आलेला नाहि"" हाच लोहियांच्या पुस्तकातील तपशील तेंडूलकरांच्या महात्मा: खंड७ मधे आहे. याच्या शेवटी फडणीस टिप्पणी करतात की "भारताला प्रथम स्वातंत्र्य दिले तर ते फाळणीचा विचारच करणार नाहित अशी भीती जीनांना होती म्हणून त्यांना स्वातंत्र्यावेळीच दोन वेगळे देश हवे होते. तर भारताचे तुकडे टाळून स्वातंत्र्य मिळाल्यास आपण वेगळ्या राज्यासाठी जीनांची समजूत काढू शकू असा गांधींना विश्वास होता त्यामुळे त्यांनी इंग्रजांनी आधी देश सोडावा फाळणीचे आम्ही काय ते पाहून घेऊ अशी भुमिका घेतली होती. नेहरु पटेल मात्र, या वादात स्वातंत्र्य लांबणीवर पडेल या भीतीने गांधींना कल्पना न देताच फाळणीला मान्यता देण्याचे कबूल केले. त्यामूळे नाईलाजाने काँग्रेसचा शब्द पडू नये म्हणून गांधींनाही झुकावे लागले. याव्यतीरिक्त हेच मत (गांधी फाळणीस जबाबदार नव्हते तर नेहरू-पटेल यांनी हंगामी सरकारच्या अनुभवांमुळे कंटाळून घाईत फाळणी मान्य केली) डॉ. लोहिया, डॉ. जयप्रकाश नारायण, डॉ. राजेंद्रप्रकाश व मौलाना अब्दूल कलाम आझाद यांच्या लेखांमधे मांडलेले आहे ते फडणीस दाखवतात. आता ५५ कोटींकडे व़ळू या बाबतीत दिलेला तर्क श्री. थत्ते यांनी मांडला आहेच. तेव्हा द्वीरूक्ती करत नाहि.. १३ जानेवारी : उपोषण सुरू. १५ जानेवारी : ५५ कोटी देण्याचा प्रस्ताव संमत १८ जानेवारी : उपोषणाची समाप्ती. मग मधला वेळ का? याला फडणीस उत्तर देतात कारण उपोषण ५५ कोटींसाठी नसून दिल्लीतील शांततेसाठी होते. याबद्दलचा पुस्तकात काहि पुरावे दिले आहेत त्यातील लेखकाच्या मते सर्वात महत्त्वाच्या पुराव्याचा हा वेचा: शांततेसाठीच उपोषण होते यासाठी एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली १३० जणांची शांतता समिती नेमण्यात आली होती. १७ जानेवारी रोजी दिल्लीत त्यांची जाहिर सभा झाली. त्यात पुढील ७ अटी मान्य करण्यात आल्या १. हिंदू मुस्लिम, शीख व इतर धर्मिय दिल्लीत भावाभावाप्रमाणे आणि सौहार्दाने राहण्याची हमी देत आहोत. दिल्लीतील मुसलमानांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहील अशी प्रतिज्ञा करीत आहोत. २. गेल्या वर्षी प्रमाणे ख्वाजा कुतुबुद्दीन मझचा उरूस होईल. ३. सब्जीमंडी, करोलबाग पहाडगंज व अन्य भागांत मुसलमानांना नेहमीप्रमाणे व्यवहार पार पाडता येतील ४. हिन्दुंनी व्यापलेल्या मशिदी मुसलमानांना परत केल्या जातील आणि दिल्लीत मुसलमानांना म्हणून ठेवलेला जो भाग मोकळा आहे त्याचा हिन्दु कब्जा करणार नाहीत. ५. जे दिल्लीतुन बाहेर गेलेले मुसलमान परत येऊ इच्छितात त्यांना हरकत असणार नाहि व त्यांना पूर्वीचे रोजगार करण्यास प्रतिबंध केला जाणार नाहि ६. हे सारे प्रयत्न वैयक्तीक रित्या करू. यात शासनाची अथवा लष्करची मदत घेतली जाणार नाहि. ७. महात्म्यानी आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा व आपले उपोषण संपवावे आणि आम्हास नेतृत्त्व व मार्गदर्शन करावे. या अटी जाहिर सभेत १७ जानेवारीला मंजुर झाल्यानंतरच १८ जानेवारीला त्यांनी उपोषण सोडले. व या अटींमधे ५५ कोटींचा उल्लेखही नाहि. पाकीस्तानला ५५ कोटी द्यावेत हे गांधीजींचे मत जरूर होते. व ते त्यांनी उपोषणा आधी तसेच उपोषणादरम्यानही सांगितले आहे. मात्र हे उपोषण त्यासाठी नव्हते. उपोषणा दरम्यानही ते अनेकविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत मांडत मात्र याचा अर्थ ते उपोषण त्या मतांसाठी होते असा अर्थ होत नाहि. आता चर्चेसाठी श्री इंद्रराज व श्री नितीन यांच्याबरोबरच इतर मान्यवरांना पाचारण करत आहे. :)

वाचने 32537
प्रतिक्रिया 102

प्रतिक्रिया

गांधीजींचे उपोषण नेमके कशासाठी होते? यासंदर्भात मी फाळणी ते फाळणी, अवघड अफगाणिस्तान आणि याच स्वरूपाची पुस्तके लिहिणार्‍या प्रतिभा रानडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या मते ''गांधीजींच्या उपोषणाचा मूळ उद्देश दिल्ली आणि देशात शांतता नांदावी हाच होता. विशेषतः दिल्ली पेटलेली होती. त्यामुळे तिथे शांतता नांदणे गरजेचे होते. त्यामुळेच त्यांनी उपोषण केले. परंतु, त्याचवेळी पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा प्रश्नही उपटला. पाकिस्तानने लॉर्ड माऊंटबॅटन यांना मध्यस्थीची विनंती केली. त्यावर माऊंटबॅटन यांनी गांधीजींना सुनावले, की तुम्ही तत्वाची, नैतिकतेची भाषा करता आणि दुसरीकडे पाकिस्तानचे ठरलेले ५५ कोटी देणेही बाकी आहे. त्यावर गांधीजींनी हे पैसे देण्यास आपली हरकत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यांची हे पैसे देण्यास हरकत नव्हतीच. पण उपोषणाचा मूळ उद्देश मात्र ५५ कोटी देण्यासाठी नव्हता.'' (भोचक) जाणे अज मी अजर

In reply to by भोचक

परंतु, त्याचवेळी पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा प्रश्नही उपटला. अर्थातच. हा प्रश्न ३० डिसेंबरला २० कोटींचा होता. ३१ डिसेंबरला ५५ कोटींचा झाला. १ जानेवारीला ला भारत सरकार ह्या विषयी विचार करत आहे, असे सांगण्यात आले. १२ जानेवारीला भारतीय गृह मंत्र्यांनी ५५ कोटी मंजूर न करण्याची कारणे सांगितली. सर्वांना उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक पुराव्यांनुसार हे स्पष्ट आहे. श्री/सौ/कु रानडे, ह्यांनी वेगळे काय सांगितले ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by भोचक

अर्थातच, ५५ कोटि पाकिस्तानला कुठल्याही पुर्वअटीशिवाय देण्यात यावे फक्त हा उद्देश महात्मा गांधींच्या उपोषणामागे नव्हताच. दिल्लीत होत असलेल्या मुस्लिम-हिंदू-सिख या दंगली थांबवणे हा सुद्धा होता. उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला देण्याकरीता जी अट भारत सरकारने घातली होती, ती अ‍ट पाकिस्तानने १५ जानेवारीच्या आत पुर्ण केली का???????? नाही केली तर भारत सरकारने का निर्णय फिरवला???? स्वतः चे हसे करून घ्यायला????? कुठलं कारण होतं त्या निर्णया मागे ????? या बद्दल काही माहिती आहे का?????????? कुठे मिळेल??????

In reply to by समंजस

अर्थातच, ५५ कोटि पाकिस्तानला कुठल्याही पुर्वअटीशिवाय देण्यात यावे फक्त हा उद्देश महात्मा गांधींच्या उपोषणामागे नव्हताच. दिल्लीत होत असलेल्या मुस्लिम-हिंदू-सिख या दंगली थांबवणे हा सुद्धा होता. ओके. आता पहिल्यांदा तुमचा "उपोषण हे ५५ कोटी च्या व्यतिरीक्त" ह्या मुद्द्याला होकार आला. दुसरा आरोप काय आहे ? कृपया, सभ्य शब्दांत सांगावा. एकाहून अधिक प्रश्नार्थक चिन्हे हे सभ्यतेचे लक्षण नाही. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

मला वाटतं मी माझ्या कुठल्याही प्रतिसादात कोणावरही आरोप केलेले नाहीत आपणांस तसे आढळे असल्यास कृपया सांगावे, योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल :) ---------- ओके. आता पहिल्यांदा तुमचा "उपोषण हे ५५ कोटी च्या व्यतिरीक्त" ह्या मुद्द्याला होकार आला. मी हा मुद्दा सुरूवातीलाच मान्य केलेला आहे. त्यामुळे होकार/नकार चा प्रश्न येत नाही. ------------------------- दुसरा आरोप काय आहे ? दुसरा आरोप काय आहे?? माझ्या प्रतिसादातल्या कुठल्या वाक्या वरून असं दिसून येतयं?? जाणून घ्यायला आवडेल :) प्रश्न विचारणे हे केव्हा पासून आरोप करण्यात आला या प्रकारात यायला लागलायं?? तरी सुद्धा तुमच्या सोईकरीता परत तो प्रश्न खाली देत आहे, कृपया उत्तर द्दावे. "उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तनला देण्याकरीता जी अट भारत सरकारने घातली होती, ती अ‍ट पाकिस्तानने १५ जानेवारीच्या आत पुर्ण केली का?? नाही केली तर भारत सरकारने का निर्णय फिरवला?? स्वतः चे हसे करून घ्यायला?? कुठलं कारण होतं त्या निर्णया मागे ?? या बद्दल काही माहिती आहे का??कुठे मिळेल??" -------------------------------------------- कृपया, सभ्य शब्दांत सांगावा. एकाहून अधिक प्रश्नार्थक चिन्हे हे सभ्यतेचे लक्षण नाही. सभ्य शब्दांत सांगणे तसेच एकाहून अधिक प्रश्नार्थक चिन्हे हे सभ्यतेचे लक्षण नाही यावर बोलणे हे अवांतर होइल आणि मुख्य चर्चे पासून दुर जाणे होइल. ते मला नकोय. त्यामुळे या वर नंतर बोलता येइल. ----------------------------------------------- आणि हो, माझा प्रतिसाद हा भोचक यांना उद्देशून होता, तुम्हाला नाही. तो प्रतिसाद फक्त तुमच्या प्रतिसादाच्या खाली आला एवढचं. तरी पण तुम्ही आपणहून विचारणा केल्या मुळे, माझ्या प्रश्नास तुम्ही सुद्धा उत्तर दिल्यास आनंदच आहे.

In reply to by समंजस

श्री/सौ/कु समंजस, आपल्याला खरेच आपल्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत का ? मला खरेच कमी वेळ आहे, आणि आपण विचारलेले प्रश्न इतके मूलभूत आहेत, की आपल्याला स्वतःला देखील त्या प्रश्नांची उत्तरे लगेच सापडतील. त्यामुळे, खरेच सांगा, आपल्याला असलेल्या प्रश्नांची उत्तरे मीच देणे आवश्यक आहेत का ? श्री/सौ/कु अप्पा जोगळेकरांना दिलेल्या उत्तरात मी ६ डिसेंबर १९४७ ते ३० जानेवारी १९४८ पर्यंत श्री. मोहनदास करमचंद गांधी ह्यांनी लिहिलेली सर्व पत्रे, सर्व भाषणे, ह्यांचे संदर्भ दिलेले आहेत. आपल्याला त्यापेक्षा जास्त संदर्भ हवे आहेत काय ? का ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

मर्यादेपेक्षा जास्त विरजण पडलं की दह्याची चव जाउन ते जास्तच आंबट होतं. आरोप काय? श्री ,सौ ,कु. काय? प्रत्येक वेळी वाकड्यातच शिरायला हवयं का? जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by पक्या

यूसलेस पक्या, समंजसला दर वेळी छोट्या छोट्या प्रश्नांना दिलेली उत्तरे बघ, आणि मग नंतर मला हा प्रश्न विचार. खरच सांगतो, अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मला हजार हजार डॉलर्स मिळतात. तुम्हा लोकांना उत्तरे देतोय भाड्यांनो, मला मिसळपाव आवडते म्हणून, फक्त. खरच, समंजस आणि पक्या, ह्या दोघ्यांनी मला उगाच उत्तरे मागितलीत, तर मी त्यांना कोर्टात खेचीन. सँटा क्लॅरा काउंटीच्या नियमांनुसार कमाल ७५०० डॉलर्स मागता येतात, आणि अगदी "दिलेली उत्तरे पुन्हा मागितली" तरी. आणि हो, "लॅटिट्यूड्स डीलिंग विथ सूडोनिम्स" क्लॉज मला माहिती आहे. समंजस, पक्या, तुम्ही "कोर्टातील नियम माहिती नसल्याने कोर्टात नजर राहू शकलो नाही'" अशा प्रकारचे विरोध केलेत, तरी देखील, वरचे क्लाउज बघा. ७५०० डॉलर नक्की. आणि तुमच्याविरुद्ध केस नक्की. एकदा केस नक्की झाली, की क्रेडिट हिस्टरी भोकात. बेस्ट लक. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

धन्यवाद साहेब. आपण दिलेल्या दुव्या वर जाउन माझ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो(१५ जानेवारीच्या भारत सरकारच्या निर्णयामागची कारणे शोधण्याचा). उत्तर मिळाल्यास परत तुम्हाला धन्यवाद देईनच, उत्तर नाही मिळाल्यास परत प्रश्न करेन :)

In reply to by समंजस

धन्यवाद मिसळभोक्ता साहेब :) तुम्ही दिलेल्या दुव्यावर माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं... हा पुरावा/संदर्भ जर आधीच सापडला असता तर माझ्यापुरती तरी का होईना ही चर्चा (वाद नाही) संपुष्टात आली असती. संक्षेपात सांगायचं तर; महात्मा गांधीचं उपोषण हे प्रमुख दोन कारणांकरीता होतं. १. दिल्लीतील दंगल थांबवणे (हिंदू-मुस्लिम-शिख) यांच्यात सलोखा निर्माण करणे, मुस्लिमांना दिल्लीत पुर्वी सारखी वागणूक-सुरक्षा मिळेल ही हमी घेणे. २. उर्वरीत ५५ कोटी पाकिस्तानला तात्काळ देणे (घातलेल्या अटी विसरून) . नेमकं तसंच झालं. पहिलं कारण विविध गटांनी/नेत्यांनी दुर केलं(१८ तारखेला हमीपत्र देउन). आणि दुसरं कारण भारत सरकारनी दुर केलं १५ तारखेला निर्णय घोषीत करून. ------------------------------------------ आता या पत्रांच्या सत्यते बद्दल जर कोणाला शंका असेल तर ही त्यांची समस्या मला मात्र सत्यते बद्दल काहीच शंका नाही :)

In reply to by समंजस

मिभो यंनी दिलेल्या दुव्यावर तुम्हाला ही माहिती कोठे आढळली त्याचा संदर्भ....उदा. पान नं/ अमुक तारखेचे भाषण/तमुक यांना लिहिलेले पत्र वगैरे दिला तर खूप बरे होईल. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

नितिनसाहेब मला वाटलं तुम्ही ही चर्चा थांबवली आहे त्यामुळे तुम्हाला आता जास्तीच्या संदर्भांची गरज नसावी :) माझ्या प्रश्नाचं उत्तर मला पान ४६५-४६६ वर सापडलं..... [वैधतेबद्दल मला संशय नाही. हे भारत सरकारचं जाहिर निवेदन. या निवेदनाचं खंडन करणारं दुसरं कुठलही पत्र/निवेदन(तत्कालीन) माझ्या वाचण्यात आता पर्यंत आलेलं नाही] तुम्हाला आणि इन्द्रराजसाहेबांना धन्यवाद. तुमच्या दोघांमुळे ही चर्चा एवढी लांबली आणि मुद्देसुद झाली तसेच बरेचसे नवे संदर्भ/माहिती मिळाली. शालेय पुस्तकांमधून शिकलेल्या इतिहासा पेक्षा बराचसा इतिहास या मुळे कळला.

श्री. मिभो यांना त्यातल्या त्यात श्रीमती प्रतिभा रानडे यांनी दिलेली कारणमीमांसा काही प्रमाणात पटली असेल असे मी गृहीत धरतो.... (त्यात "त्यावर माऊंटबॅटन यांनी गांधीजींना सुनावले, की तुम्ही तत्वाची, नैतिकतेची भाषा करता आणि दुसरीकडे पाकिस्तानचे ठरलेले ५५ कोटी देणेही बाकी आहे. त्यावर गांधीजींनी हे पैसे देण्यास आपली हरकत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यांची हे पैसे देण्यास हरकत नव्हतीच. पण उपोषणाचा मूळ उद्देश मात्र ५५ कोटी देण्यासाठी नव्हता.") अशी टिपणी आहे....!! चला इथपर्यंत तर आलो आहोतच की...."गांधीजींनी हे पैसे देण्यास आपली हरकत नसल्याचे सांगितले..." ~~ या बिंदूवर थोडी "जर-तर" ची भाषा वापरली तर चालेल का, भाऊ? ~ समजा तो विविध समाजाच्या १३० नेत्यांनी सही करून आणलेला एकात्मतेच्या "हमीपत्रा" चा कागद गांधीजींच्यासमोर ठेवला आणि त्याचवेळी नेहरू आणि पटेल यांनी सांगितले असते की, जोपर्यंत पाक आपले घुसखोर सैन्य काश्मिर घाटीतून काढून घेत नाही तोपर्यंत आम्ही ते ५५ कोटी रुपये अडवून ठेवणारच ! अशावेळी तुम्हाला का वाटते गांधीजी असे म्हटले असते, "ठिक आहे, तुम्हाला वाटेल ते करा.... मला फक्त दिल्लीतील दंगलीची काळजी वाटत आहे, ती आता या हमीपत्रामुळे मिटली....मी आता उपोषण सोडतो." याला जर तुमचे उत्तर "होय. असे नक्कीच झाले असते..." तर मग हा वादच संपला. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

In reply to by इन्द्र्राज पवार

हो. आता वाद संपवूनच टाका. एक दुसरी घटना सांगतो. (गांधी चित्रपटाच्या स्क्रीनप्ले मध्ये आहे. त्याच्या सत्यतेबाबत इतर पुरावा आत्ता माझ्याकडे नाही). द. आफ्रिकेतील आंदोलनानंतर सरकारने कायदा मागे घेतला. त्यावेळी "पण यापुढील दक्षिण आफ्रिकेतील भारतीय लोकांच्या देशांतरावर - इमिग्रेशन- कडक निर्बंध घालण्याचा सरकार विचार करेल" अशी धमकी जनरल स्मट्स यांनी दिली. त्यावेळी गांधींनी दिलेले उत्तर असे. "इमिग्रेशन हा आमचा मुद्दा कधीच नव्हता. आता आम्ही वरचढ स्थितीत आहोत - पोझिशन ऑफ अ‍ॅडव्हान्टेज- म्हणून तो मुद्दा बनवण्याची आमची इच्छा नाही". (बैठकीनंतर गांधी तेथून निघून जात असताना जनरल स्मट्स आपल्या सहकार्‍याला - चित्रपटात- म्हणतात, "ही इज आयदर अ ग्रेट मॅन ऑर अ कोलोसल फ्रॉड") हे पाहता ज्या मुद्द्यासाठी उपोषण केले नाही त्याचा आग्रह गांधींनी उपोषण सोडण्यासाठी घेतला नसता असे दिसते. नितिन थत्ते

In reply to by इन्द्र्राज पवार

आपल्या लिखाणात इतके "जर तर", इतकी गृहीतके, आहेत की आपल्याला नक्की म्हणायचे आहे ते मला कळत नाही. तुम्हाला तरी नक्की कळते आहे का ? पण तरी देखील तुम्हाला, का कुणास ठावूक, मदत करावीसी वाटते आहे. (एक विनंती. सर्वसाक्षी, अथवा समंजस किंवा असेच इतर सदस्य आपापल्या छात्या फुगवून पुढे आलेत, तर त्यांना इतिहासाबद्दल आठवण करून द्याल का?) सो, नाऊ, मिष्टर इंद्र, मला कृपया दोन पत्रे दाखवा. एकः दिल्लीतील दंगल मिटली म्हणून गांधीजींनी उपोषण मिटवले असा पुरावा (तुम्ही सांगितले त्याप्रमाणे सौ. प्रतिभा रानडे ह्यांचे पत्र). दुसरे: श्री/सौ/कु इंद्र ह्यांनी छातीठोकपणे सांगितलेले हमीपत्र. (ही दोन्ही पत्रे तुमच्याकडे नाहीत, हे मला माहिती आहे. कारण... दोन्ही दाखवा मग सांगीन.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अवांतरः मिभो काका, तुमचे मुद्दे जर तुम्च्यापुरते स्पष्ट अहेत आणि ते इतरांनी समजुन घ्यावे अशी आपली इच्छा असेल तर तुम्ही ते योग्य शब्दात आणि इतरंच्या मुद्द्यांचा आणि इतरांचा योग्य मान राखुन सांगावे,तर तुमचे मुद्दे जास्त seriously विचारात घेतले जातील अन्यथा शायरीपेक्षा अन्दाज-ए-बयाँ जास्त लक्ष वेधतो आहे आणि चर्चेचे उद्दिष्ट गाठण्यापासुन आपण भटकतो आहे. इंद्रराज दादांचे मुद्दे निश्चितच अभ्यासपूर्ण आहेत पण त्याही पेक्षा त्यांची मुद्दे मांडण्याची पद्धत अतिशय सोबर आहे. त्यामुळे please let's try to maintain mutual dignity. मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

In reply to by मी ऋचा

(कठीण आहे, पण तरी...) या मिभोला आवरा रे कोणीतरी !! बाकी इन्द्रा द टायगर यांच्या संयमाचे कौतुक वाटते. (त्यांनीही संयम सोडला, तर अजून मजा येईल.) ;)

In reply to by ज्ञानेश...

=)) मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

श्री. नितिन थत्ते म्हणतात ~~~ "हो. आता वाद संपवूनच टाका."... तर मी हे इथे मान्य करीत आहे.... कारण दोन्ही धाग्यात ("सावरकर" आणि "महात्मा") चर्चेची जी काय घागर घुमली आहे ती आम्हा दोघांमुळे असे मी व्यक्तीशः मानतो, त्यामुळे श्री.थत्ते यांनी या क्षणापर्यंत दाखविलेल्या संयमाचा आदर राखून इथे पूर्णविराम घेत आहे. धन्यवाद...!! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"

भावे - अत्रे वाद.. अत्रे-फडके वाद.. अत्रे-ठाकरे वाद.. ठाकरे-पु.ल वाद अश्या एकसेबढकर एक वाद इतिहास असलेल्या मराठी साहित्यक्षेत्रातला थत्ते-पवार हा अजून एक वाद संपला.. ;) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

मराठी साहित्यक्षेत्रातला थत्ते-पवार हा अजून एक वाद संपला. अरेरे.... म्हणजे आता परत नव्या झाडाच्या शोधात निघावे लागणार.... दुर्बिणीतून अशी लांबची झाडे लगेच दिसतात म्हणे... कुणाला दिसले तर कळवा रे.... आंबोळी

बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल,हा त्याचा बाणा आवडला. मिभो काकांच्या लिखाणातुन स्पष्ट होते आहे कि त्याना अमेरिकेतील कोर्टकचेर्‍याचा खुप अनुभव आहे व त्याच्या अश्या विरजण घालण्याचा फटका देखिल पडला असावा असे वाटते. :\ त्यामुळे इतरानी संभाळुन राहवे. वेताळ

थत्ते-पवार असा काहीच वाद नव्हता असे वाटते. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

तो थत्ते-पवार वाद नव्हता तर "७ महिने अमेरीकन नागरीक" - पवार वाद होता :) :). प्रतिसाद गुणिले १००० $ (की आणखीन जास्त???) एवढं प्रचंड नुकसान झालंय या वादातून.

खालच्या साइट वर व्ही. कल्याणम , पर्सनल सेक्रेट्र्री महात्मा गांधी यांनी गांधीजीच्या शेवटच्या दिवसा विषयी लिहीतात... http://www.mkgandhi-sarvodaya.org/last%20days/glastday.htm Bomb Explodes at Gandhiji’s Prayer Meeting There was a bomb explosion at the prayer meeting on 20 January. Madan Lal, the Punjabi refugee had thrown a bomb, but it didn’t hit him. A wall was broken that’s all and Gdhi never thought somebody had come to kill him. Gandhiji had undertaken a fast against the Government of India’s decision to hold back payment of Pakistan’s share of the cash balances (Rs. 50 Cr) due to them on the ground that Pakistan had connived with the Afridi tribesmen to invade and occupy Kashmir. To save Gandhiji’s life, the government relented and released the amount. Fundamentalist Hindus were infuriated by Gandhiji’s tactics and felt that he was appeasing Muslims to the detriment of the Hindu community. The bomb incident referred to was a consequence of this बाकी काही बोलायसारख राहयलच नाहीय. --आनंद

In reply to by आनंद

अहो आनंद साहेब, हा प्रतिसाद आधीच नाही का देवून टाकायचा? उगाचच मजा बघत बसता का राव? तरी सुद्धा, कल्याणम हे जरी गांधीजींचे पर्सनल सेक्रेट्र्री असले (पुरावा काय?) तरी गांधीजी त्यांच्याशी सहमत असतीलच असे नाही ... =))

In reply to by आनंद

=)) =)) =)) अहो ती सगळी कल्याणम यांनी सांगितलेली The bomb incident referred to was a consequence of this या वाक्याची पार्श्वभूमी आहे. असो. १. कल्याणम हे गांधींचे सेक्रेटरी होते हे खरे आहे. २. पुन्हा एकदा...... गांधींचे म्हणणे काय याविषयी सेक्रेटरींचे म्हणणे आणि गांधींचे स्वतःचे म्हणणे यात तफावत असेल तर कोणाचे म्हणणे ग्राह्य? (अवांतर: जब बच्चा बच्चा जानता है की ते ५५ कोटी रुपये होते...श्री. कल्याणम ५० कोटी का म्हणताहेत बरे? त्यांच्या स्मरणात काही चूक असेल का?) नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

जरी दोन्ही मुद्दे ग्राह्य धरले तरी हा नवा पुरावा मला अचंबीत तर करतोच शिवाय पुन्हा एकदा माझ्या मतावर विचार करायला भाग पाडतोय. याबद्दल शंकानिरसन करण्यासाठी मी त्या वेबसाईटवर दिलेल्या पत्त्यावर इमेल केला आहे. बघु काय प्रतिसाद येतो ते. तो पर्यंत ह्या पुराव्यामुळे मी तुर्तास माझे जुने मत सोडून तटस्थते पर्यंत येत आहे. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

In reply to by ऋषिकेश

श्री कल्याणम् ८८ वर्षाचे असुन अजुन एक्टीव आहेत.(मार्च २०१० पर्यंतचा रेफ.) त्याच्यांशी संपर्क साधता येतोय का ते बघतोय.

In reply to by ऋषिकेश

+१. मी पण माझं मत पुरून पुढे येणार्‍या पुराव्याची नवीन मत बनविण्यासाठी वाट पाहत आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix

सदर संकेतस्थळ नजरेखालून घातल्यावर ही माहिती देखील मिळाली. http://www.mkgandhi-sarvodaya.org/fact.htm The following facts dissolve this much touted thesis that Gandhiji had fasted to bring moral pressure on government of India to relent.: 1. Dr. Sushila Nair, as soon as she heard Gandhiji proclaim his decision, rushed to her brother Pyarelal and informed him in a huff that Gandhiji had decided to undertake fast till the madness in Delhi ceased. Even in those moments of inadvertence the mention of 55 crore of rupees was not made which clearly proves that it was not intended by Gandhiji. 2. Gandhiji's own announcement about his resolve on 12th January in the evening prayer meeting did not contain any reference to it. Had it been a condition, he would have certainly mentioned it as that. 3. Similarly, there was no reference to it in his discourse on 13th January. 4. Gandhiji's reply on the 15th January, to a specific question regarding the purpose of his fast did not mention it. 5. The press release Of the government of India did not have any mention thereof. 6. The list of assurances given by the committee headed by Dr. Rajendra Prasad to persuade Gandhiji to give up his fast did not include it. We hope these facts should put at rest the 55 crore concoction at rest. याच्या वरचे दोन परिच्छेदही या संबधात आहेत.