मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाववर केवळ प्रमाणभाषेत लिहिणार्‍यांनाच लिहिण्याची परवानगी असावी असं आपल्याला वाटतं का?

ऋषिकेश · · कौल

वाचने 930 वाचनखूण प्रतिक्रिया 5

कोलबेर Sat, 04/19/2008 - 22:27
नाही, भावना पोचणे महत्वाचे. वापरलेली भाषा चारचौघांना कळणारी आणि भावना पोहोचवणारी असली म्हणजे झाले!
मी हेच मत नोंदवले आहे. पण हे 'मिनिमम रिक्वायरमेंट' म्हणून धरले जावे. त्या उप्पर प्रत्येकाने व्याकरण आणि शुद्धलेखनाचे 'सर्वमान्य आणि सर्वसामान्य' नियम बर्‍यापैकी पाळले तर निश्चितच आवडेल*. परंतु त्यासाठी अवाजवी आग्रह नाही/नसावा/ इथे बाकिच्यांचाही सहसा नसतो. *अपवाद : काही विशिष्ट शैली वापरुन केलेले ललित लिखाण.

ऐश्वर्या राय Sun, 04/20/2008 - 15:09
पोल जर "मिसळपाववर केवळ प्रमाणभाषेत लिहिणार्‍यांनाच लिहिण्याची परवानगी असावी असं आपल्याला वाटतं का?" असा घ्यायचा असेल तर त्याला हो, नाही (आणि सध्याच्या स्टाईलप्रमाणे 'माहीत नाही') असेच हवेत. तुम्ही दिलेले पर्याय वेगळे पॉईंटस् डिस्कस करतात. आणि, आजपतुर, हित 'फक्त सुद्द म्हराटित लिवनार्‍यांनाच परवांगी द्यावि' असा पायींटच कुनी काढल्याला न्हवता मग तुम्ही अस टी व्ही वाल्यांगत मनाचे पायींट का घुसडायलाय? हित लोक फकस्त सुद्द लेखन करने कसे चांगले ते बोलत्यात. काही म्हनत्यात सुद्द कायी न्हवच. येवढच. तुम्ही सबसे तेज नायतर गेला बाजार खबर हर किमत पर ला जाईन करा. थित तुमची ही इल्लम लयी कामाला यील. सुद्दच लिवनारी, एस्वर्या

ऋषिकेश Sun, 04/20/2008 - 18:05
सर्व प्रतिसादकर्त्यांचे अनेक आभार!! जरी पर्याय सर्व समावेशक नसले (व त्यातील श्व्दांकना त्रुटी असल्या) तरी कौल स्पष्ट आहे. या कौलातून मला जे सांगायचे होते ते कोलबेररावांनी अचूक पकडले आहे. त्यामुळे अधिक बोलत नाही केवळ उद्धृत करतो. कोलबेरराव , नेमक्या प्रतिक्रियेबद्दल आभार! त्या उप्पर प्रत्येकाने व्याकरण आणि शुद्धलेखनाचे 'सर्वमान्य आणि सर्वसामान्य' नियम बर्‍यापैकी पाळले तर निश्चितच आवडेल*. परंतु त्यासाठी अवाजवी आग्रह नाही/नसावा/ इथे बाकिच्यांचाही सहसा :) नसतो. -('मिसळ'लेला) ऋषिकेश