Skip to main content

कोकणा मधिल नविन रस्ते

Published on गुरुवार, 27/05/2010
नमस्कार मित्रानो/मैत्रीणीनो, नुकताच माझ्या एका मित्राच्या लग्ना मुळे रत्नागिरी येथे जाण्याचा योग आला, त्या निमित्ताने गणपतिपुळे येथे जाण्याचा योग आला, नुकत्याच झालेल्या सागरी रस्त्याने गणपतिपुळे हे ठिकाण आरे वारे मार्गे फक्त १५ कि.मी वर आहे. अनेक ठिकाणी असे खाडी वर पुल झाल्या मुळे कोकणातील अनेक ठीकाणे जवळ आली आहेत, आपल्याला सुधा असे काही माहित असल्यास लिहा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4192
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

आरं लेका काही फोटू बिटू टाकाचं ना भाऊ. नाय तर. नागमोडी गवतामधून जाणारी वाट. डोंगर, खळखळणारं झरं, काकडीच्या वाड्या अस्स काय तर लिव्हाचा ना रे दादा. आता लय दिस झाले गणपतीपुळ्याला जाऊन तव्हा रस्त्याबद्दल कायबी ठाव नाय. बाबुराव :)

@) मित्रा आम्हाला बी बघू दे कि राव कोकणातले रस्ते ! फोटू बिटू टाक कि जरा

रत्नागिरीहुन गुहागरला जाणारा रस्ता. राई-भातगावचा पूलामार्गे. अप्रतिम रस्ता आहे हा.

In reply to by वल्लभ

राई-भातगावचा पूलामार्गे अप्रतिम आहे. पण संपुर्ण रस्ता हा लोकवस्ती पासुन दुर वाटतो आणि त्यात आम्हि संध्याकाळी प्रवास केला असल्याने अजुन भयाण वाटला.. त्यात रस्त्यांचे नामफलक सुद्धा नाहित. केवळ नशिबानेच आम्हि हेदवीला सुखरुप पोहोचलो. संध्या काळी आणि रात्री हा प्रवास टाळावा असे सुचवावेसे वाटते. बाकी आरेवारे एकदम मस्त आहे. माझ्या मते 'फुल थ्री धमाल' या मराठी चित्रपटात याच परिसरचे चित्रिकरण आहे. आरेवारेची काहि प्रकाशचित्रे..

कोकणामधील नवे रस्ते हे शीर्षक वाचताना डोळ्यासमोर कोंकणा सेनच चमकुन गेली.(कालच वेकअप सीड पाहीला त्याचा परिणाम.) प्रशुंनी दिलेली आरेवारेची प्रकाशचित्रे मस्त आली आहेत. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

केळ्या, तु रत्नागिरीला कधी गेला बे? आनि मला बोलला पन नाही. रत्नागिरीपासुन १५ किमी वर गणेश-गुळे नावाचे भन्नाट ठिकाण आहे, समुद्र पुळ्यापेक्षा भारी... पुळ्याचा गणपती गुळ्यातुन रुष्ट होऊन आला अशी आख्यायिका आहे.... दगडात गणेशाच्या जाण्याच्या काही खुणा पण आहेत. गर्दी नसल्याने एकदम भारी आहे, आणि तेवढाच सेफ ही.. गणेश गुळे दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||