(कुजबुज)
आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची कुजबुज
खोलीतल्या दिव्याची का मंद वात झाली ?
दोघांतल्या गुजाची जाहीर बात झाली
मी डाव टाकला वा तू फेकलेस जाळे
खेळात नेहमी या अमुचीच मात झाली
पोटातगडबडाटा उच्छाद मांडलेला
परसी१ सकाळ गेली, परसात रात झाली
फसलो सुवर्णकांती वरुनी मदालसेला
रामा गडी म्हणोनी ओळख घरात झाली
जाता जवळ जरासा, केकाटली नवोढा
कानी बधीरता, अन एका 'करा'त झाली
होतो सदैव हाकत वेगात रथ असा मी
अमुची रवानगी मग रुग्णालयात झाली !
हसुनी खुणावणाऱ्या होत्या मुलीच दोषी
अपकीर्ति मात्र अमुची साऱ्या जगात झाली
करूनी विडंबने हा "केश्या" अम्हास छळतो
कुजबुज अशी कवींची आपापसात झाली
१ : 'परस' या शब्दाचे 'परसी' हे रूप बरोबर आहे का याविषयी व्याकरणाच्या जाणकारांनी खुलासा/मार्गदर्शन करावे.
वृत्ताच्या गरजेमुळे विडंबनात बऱ्याच ठिकाणी हृस्व चा दीर्घ आणि दीर्घ चा हृस्व केलेला असेल याची खुलासा/मार्गदर्शन करताना कृपया नोंद घ्यावी.
:-)))))))))))))
सहीऽऽ
एकदम जोरात!
केशव भौ
धन्यवाद!!
:)
:).....